ISL 2024-25 FC Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: FC Goa संघाचे द्वितीय स्थान भक्कम! पंजाबवर 1-0 अशी मात; स्पर्धेतील सलग चौथा विजय

FC Goa Vs Punjab FC: एफसी गोवाचा हा स्पर्धेतील १३वा, तर सलग चौथा विजय ठरला. त्यांचे आता २२ लढतीतून ४५ गुण झाले.

Sameer Panditrao

ISL 2024-25 FC Goa Vs Punjab FC

पणजी: संघासाठी मोसमात गोल नोंदविणारा तेरावा खेळाडू कार्ल मॅकह्यू याने पूर्वार्धात नोंदविलेल्या गोलच्या बळावर एफसी गोवाने पंजाब एफसीवर १-० अशी निसटती मात केली आणि इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दुसरा क्रमांक भक्कम केला.

सामना गुरुवारी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. एफसी गोवाने आक्रमक सुरवात करून वारंवार पंजाब एफसीच्या गोलक्षेत्रात धडाका मारल्या, पण गोलरक्षक मुहीत शबीर खान याच्या दक्षतेमुळे गोव्यातील संघाला यश मिळाले नाही, मात्र ४५व्या मिनिटास तो गाफील राहिल्यामुळे मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने आघाडी प्राप्त केली.

दीडशेवा आयएसएल सामना खेळणाऱ्या उदांता सिंगच्या थ्रो-ईनवर आयर्लंडच्या मॅकह्यू याच्या डाव्या पायाच्या फटक्यावर चेंडूने प्रतिस्पर्धी खेळाडूंना चकवा देत गोलनेटचा वेध घेतला.

एफसी गोवाचा हा स्पर्धेतील १३वा, तर सलग चौथा विजय ठरला. त्यांचे आता २२ लढतीतून ४५ गुण झाले असून अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील बंगळूर एफसी व जमशेदपूर एफसीवर (प्रत्येकी ३७ गुण) आठ गुणांची आघाडी घेतली आहे.

एफसी गोवाचा पुढील सामना चार मार्च रोजी मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध फातोर्डा येथे खेळला जाईल. आणखी दोन सामन्यानंतर एफसी गोवाने दुसरा क्रमांक कायम राखल्यास त्यांना लीग शिल्ड विजेत्या मोहन बागानसह थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. त्यांना आता तीन सामने बाकी असलेल्या जमशेदपूर एफसीकडून गुणतक्त्यात आव्हान आहे.

पंजाब एफसीला बारावा पराभव पत्करावा लागला. २२ लढतीनंतर २४ गुणांसह अकराव्या क्रमांकावर असल्याने त्यांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येईल हे स्पष्ट झाले. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे एफसी गोवाने त्यांच्यावर २-१ असा विजय नोंदविला होता.

दृष्टिक्षेपात...

एफसी गोवाचे स्पर्धेतील खेळलेल्या सर्व २२ सामन्यांत गोल

एफसी गोवाच्या स्पर्धेत ७ क्लीन शीट्स

एफसी गोवा पंजाब एफसीविरुद्ध अपराजित, ४ सामन्यांत ३ विजय व १ बरोबरी

अवे मैदानावर यंदा एफसी गोवाचे ११ सामने, त्यात ६ विजय, ४ बरोबरी, १ पराभव

एफसी गोवाचे स्पर्धेत ४१ गोल, एकूण १३ खेळाडूंचे योगदान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT