ISL 2024-25: FC Goa ला दुसरे स्थान भक्कम करण्याची संधी! साखळी फेरीत केरळा ब्लास्टर्सचे आव्हान

FC Goa Vs Kerala Blasters: पहिल्या क्रमांकावरील मोहन बागानचे ४९ गुण आहेत, तिसऱ्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसी संघाने ३७ गुणांची नोंद केली आहे.
Manolo Marquez
FC Goa Coach Manolo MarquezDainik Gomantak
Published on
Updated on

ISL 2024-25 FC Goa Vs Kerala Blasters

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत ‘शिल्ड’ जिंकण्याची संधी अंधूक असली, तरी साखळी फेरीतील मोहीम अव्वल तीन संघांत संपविण्याचा निर्धार एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ बाळगून आहेत. शनिवारी (ता. २२) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर त्यांनी केरळा ब्लास्टर्सला नमविल्यास दुसरा क्रमांक भक्कम करण्याची संधी प्राप्त होईल.

सध्या एफसी गोवाने २० पैकी ११ सामने जिंकून ३९ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या क्रमांकावरील मोहन बागानचे ४९ गुण आहेत, तिसऱ्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसी संघाने ३७ गुणांची नोंद केली आहे. केरळा ब्लास्टर्स प्ले-ऑफ फेरी गाठण्यासाठी संघर्ष करत असून २० पैकी १० सामने गमावल्यामुळे ते २४ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहेत.

शनिवारच्या लढतीविषयी मार्केझ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले, की, ‘‘आमची प्ले-ऑफ फेरी निश्चित झालेली आहे, तरीही पुढील चारही सामने महत्त्वाचे आहेत. शिल्ड जिंकण्याची शक्यता अंधूक असली, तरी पहिल्या तीन संघात स्थान राखण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आम्हाला केरळा ब्लास्टर्सविरुद्ध जिंकावेच लागेल. केरळमधील संघासाठीही सामना महत्त्वाचा आहे. आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना बरोबरी पुरेशी नसून विजय मिळवावाच लागेल. त्यामुळे त्यांच्याकडून तुल्यबळ आव्हान अपेक्षित आहे. आम्हाला नेमके काय करायचे आहे याची जाणीव आहे. त्याचवेळी अतिआत्मविश्वास नुकसानकारक ठरू शकतो हे जाणतो. विजयाचे पूर्ण तीन गुण हेच आमचे लक्ष्य आहे.’’

Manolo Marquez
FC Goa: अंधेरीत उजो! एफसी गोवाने 13 सामन्यांनंतर मुंबई सिटीला चारली पराभवाची धूळ; गोलचाही रेकॉर्ड

मैदानात उतरण्यापूर्वी...

एकमेकांविरुद्ध २१ सामने, एफसी गोवाचे १२, तर केरळा ब्लास्टर्सचे ५ विजय, ४ लढती बरोबरीत

पहिल्या टप्प्यात कोची येथे २८ नोव्हेंबर रोजी एफसी गोवा १-० फरकाने विजयी

घरच्या मैदानावर फातोर्ड्यात यंदा एफसी गोवाचे १० सामने, ६ विजय, २ बरोबरी, २ पराभव

एफसी गोवाचे स्पर्धेत ३८ गोल, तर केरळा ब्लास्टर्सचे ३० गोल

यंदा आयएसएल स्पर्धेत सर्व २० सामन्यांत गोल करण्याचा एफसी गोवाचा विक्रम

Manolo Marquez
ISL 2024-25: विजयी कामगिरी हेच आमचे लक्ष्य! प्रशिक्षक मार्केझ सकारात्मक; मुंबई सिटीविरुद्ध FC Goa ने कसली कंबर

हेर्रेरा निलंबित, ब्रायसन उपलब्ध

निलंबनामुळे एफसी गोवा संघाला शनिवारच्या लढतीत मध्यरक्षक बोर्हा हेर्रेरा याला मुकावे लागेल, हुकमी खेळाडू ब्रायसन फर्नांडिस याला दुखापत सतावत असली, तरी तो खेळण्याच्या स्थितीत स्थितीत असल्याची माहिती मार्केझ यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com