FC Goa vs Istiklol Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

AFC Champions League: एफसी गोवाला पहिल्या विजयची प्रतीक्षा, ताजिकिस्तानमध्ये रंगणार थरारक सामना!

FC Goa AFC Champions League: एफसी गोवा एएफसी चँपियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेत बुधवारी पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असेल.

Akshata Chhatre

पणजी (क्रीडा प्रतिनिधी): एफसी गोवा एएफसी चँपियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेत बुधवारी (ता. १) पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असेल. ताजिकिस्तानमधील हिसॉर स्टेडियमवर त्यांची लढत दुशांबेस्थित एफसी इस्तिक्लोल संघाविरुद्ध होईल.

एफसी गोवा संघाला ड गटातील पहिल्या लढतीत इराकच्या अल झावरा क्लबने २-० फरकाने हरविले होते, तर एफसी इस्तिक्लोलला सौदी अरेबियातील अल नासर क्लबने ५-० असे सहजपणे हरविले होते. बुधवारी गटातील अन्य एक लढत इराकमध्ये अल झावरा व अल नासर यांच्यात खेळली जाईल.

एफसी इस्तिक्लोल संघ ताजिकिस्तानमध्ये बलाढ्य गणला जातो. त्यांनी ताजिक लीग १३ वेळा, ताजिकिस्तान कप १० वेळा, तर ताजिकिस्तान सुपर कप १३ वेळा जिंकलेला आहे. आक्रमणात अधिक धारदार खेळ केल्यास मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवास स्पर्धेत गुणखाते उघडण्याची संधी मिळेल. हुकमी बचावपटू संदेश झिंगन जबड्याला झालेल्या दुखापतीनंतर तंदुरुस्त झाला असून तो बुधवारच्या लढतीत चेहऱ्यावर मास्क वापरून खेळणार आहे. त्याची उपस्थिती एफसी गोवासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: बागा बीचवरील 'तो' व्हिडिओ व्हायरल झाला अन् पोलिसांनी सूत्रे हलवली! तरुणीची छेड काढणारा राजस्थानचा 23 वर्षीय तरुण गजाआड

IND vs SA 1st Test: फलंदाजांचं वादळ की, गोलंदाजांचा तडाखा...! ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीचा कोणाला होणार फायदा? जाणून घ्या पीच रिपोर्ट

Viral Video: भर रस्त्यात जीवाशी खेळ! ट्रकच्या चाकांमधून बाईक काढणाऱ्या तरुणाचा थरार व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटकरी संतप्त; म्हणाले...

Goa ZP Election: 'युतीचा निर्णय उद्या होणार', जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज; 50 मतदारसंघांतून अर्ज दाखल

Vijay Devarakonda: कोकणवासियांनो! विजय देवरकोंडा आलाय तुमच्या गावात, 'रावडी जनार्दन' कोकणच्या प्रेमात

SCROLL FOR NEXT