Manolo Marquez Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2026: "..नुकसान सोसावे लागेल", चेन्नईयीनविरुद्धच्या सामन्यापूर्वी FC Goaचे प्रशिक्षक मार्केझनी दिला इशारा; गोलबाबत व्यक्त केली खंत

Fc Goa vs Chennaiyin: एफसी गोवा संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सलग पाच सामने अपराजित आहे, तरीही संघाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ सावध आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी ः एफसी गोवा संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सलग पाच सामने अपराजित आहे, तरीही संघाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ सावध आहेत. पुढील लढतीत खराब खेळ केल्यास निश्चितच नुकसान सोसावे लागेल, असा इशारा त्यांनी संघाला दिला आहे.

एफसी गोवाचा स्पर्धेतील पुढील सामना रविवारी (ता. २२) चेन्नईयीन एफसीविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी चेन्नईला रवाना होण्यापूर्वी मानोलो शुक्रवारी पर्वरी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. पंजाब एफसीच्या खेळाडूस रेड कार्ड मिळाल्यानंतर एफसी गोवाने मागील लढतीत १-१ अशी गोलबरोबरी साधली होती.

त्या सामन्यातील आपल्या संघाच्या एकंदरीत कामगिरीवर मार्केझ खूश नाहीत. या पार्श्वभूमीवर त्यांनी चेन्नईयीनविरुद्धच्या लढतीपूर्वी संघाला सावध केले आहे. मार्केझ यांनी सांगितले, की ``प्रतिस्पर्धी (चेन्नईयीन) चांगले फुटबॉल खेळत असून चेंडूवर नियंत्रण राखत आहेत. जर आम्ही त्यांच्याविरुद्ध खराब खेळ केल्यास नुकसान निश्चित आहे आणि आम्ही चांगले खेळल्यास चेन्नईयीनसाठी सामना नक्कीच कठीण ठरेल.

आमच्या संघात पुरेसे पर्याय असून राखीव फळीतील खेळाडूही दर्जेदार आहेत. संघाने सातत्यपूर्ण खेळ करणे आवश्यक आहे.`` आपला संघ वर्चस्व राखत संधी निर्माण करतो, पण गोल करण्यात कमी पडतो ही खंत मार्केझ यांना सतावत आहे.

``प्रत्येकावर जबाबदारी आहे. त्यांनी त्यास न्याय देणे आवश्यक आहे,`` असे त्यांनी नमूद केले.चेन्नईयीन एफसीने मागील लढतीत केरळा ब्लास्टर्सला एका गोलने नमवून स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली होती. त्यांचे चार लढतीतून चार गुण असून १४ संघांच्या स्पर्धेत ते सध्या अकराव्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT