FC Goa Vs Chennaiyin FC Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC Goa Vs Chennaiyin FC: थरार! बलाढ्य एफसी गोवाला चेन्नईयीन एफसी देणार टक्कर; कोण मारणार बाजी?

FC Goa Match Today: एफसी गोवा आणि चेन्नयीन एफसी यांच्यात आज (दि. २४ ऑक्टोबर) रोजी महत्वाचा सामना रंगणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, (क्रीडा प्रतिनिधी): एफसी गोवा आणि चेन्नयीन एफसी यांच्यात आज (दि. २४ ऑक्टोबर) रोजी एक महत्वाचा सामना रंगणार आहे. जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियम चेन्नई इथे संध्याकाळी ७:३० वाजता इंडियन सुपर लीगचा हा मुकाबला खेळला जाईल.

एफसी गोवासाठी या खेळ हंगामाची सुरूवात काहीशी खराब असली तरीही खेळाडू फुटबॉलच्या खेळात बदल घडवण्याचा सराव करतायत तर दुसऱ्या बाजूला चेन्नयीन एफसी त्यांची मजबूत घोडदौड सुरु ठेवण्यावर भर देतेय.

इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवापाशी परिस्थिती बदलण्याची क्षमता निश्चितच असल्याचा विश्वास व्यक्त करताना सुसूत्र आणि सातत्यपूर्ण खेळाची गरज मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी व्यक्त केली आहे.

एफसी गोवा संघाला मागील लढतीत मुंबई सिटीकडून पराभव पत्करावा लागला. त्या लढतीत आपला संघ सलगपणे चांगले खेळण्यास कमी पडला आणि त्यामुळे पराभूत झाल्याचे मार्केझ म्हणालेत. स्पर्धेतील पाचही सामन्यांत जवळपास हीच स्थिती होती. फक्त एक लढत जिंकलेल्या एफसी गोवाच्या खात्यात फक्त पाच गुण आहेत.

अनुभवी ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन संघ (Chennaiyin FC) प्रत्येक सामन्यागणिक प्रभावी खेळ करताना दिसत आहे. चारपैकी दोन लढतीत विजय, तसेच एका सामन्यात बरोबरी यामुळे त्यांचे सात गुण आहेत. चेन्नईयीनने मागील लढतीत गुवाहाटी येथे पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना नॉर्थईस्ट युनायटेडला हरविले होते.

एफसी गोवा आणि चेन्नयीन एफसी यांच्यामधला मुकाबला पाहायचं झालं तर एफसी गोवाच्या संघाचं पारडं बरंच भारी आहे. एफसी गोवा आई चेन्नयीन एफसी यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सात सामन्यांपैकी एफसी गोवाच्या संघाने सहा सामने जिंकले आहेत आणि उल्लेखनीय बाब म्हणजे यामधले तीन सामने सलग जिंकण्यात एफसी गोवाला यश मिळालंय. एफसी गोवाने आत्तापर्यंत खुल्या खेळात आणि सेट पीसमध्ये दमदार कामगिरी बजावली आहे.

मैदानात उतरण्यापूर्वी...

  • आयएसएल स्पर्धेत एकमेकांविरुद्ध २६ सामने

  • एफसी गोवाचे १५, तर चेन्नईयीनचे ९ विजय, २ बरोबरी

  • एफसी गोवाचे चेन्नईयीनविरुद्ध ५४ गोल

  • गतमोसमातील तिन्ही आयएसएल लढतीत एफसी गोवा विजयी (३-०, ४-१, २-१)

एफसी गोवाचे गतमोसमात वर्चस्व

चेन्नईयीन एफसीविरुद्ध २०२३-२४ मोसमातील चार लढतीत एफसी गोवाने (FC Goa) विजयी वर्चस्व राखले होते. आयएसएल(ISL)मधील प्ले-ऑफसह तीन लढतीत, तसेच ड्युरँड कप स्पर्धेतील एका सामन्यात एफसी गोवाने चेन्नई संघाला हरविले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test: 'तो आतून खचला असेल...' सिराजला पुन्हा संघाबाहेर ठेवल्यानं दिग्गज भडकले! कैफ, मुनाफ पटेल अन् जाफर यांनी निवडकर्त्यांना घेतलं फैलावर

ST Reservation: आरक्षणाचा तिढा सोडवण्यास सरकार सरसावले; 7 डिसेंबरपासून सुनावणी, केंद्राचे प्रतिज्ञापत्र सादर

Student Visa Fraud: मुलीला कॅनडात शिकवण्याचे स्वप्न पडले महागात; व्हिसाच्या आमिषाने लाखोंचा गंडा

999cc इंजिन, 215 bhp पॉवर अन् 300 किमी प्रतितासापेक्षा जास्त वेग! BMW ची सर्वात दमदार सुपरबाईक भारतात लॉन्च; किंमत जाणून घ्या

Under 11 National Badminton: गोव्याची अमायरा धुमटकर विजेतेपदाच्या उंबरठ्यावर, 11 वर्षांखालील राष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये छाप

SCROLL FOR NEXT