FC Goa: 'आम्ही चुका करत आहोत तरीही..', खराब कामगिरीवरुन प्रशिक्षक मार्केझ काय म्हणाले पाहा

Marquez and Odei Onaindia Press Conference: मार्केझ व संघाचा कर्णधार बचावफळीतील अनुभवी खेळाडू ओडेई ओनाइंडिया यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. सध्या एफसी गोवाचे पाच लढतीतून पाच गुण असून फक्त एक विजय नोंदविला आहे. दोन सामने जिंकलेल्या चेन्नईयीनचे चार लढतीतून आठ गुण आहेत.
Manolo Marquez
Manolo MarquezDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत खेळताना एफसी गोवा संघाला बचावातील कमजोरी खूपच सतावत असून कामगिरीत घसरण झाली आहे. मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ सुद्धा वस्तुस्थिती नाकारत नाहीत, त्याचवेळी आपला संघ निश्चितच परिस्थिती बदलू शकतो असल्याचा विश्वास ते व्यक्त करतात.

एफसी गोवा आणि चेन्नईयीन एफसी यांच्यातील सामना गुरुवारी (ता. २४) चेन्नई येथे होणार आहे. या लढतीच्या पार्श्वभूमीवर मार्केझ व संघाचा कर्णधार बचावफळीतील अनुभवी खेळाडू ओडेई ओनाइंडिया यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. सध्या एफसी गोवाचे पाच लढतीतून पाच गुण असून फक्त एक विजय नोंदविला आहे. दोन सामने जिंकलेल्या चेन्नईयीनचे चार लढतीतून आठ गुण आहेत.

एफसी गोवाने पाच सामन्यांत १० गोल स्वीकारले आहेत. बचावात चुका होत असून संघ सातत्य राखण्यात कमी पडत आहे ही बाब मार्केझ, तसेच ओडेई यांनी मंगळवारी मान्य केली. बचावपटू या नात्याने वैयक्तिक कामगिरीवर आपण अजिबात समाधानी नसल्याची कबुली ओेडेई याने दिली, पण संघ फार चिंतित नसून आशावादी असल्याचेही त्याने नमूद केले.

सुधारणेस भरपूर वाव

मार्केझ यांनी सांगितले, की ``संघ सातत्यात कमी पडतो हे संघाच्या आतापर्यंतच्या निराशाजनक कामगिरीचे मुख्य कारण आहे. आम्ही चुका करत आहोत, तरीही सुधारणेस भरपूर वाव आहे. नक्कीच आम्ही परिस्थिती बदलू शकतो. अपेक्षित निकाल नसले, तरी आम्ही अतिशय खराबही खेळत नाही. सध्यातरी संघ दबावाखाली नाही. एफसी गोवासाठी हा मोसम निश्चितच चांगला ठरेल याबाबत मी अजूनही आशावादी आहे.``

Manolo Marquez
Verna Bus Accident : ..माणुसकी जिंकली! ‘त्या’ वारसांना मिळणार भरपाई; कामगार आयुक्तांनी राबवली बिहारमध्ये शोधमोहीम

खेळाडू तंदुरुस्तीकडे, सेरिटन जायबंदी

मार्केझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुखापतग्रस्त यादीतील महंमद यासीर व संदेश झिंगन संघासमवेत चेन्नईला प्रवास करणार आहेत. यासीर खेळण्यास सज्ज असून संदेशही काही मिनिटे खेळू शकतो, पण त्याच्याबाबतीत संघ धोका पत्करणार नाही. गोलरक्षक लारा शर्मा अजूनही दुखापतग्रस्त असून अनुभवी बचावपटू सेरिटन फर्नांडिस जायबंदी असून पूर्ण क्षमतेने खेळण्यास त्याला काही काळ लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com