Manolo Marquez FC Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC Goa समोर आता द्वितीय क्रमांकाचे ध्येय! पुढील सामन्यांबाबत आशावादी; अखेरचा साखळी सामना मोहन बागानविरुद्ध

ISL 2024-25: एफसी गोवाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत बाकी तिन्ही सामन्यांत पूर्ण गुणांची कमाई करून साखळी फेरीत द्वितीय क्रमांकाचे ध्येय बाळगले आहे.

Sameer Panditrao

ISL 2024-25 FC Goa Matches

पणजी: एफसी गोवाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत बाकी तिन्ही सामन्यांत पूर्ण गुणांची कमाई करून साखळी फेरीत द्वितीय क्रमांकाचे ध्येय बाळगले आहे. मोहन बागानने ‘शिल्ड’ सलग दुसऱ्यांदा जिंकल्यानंतर गोव्यातील संघाचे आता दुसऱ्या स्थानावर लक्ष एकवटले आहे.

एफसी गोवाने शनिवारी रात्री फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्सला उत्तरार्धातील दोन गोलच्या बळावर पराभूत केले. अव्वल स्थानावरील मोहन बागाननंतर (५२ गुण) एफसी गोवा ४२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तिसऱ्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसीचे ३७ गुण आहेत. एफसी गोवाचा पुढील सामना २७ फेब्रुवारीस दिल्ली येथे पंजाब एफसीविरुद्ध होईल. त्यानंतर फातोर्ड्यात ते मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध खेळतील, तर अखेरचा साखळी सामना कोलकत्यात मोहन बागानविरुद्ध होईल.

केरळा ब्लास्टर्सला पराभूत केल्यानंतर एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी सांगितले, की ‘‘या विजयामुळे आम्ही अव्वल दोन संघात स्थान मिळविण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. शिल्ड जिंकणे खूपच अवघड आहे ही बाब सर्वांनाच माहीत आहे.

आम्ही प्रत्येक सामन्याचा विचार करतो. आता आम्हाला दिल्लीत जाऊन पंजाब एफसीविरुद्ध खेळायचे आहे आणि जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर आम्ही अव्वल दोन संघांत स्थान मिळविले, तर आमची स्पर्धेतील सुरवात लक्षात घेता हा मोसम खूपच चांगला ठरला असे मानता येईल.’’

ब्रायसनचे भवितव्य उज्ज्वल

एफसी गोवाचा युवा खेळाडू ब्रायसन फर्नांडिसच्या भवितव्याविषयी मार्केझ म्हणाले, की ‘‘ब्रायसनबाबत संयम बाळगावा लागेल, कारण तो सध्या शारीरिकदृष्ट्या सर्वोत्तम स्थितीत नाही. पण तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. मला वाटते की त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे. सध्या तो राष्ट्रीय संघात नसला, तरी भविष्यात तो नक्कीच राष्ट्रीय संघात असेल.’’ ब्रायसन दुखापतग्रस्त असून पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळे मार्केझ यांनी त्याला केरळा ब्लास्टर्सविरुद्ध सामन्याच्या उत्तरार्धात मैदानात उतरविले होते.

गोल नोंदविण्यात सातत्य

एफसी गोवाने आयएसएल मोसमात प्रत्येक सामन्यात गोल नोंदविताना २१ लढतीत ४० गोल नोंदविले आहेत. या सातत्यबद्दल मार्केझ यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘जेव्हा तुम्ही गोल करत नाही, तेव्हा लोक म्हणतात की संघाकडे योग्य स्ट्रायकर नाही. जेव्हा तुम्ही भरपूर गोल करता, तेव्हा मी अधिकाधिक खेळाडूंना गोल करताना पाहणे पसंत करतो.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT