Indian Football League Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Indian Football League: शेवटच्या मिनिटाला एफसी गोवाचा गोल! स्पोर्टिंग क्लब दिल्लीविरुद्ध थरारक 1-1 बरोबरी

FC Goa vs Sporting Club Delhi: एफसी गोवा संघाने सामन्याच्या सुरवातीस चांगलेच वर्चस्व प्रस्थापित केले होते, पण त्यांचे नेम चुकले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: एफसी गोवा संघाने चेंडूवर अधिक प्रमाणात वर्चस्व राखले, पण गोल करताना ते सातत्याने गडबडले, अखेरीस भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटास आलेक्स व्हालेहो याने केलेल्या गोलमुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यात एक गुण प्राप्त केला. त्यांनी स्पोर्टिंग क्लब दिल्लला १-१ असे रोखले. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी सामना झाला.

एफसी गोवा संघाने सामन्याच्या सुरवातीस चांगलेच वर्चस्व प्रस्थापित केले होते, पण त्यांचे नेम चुकले. १९ व्या मिनिटास के. सी. माल्सॉमसांगा याचा गोल ऑफसाईड ठरल्यामुळे यजमान संघाच्या खाती आघाडी जमा होऊ शकली नाही. गोलशून्य पूर्वार्धानंतर ५१व्या मिनिटास कोलंबियन खेळाडू हुआन सेबॅस्टियन पेना याने स्पोर्टिंग क्लब दिल्लीसाठी आघाडीचा गोल केला. त्याने हा गोल रॉड्रिग्‍नो याच्या असिस्टवर नोंदविला.

पाहुणा संघ स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या समीप असताना ९०+५ व्या मिनिटास फ्रान्चू याच्या फ्रीकिकवर स्पॅनिश खेळाडू व्हालेहो याने अगदी जवळून नेम साधला, त्यामुळे एफसी गोवा संघ घरच्या मैदानावर पराभव टाळू शकला. त्यापूर्वी, भरपाई वेळेतील पहिल्याच मिनिटास समोर केवळ गोलरक्षक असताना एफसी गोवाचा ख्रिस्तियन (चिकी) बोरेगो याने दिशाहीन फटका मारून आयती संधी गमावली होती. पूर्वार्धात ३७व्या मिनिटास महंमद नेमील स्वतःवर ताबा राखू न शकल्यामुळे एफसी गोवाची चांगली संधी फुकट गेली होती.

एफसी गोवाने पहिल्या लढतीत चेन्नईयीन एफसीलाही १-१ असे गोलबरोबरीत रोखले होते, आता दोन लढतीतून त्यांचे दोन गुण झाले आहे. एफसी गोवा पुढील सामना १ नोव्हेंबर रोजी इंटर काशी संघाविरुद्ध खेळेल. अगोदरच्या दोन्ही लढतीत पराभूत झालेल्या स्पोर्टिंग क्लब दिल्लीने पहिल्या बरोबरीमुळे एका गुणाची कमाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Gochar 2026: ग्रहांच्या राजकुमाराची बदलली चाल! बुधाच्या कृपेने धनलाभाचा योग; 3 नोव्हेंबरपासून सुरु होणार 'या' 5 राशींचा गोल्डन पिरियड

RBI Plastic Currency: 'आत्मनिर्भर भारता'चे आणखी एक पाऊल! केंद्र सरकारकडून 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांच्या छपाईला मंजुरी

Vasco Bus Stand Fish Selling: वास्को बसस्थानकावर मासेविक्रीचा त्रास; दुर्गंधीने प्रवासी हैराण, कारवाईची मागणी

E-Sakal: 'ई-सकाळ'चे निर्विवाद वर्चस्व! 55 मिलियन वाचकांसह पुन्हा ठरले नंबर 1

Ranji Trophy: रणजी करंडकात गोव्यावर पराभवाचे संकट; विदर्भाची 222 धावांची आघाडी, डावाने पराभव टाळण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT