Bandodkar Football Trophy 2024 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Bandodkar Football Trophy: एफसी गोवा उपांत्य फेरीत! ब्रिस्बेन रोअरवर निर्णायक विजय

Bhausaheb Bandodkar Memorial Trophy: ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन रोअरला नमवून गतविजेत्यांनी अ गटातून स्पर्धेची उपांत्य फेरीही निश्चित केली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सामन्याच्या पूर्वार्धात आर्मांद सादिकू याने नोंदविलेल्या निर्णायक गोलच्या बळावर एफसी गोवाने भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत विजयी घोडदौड राखली. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन रोअरला नमवून गतविजेत्यांनी अ गटातून स्पर्धेची उपांत्य फेरीही निश्चित केली. सामना मंगळवारी रात्री फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

ब्रिस्बेन रोअरला उत्तरार्धात दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्यांच्या बेंजामिन हॅलोरन याला पूर्वार्ध संपण्यापूर्वी भरपाई वेळेतील पहिल्या मिनिटास थेट रेड कार्ड दाखविण्यात आले. त्यानंतर अल्बानियाच्या सादिकू याने स्पर्धेतील वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत एफसी गोवाला ५१व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली.

नंतर देयान द्राझिच याचा झंझावाती फटका ब्रिस्बेन रोअरचा गोलरक्षक मॅकलिन फ्रेक याने अप्रतिमपणे अडविल्यामुळे एफसी गोवाच्या खाती आणखी एका गोलची नोंद होऊ शकली नाही. एक खेळाडू कमी होऊनही पिछाडीनंतर ब्रिस्बेन रोअरने मुसंडी मारली, पण नशिबाची साथ लाभली नाही आणि एफसी गोवाची आघाडी अबाधित राहिली.

अगोदरच्या लढतीत स्पोर्टिंग क्लबला चार गोलने हरवलेल्या एफसी गोवाचे आता दोन लढतीतून गटात सर्वाधिक सहा गुण झाले आहेत. धेंपो क्लबला ५-१ फरकाने नमवलेल्या ब्रिस्बेन रोअरचे दोन लढतीतून तीन गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ..हेच खरे गोमंतकीय! 75 वर्षांचे आजोबा बघताबघता चढताहेत झाडावर; गोव्याचे 'बाप्पा' होताहेत सोशल मीडियावर हिट

Goa Food Poisoning: बागा समुद्रकिनाऱ्यावर इडली-सांभार खाणं बेतलं जिवावर! केरळच्या 16 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

Crime News: इव्हेंटच्या कामासाठी बोलावलं अन् वासनेची शिकार बनवलं! मुंबईच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; राजस्थान पुन्हा हादरलं

अंमली पदार्थांच्या काळ्या पैशावर ED आणि NCB ची सर्जिकल स्ट्राईक! गोव्यासह 7 राज्यांतील 25 ठिकाणी छापेमारी; कोट्यवधींची रोकड जप्त

Mauni Amavasya 2026: मौनी अमावस्येला ग्रहांचा राजा आणि मनाचा स्वामी एकत्र, 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; उजळणार नशीब

SCROLL FOR NEXT