Professional League 2024 Canva
गोंयचें खेळामळ

Indian Super League: कोण मारणार बाजी? एफसी गोवाला कडवी टक्कर देणार चेन्नईयीन एफसी; फातोर्ड्यात रंगणार सामना

FC Goa vs Chennaiyin FC: चेन्नईयीन एफसी अखेरपर्यंत लढत देणारा संघ असल्याचे ध्यानात ठेवून एफसी गोवा संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील आणखी एका कठीण आव्हानासाठी सज्ज झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: चेन्नईयीन एफसी अखेरपर्यंत लढत देणारा संघ असल्याचे ध्यानात ठेवून एफसी गोवा संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील आणखी एका कठीण आव्हानासाठी सज्ज झाला आहे. सामना शनिवारी (ता. २५) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल.

चांगल्या कामगिरीबाबत एफसी गोवाचे (FC Goa) मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ आशावादी आहेत. ईस्ट बंगालविरुद्धच्या मागील निसटत्या विजयी सामन्यात आपला संघ चांगला खेळला नसला, तरी नव्या लढतीसाठी विजयी मानसिकतेनेच संघ शनिवारी मैदानात उतरेल, असे ५६ वर्षीय स्पॅनिश मार्गदर्शकाने शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. एफसी गोवा सलग ११ सामने अपराजित असून घरच्या मैदानावर त्यांनी मागील पाच लढतीत चार विजय नोंदविले आहेत. ‘‘चेन्नईयीन अखेरपर्यंत झुंज देणारा संघ आहे,’’ असे ते म्हणाले.

चेन्नईयीनला नमविल्यास एफसी गोवा (३० गुण) आणि अव्वल स्थानावरील मोहन बागान (३७ गुण) यांच्यात चार गुणांचा फरक राहील. चेन्नईयीन एफसी १८ गुणांसह सध्या दहाव्या क्रमांकावर आहेत. प्ले-ऑफ फेरी गाठण्यासाठी त्यांना एफसी गोवाविरुद्ध जिंकणे आवश्यक असेल.

मैदानात उतरण्यापूर्वी....

आयएसएल स्पर्धेतील २७ सामन्यांत एफसी गोवाचे १५, तर चेन्नईयीन एफसीचे ९ विजय, ३ लढती बरोबरीत

चेन्नईयीनविरुद्ध मागील ४ लढतीत एफसी गोवाचे ३ विजय व १ बरोबरी

पहिल्या टप्प्यात २४ ऑक्टोबर २०२४ रोजी चेन्नई येथे २-२ गोलबरोबरी

एफसी गोवा ११ सामने अपराजित, यामध्ये ७ विजय व ४ बरोबरी

घरच्या मैदानावर यंदा एफसी गोवाचे ८ सामने, ४ विजय, २ बरोबरी, २ पराभव

चेन्नईयीन सलग ५ लढती विजयाविना, ३ बरोबरी व २ पराभव

आयएसएलध्ये यंदा ओळीने १६ सामन्यांत गोल करण्याचा एफसी गोवाचा पराक्रम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

SCROLL FOR NEXT