पणजी: इंडियन फुटबॉल लीग (आयएफएल) स्पर्धेत धेंपो स्पोर्टस क्लबने विजयी घोडदौड कायम राखली. गोव्यातील संघाने गुरुवारी समलेश्वरी स्पोर्टिंग क्लबवर २-१ गोलफरकाने रोमांचक विजय मिळविला.
ओडिशातील राऊरकेला येथील बिरसा मुंडा अॅथलेटिक्स स्टेडियमवर झालेल्या सामन्यात धेंपो क्लबतर्फे कर्णधार रिचमंड क्वासी ओवुसू याने २८व्या, तर लक्ष्मणराव राणे याने ५८व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. यजमान समलेश्वरी स्पोर्टिंगचा एकमेव गोल कार्तिक चौधरी याने ८२व्या मिनिटाला नोंदविला.
भरपाई वेळेत समलेश्वरी स्पोर्टिंगला कॉर्नरवरून गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली; मात्र मोहम्मद एल जाऊआनी याला मिळालेल्या सोप्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करताआले नाही. धेंपो क्लबने सलग दुसरा विजय नोंदवत गुणसंख्या सहावर नेली. पहिल्या लढतीत त्यांनी बंगळूर युनायटेडला एका गोलने नमविले होते. त्यांचा पुढील सामना १५ नोव्हेंबरला फातोर्डा येथे चानमारी एफसीविरुद्ध होईल. समलेश्वरी स्पोर्टिंगला लागोपाठ दुसरा पराभव पत्करावा लागला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.