football Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Santosh Trophy: गतउपविजेत्या गोव्याला थेट मुख्य फेरीचं तिकीट; डिसेंबरमध्ये रंगणार संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा

Defending Champions Goa: हैदराबादला ७८व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीचे यजमानपद बहाल करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

हैदराबादला ७८व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीचे यजमानपद बहाल करण्यात आले आहे. यासंबंधी घोषणा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) बुदवारी नवी दिल्ली येथे केली. यजमान तेलंगणा, गतविजेते सेनादल, गतउपविजेते गोवा या संघांना थेट मुख्य फेरीत प्रवेश मिळाला असून त्यांच्यासमवेत इतर नऊ गटातील विजेते संघ खेळतील. मुख्य फेरी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे नियोजन आहे. गटवार स्पर्धा नोव्हेंबरमध्ये खेळली जाईल.

हैदराबादमध्ये ५७ वर्षांत प्रथमच भारतीय फुटबॉलमधील प्रतिष्ठेची स्पर्धा होत आहे. यापूर्वी १९६६-६७ मध्ये ‘सिटी ऑफ पर्ल्स’मध्ये संतोष करंडक स्पर्धा रंगली होती. तेव्हा रेल्वेने सेनादलास नमवून विजेतेपद पटकावले होते.

२०२३-२४ मोसमातील संतोष करंडक स्पर्धेची मुख्य फेरी अरुणाचल प्रदेशमध्ये झाली होती. ९ मार्च २०२४ रोजी झालेल्या अंतिम लढतीत सेनादलाने गोव्याला १-० फरकाने हरवून सातव्यांदा करंडक पटकावला होता. त्यामुळे गोव्याला नवव्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. गोव्याने ही स्पर्धा पाचवेळा जिंकली असून शेवटचे विजेतेपद २०१६-१७ मोसमात होते.

पात्रता फेरी गटवारी

अ गट ः जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब. ब गट ः चंडीगड, उत्तराखंड, हरियाना, दिल्ली. क गट ः उत्तर प्रदेश, झारखंड, बंगाल, बिहार. ड गट ः आसाम, सिक्कीम, मेघालय, त्रिपुरा. ई गट ः अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझारोम. फ गट ः मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा. ग गट ः तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, अंदमान-निकोबार. ह गट ः केरळ, पुदुचेरी, लक्षद्वीप, रेल्वे. ई गट ः महाराष्ट्र, गुजरात, दादरा-नगरहवेली आणि दमण-दीव, राजस्थान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

SCROLL FOR NEXT