Santosh Trophy: केरळ, सेनादलाचं असणार गोव्यासमोर तगड आव्हान; अरुणाचल प्रदेशविरुद्ध होणार पहिली लढत

77th Santosh Karandak National Football Tournament: साखळी फेरी 21 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत खेळली जाईल. गोव्याचा पहिला सामना यजमान संघाविरुद्ध होईल.
Football
Football Dainik Gomantak

77th Santosh Karandak National Football Tournament:

माजी विजेत्या गोव्याला 77 व्या संतोष करंडक राष्ट्रीय फटबॉल स्पर्धेचा साखळी फेरी टप्पा पार करण्यापूर्वी केरळ, सेनादल या तगड्या प्रतिस्पर्ध्यांच्या बलाढ्य आव्हानास सामोरे जावे लागले. स्पर्धेची मुख्य फेरी 21 फेब्रुवारीपासून अरुणाचल प्रदेशमध्ये खेळली जाईल.

गोव्याचा समावेश असलेल्या ‘अ’ गटात केरळ, सेनादल यांच्याव्यतिरिक्त अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम या संघांचा समावेश आहे. साखळी फेरी 21 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत खेळली जाईल. गोव्याचा पहिला सामना यजमान संघाविरुद्ध होईल.

गोवा फुटबॉल असोसिएशनने स्पर्धेसाठी शनिवारी संघ जाहीर केला

गोव्याचा संघ: गोलरक्षक: आंतोनियो डायलन दा सिल्वा, सनिज बुगडे, ओझेन सिल्वा, बचावफळी: ज्योएल कुलासो, डॅनियल गोम्स, जोसेफ क्लेमेंत, दिशांक कुंकळीकर, उमंग गायकवाड, महंमद अली, मध्यफळी: लक्ष्मणराव राणे, विनय हरजी, व्हेलिंग्टन फर्नांडिस, दत्तराज गावकर, डेल्टन कुलासो, नेसियो फर्नांडिस, ज्योबर्न कार्दोझ, श्रीधरनाथ गावस, लीवन कास्ताना, आघाडीफळी: महंमद फाहीज, लॉईड कार्दोझ, क्लेन्सियो पिंटो, जोशुआ डिसिल्वा. संघ अधिकारी: मुख्य प्रशिक्षक: चार्ल्स डासय, व्यवस्थापक: संजीव नागवेकर, साहाय्यक प्रशिक्षक: सेव्हेरिन फर्नांडिस, फिजिओ: ॲरन रॉड्रिग्ज, तांत्रिक संचालक: मारियान डायस.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com