Goa Sports Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Sports: 'गोव्यातून ऑलिंपियन घडवायचाय'; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे मोठे लक्ष्य, क्रीडा शिक्षकांना संघटनांशी समन्वय साधण्याचे आवाहन

Goa Olympians Development: क्रीडापटू घडविण्याच्या उद्देशाने राज्य क्रीडा संघटना आणि क्रीडा (शारीरिक शिक्षण) शिक्षकांनी समन्वय साधून काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: क्रीडापटू घडविण्याच्या उद्देशाने राज्य क्रीडा संघटना आणि क्रीडा (शारीरिक शिक्षण) शिक्षकांनी समन्वय साधून काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी केले. राज्यातून ऑलिंपियन खेळाडू तयार करण्याचे लक्ष्यही त्यांनी जाहीर केले. क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाने गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने शनिवारी राष्ट्रीय क्रीडादिन कार्यक्रम कांपाल येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये घेतला होता.

महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी देशभर २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडादिन साजरा केला होता. गोव्यातील मुख्य कार्यक्रमाला क्रीडामंत्री रमेश तवडकर, क्रीडा सचिव संतोष सुखदेवे, क्रीडा संचालक अजय गावडे, गोवा फुटबॉल विकास परिषदेचे उपाध्यक्ष धाकू मडकईकर, तसेच गोव्याचे दोन्ही अर्जुन पुरस्कार विजेते ‘पद्मश्री’ ब्रह्मानंद शंखवाळकर व ब्रुनो कुतिन्हो यांनी उपस्थिती होती. यावेळी शालेय-उच्च माध्यमिक विद्यालय पातळीवरील क्रीडा स्पर्धांतील यशस्वी खेळाडूंना बक्षिसे वितरित करण्यात आली.

तीन वर्षांपासून बक्षिसे प्रलंबित होती. भाषणात मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, की ``शालेय (क्रीडा) पातळीवर मुलांना तयार करण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी विविध क्रीडा संघटनांशी समन्वय साधण्यावर भर देणे गरजेचे आहे. शिक्षणातील कारकीर्द महत्त्वाची आहेच, त्याचवेळी खेळातील कारकीर्दही अत्यावश्यक आहे. खेळाकडे दुय्यम नजरेने पाहू नका. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी तयारी करताना खेळाडू, संघटनांना गोवा सरकार आर्थिक आणि साधनसुविधांच्या बाबतीत आवश्यक मदत करेल. यासंदर्भात माझी क्रीडामंत्री तवडकर यांच्याशी चर्चा झालेली आहे. राष्ट्रीय पातळीवर गोमंतकीय खेळाडू खेळणे ही अभिमानास्पद बाब आहे.

गोव्यात खेळांसाठी चांगली वातावरण निर्मिती

``आमची मुले खेळली, तरच भारत जिंकेल हे ध्यानात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलेगा इंडिया, जीतेगा इंडिया ही मोहीम सुरू केली आहे. ऑलिंपिक २०३६ मध्ये भारतात झाल्यास त्याची तयारी आतापासून आवश्यक असल्याचा संदेशही पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे. गोव्यात सरकारने खेळांसाठी चांगली वातावरण निर्मिती केली आहे. साधनसुविधाही चांगल्या प्रकारे विकसित झालेल्या आहेत,`` असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT