Cooch Behar Trophy | Goa vs Madhya Pradesh  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Cooch Behar Trophy 2025: डाव गडगडला! 6 विकेट्स 37 धावांत गमावल्या; उपांत्यपूर्व लढतीत गोव्याची निराशाजनक फलंदाजी

Goa vs Madhya Pradesh: कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व लढतीत निराशाजनक फलंदाजीमुळे गोव्याच्या पहिल्या दिवशी नुकसान झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व लढतीत निराशाजनक फलंदाजीमुळे गोव्याच्या पहिल्या दिवशी नुकसान झाले. मध्य प्रदेशविरुद्ध अखेरच्या सहा विकेट अवघ्या ३७ धावांत गमावल्यामुळे यजमानांचा पहिला डाव १६४ धावांत संपुष्टात आला.

कोटार्ली-सांगे येथील जीसीए मैदानावर गुरुवारपासून चार दिवसीय सामन्यात सुरवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर मध्य प्रदेशने चार षटकांत १ बाद १२ धावा केल्या होत्या. जलदगती गोलंदाज समर्थ राणे याने सलामीच्या हर्षित दुबे याला त्रिफळाचीत बाद केल्यामुळे यजमानांना दिलासा मिळाला.

गोव्याच्या डावात आराध्य गोयल (५०) याने चिवट अर्धशतक नोंदविताना दिशांक मिस्कीन (४४) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली, त्यामुळे गोव्याला किमान दीडशतक पार केल्याचे समाधान लाभले.

एलिट गटातील या लढतीत मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून गोव्यास प्रथम फलंदाजीस पाचारण केले. त्यांची सुरवात अतिशय खराब ठरली. डावातील पहिल्याच चेंडूवर आदित्य कोटा याच्या यष्टीचा युवराजसिंग कांग याने वेध घेतला.

लगेच ३ बाद २४ व नंतर ४ बाद ५१ अशी स्थिती झाल्यानंतर गोव्याचा डाव लवकर गुंडाळणार अशी स्थिती असताना दिशांक व आराध्य यांनी संघाला सावरले. दिशांकला अर्धशतकास सहा धावा कमी पडल्या. १४७ चेंडूंतील खेळीत त्याने सहा चौकार मारले.

ऑफस्पिनर यशवर्धनसिंग चौहान याने त्याला बाद केले. दिशांक संघाची धावसंख्या १२७ इतकी असताना पाचव्या विकेटच्या रुपाने बाद झाला. त्यानंतर गोव्याच्या फलंदाजांनी मध्य प्रदेशच्या फिरकी माऱ्यासमोर नमते घेतले. आराध्य गोव्याची आठवी विकेट ठरला. त्याला डावखुरा फिरकी गोलंदाज प्रतीक शुक्ला याने त्रिफळाचीत बाद केले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ८२.५ षटकांत सर्वबाद १६४ (आदित्य कोटा ०, सार्थक भिके ३१, शंतनू नेवगी ७, यश कसवणकर ०, दिशांक मिस्कीन ४४, आराध्य गोयल ५०, साई नाईक १, चिगुरुपती व्यंकट ६, मिहीर कुडाळकर १२, शिवेन बोरकर ४, समर्थ राणे नाबाद ४, आयुष शुक्ला २-२१, यशवर्धनसिंग चौहान ३-३४, प्रतीक शुक्ला २-१३).

मध्य प्रदेश, पहिला डाव ः ४ षटकांत १ बाद १२ (हर्षित दुबे ४, हर्षित यादव नाबाद ७, आयाम सारादाना नाबाद १, समर्थ राणे २-१-४-१, चिगुरुपती व्यंकट २-०-८-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पुण्याच्या मैदानात 'रॉयल' एन्ट्री! IPL 2026 साठी गहुंजे स्टेडियम सज्ज; 'या' संघाचे सर्व होम मॅचेस पुण्यात रंगणार

Viral Video: सचिन तेंडुलकरची लेक 'सारा'च्या हातात बिअरची बाटली? गोव्यातील रस्त्यावरुन फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Goa Politics: ‘क्रॉस व्होटिंग’मध्ये कॉंग्रेसचाच हात! आमदार सिल्वा यांचा आरोप; विजय मिळाला नसला तरी लढत दिल्याचा दावा

Bodgeshwar Jatra: "पूर्वी म्हापशात जत्रेचा फलक पाठीवर घेऊन, ढोल-ताशा वाजवत दवंडी पिटली जायची"; बोडगेश्वर जत्रेचा इतिहास

Tillari Canal: ‘तिळारी’च्या पाण्याचा होणार प्रभावी वापर! सल्लागार नियुक्तीची निविदा; 64 गावांचे सखोल विश्लेषण केले जाणार

SCROLL FOR NEXT