Goa Vs Chhattisgarh | Cooch Behar Trophy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

Goa Vs Chhattisgarh: कर्णधार विकल्प तिवारी (५०) याच्या अर्धशतकामुळे छत्तीसगडला शतक गाठता आले, मात्र नंतर ८ बाद १०३ अशी बिकट स्थिती झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मध्यमगती गोलंदाज चिगुरुपती व्यंकट याच्या भेदक माऱ्यासमोर छत्तीसगडची आठव्या षटकात ५ बाद २७ धावा अशी दाणादाण उडाली होती, मात्र नंतर गोव्याने पकड गमावल्यामुळे कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात यजमान संघाने १७० धावांपर्यंत मजल मारली, नंतर पहिल्या दिवसअखेर पाहुण्यांची ४ बाद ८७ अशी घसरण झाली.

एलिट ब गटातील रविवारपासून छत्तीसगडमधील भिलाई येथे सुरवात झाली. व्यंकट याने २९ धावांत ५ गडी टिपले. कर्णधार विकल्प तिवारी (५०) याच्या अर्धशतकामुळे छत्तीसगडला शतक गाठता आले, मात्र नंतर ८ बाद १०३ अशी बिकट स्थिती झाली.

नवव्या विकेटसाठी आदित्य अगरवाल (४१) व शिवम यादव (नाबाद २३) यांनी ६३ धावांची भागीदारी केल्यामुळे यजमान संघाला पावणेदोनशे धावांच्या जवळ जाता आले. गोव्याची सुरवात खराब झाली. सार्थक भिके व आदित्य कोटा हे दोघेही सलामीचे फलंदाज १८ धावांत मागे फिरले. कर्णधार यश कसवणकर (नाबाद ३७) व शंतनू नेवगी (२१) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी करून संघाला सावरले.

संक्षिप्त धावफलक : छत्तीसगड, पहिला डाव ः ६१.१ षटकांत सर्वबाद १७० (विकल्प तिवारी ५०, आदित्य अग्रवाल ४१, शिवम यादव नाबाद २३, समर्थ राणे ९-२-३६-१, चिगुरुपती व्यंकट ९-२-२९-५, यश कसवणकर २४-४-४७-२, मिहीर कुडाळकर १४-३-३४-१, शिवेन बोरकर ५.१-०-१९-१). गोवा, पहिला डाव ः २८ षटकांत ४ बाद ८७ (सार्थक भिके ७, आदित्य कोटा २, शंतनू नेवगी २१, यश कसवणकर नाबाद ३७, दिशांक मिस्कीन १५, मिहीर कुडाळकर नाबाद ०, रुद्रप्रताप देहारी २-२८).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA: फक्त दंडच नाही, दुकानेही बंद! 2026 साठी ‘एफडीए’ सज्ज; अन्नपदार्थांची होणार कसून तपासणी

Canacona School Bus Fire: काणकोणात स्कूलबसला भीषण आग! बस संपूर्णपणे भस्मभात; सुदैवाने जीवितहानी टळली

Goa Politics: खरी कुजबुज; काय? काणकोणकरांना तिसरा जिल्हा नकोय?

'विकासासाठी पाठिंबा दिला तर अतिशयोक्ती नव्हे'! अपक्ष पालयेकरांबाबत दामूंची प्रतिक्रिया; विरोधकांनाही विकासाचा अधिकार असल्याचा दावा

ODI Cricket Worldcup: 2027 वर्ल्डकप शेवट! 'विराट-रोहित' नंतर वनडे क्रिकेट धोक्यात; प्रसिद्ध माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने माजली खळबळ

SCROLL FOR NEXT