ISL Football Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL Football: 2 स्पॅनिश खेळाडूंचे गोल, नॉर्थईस्टचा विजय! चर्चिल ब्रदर्सची पराभवाची हॅट्ट्रिक; 4 सामन्यांत 10 गोल स्वीकारले

Churchill Brothers vs NorthEast United ISL Match: नॉर्थईस्ट युनायटेडला पूर्ण तीन गुण मिळवून देणारे दोन्ही गोल त्यांच्या स्पॅनिश खेळाडूंनी नोंदविले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पदार्पणाचा मोसम खेळणाऱ्या गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सला गुरुवारी घरच्या मैदानावर सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर २-० असा विजय नोंदवत गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेडने शानदार घोडदौड राखली.

नॉर्थईस्ट युनायटेडला पूर्ण तीन गुण मिळवून देणारे दोन्ही गोल त्यांच्या स्पॅनिश खेळाडूंनी नोंदविले. इथ्यान गोन्झालेझ याने १६व्या मिनिटास गोल केल्यानंतर भरपाई वेळेतील तिसऱ्या मिनिटाला (९०+३) अँटोनियो मोयानोने दुसरा गोल नोंदवून संघाचा विजयावर शिक्कामोर्तब केले.

यासह सामना पाहण्यासाठी खास स्टेडियमवर उपस्थित हिंदी चित्रपट अभिनेता व संघाचा मालक जॉन अब्राहम याला आगळी भेट प्राप्त झाली. स्पर्धेतील तिसऱ्या विजयामुळे नॉर्थईस्ट युनायटेडचे पाच सामन्यांतून ११ गुण झाले आहे, तर चार लढतीनंतर चर्चिल ब्रदर्सचे तीन गुण कायम राहिले.

बचावातील त्रुटींचा फटका

चर्चिल ब्रदर्सला बचावातील त्रुटींचा फटका बसत आहे. त्यांनी स्पर्धेतील चार सामन्यांत तब्बल १० गोल स्वीकारले आहेत. आता फिफा वेळापत्रक कालावधीमुळे आयएसएल स्पर्धा खंडित होईल, त्यानंतर चर्चिल ब्रदर्सची मोहीम पुन्हा सुरू होईल. त्यांचा पुढील सामना फातोर्डा येथेच मोहन बागानविरुद्ध २२ नोव्हेंबरला खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: क्रिकेटच्या मैदानावर थरारक घटना! क्षेत्ररक्षण करताना खेळाडूचा पाय घसरला; वेदनेने विव्हळत मैदानातच पडला, स्ट्रेचरवरून न्यावे लागले बाहेर

Goa Government Employees: 18 वर्षे वेतन आयोग बदललाच नाही! सातव्या वेतन आयोगासाठी पंचायत कर्मचाऱ्यांचा डिसेंबरपासून एल्गार

Shavina Shirodkar Controversy: शविना शिरोडकर प्रकरण तापले! माफीवरून वाद कायम; अजय खोलकरांविरोधात केपे पोलिसांत तक्रार

Indian Super League: घरच्या मैदानावर विजयाची प्रतीक्षा संपणार? बंगळूर एफसीविरुद्ध एफसी गोव्याची कसोटी; 3 गुणांचे लक्ष्य

PoK मध्ये पाकिस्तानी सैन्याचा रक्तरंजित थरार! भीषण गोळीबारात 4 बालकांसह 18 जणांचा मृत्यू; जखमींना उचलणाऱ्यांवरही झाडल्या गोळ्या

SCROLL FOR NEXT