I League Churchill Brothers  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Churchill Brothers: चर्चिल ब्रदर्सला आणखी एक फटका, AIFF परवाना प्रक्रियेत संघ नापास; I League करंडकाचा निर्णय अजून प्रलंबित

I League Trophy: मुंबई सिटी एफसी, मोहन बागान सुपर जायंट्स, बंगळूर एफसी, जमशेदपूर एफसी, एफसी गोवा, चेन्नईयीन एफसी, ईस्ट बंगाल एफसी या सात क्लबना निर्बंधांसह परवाना मंजूर झाला.

Sameer Panditrao

पणजी: चर्चिल ब्रदर्स, की इंटर काशी संघ आय-लीग फुटबॉल विजेते ठरणार याबाबत कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टस (सीएएस) यांच्या निवाड्यानंतर निश्चिती होईल, पण त्यापूर्वी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) क्लब परवाना समितीने घेतलेल्या २०२५-२६ प्रीमियर १ परवाना प्रक्रियेत दोन्ही संघ नापास ठरले आहेत.

एकूण १५ क्लबसाठीची परवाना मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एआयएफएफने अहवाल जाहीर केला आहे, त्यानुसार कोणत्याही निर्बंधांशिवाय फक्त पंजाब एफसीलाच परवाना मंजूर झालेला आहे.

मुंबई सिटी एफसी, मोहन बागान सुपर जायंट्स, बंगळूर एफसी, जमशेदपूर एफसी, एफसी गोवा, चेन्नईयीन एफसी, ईस्ट बंगाल एफसी या सात क्लबना निर्बंधांसह परवाना मंजूर झाला आहे. ब निकष प्रक्रियेत काही किरकोळ अपूर्णता राहिल्यामुळे या क्लबना निर्बंधांसह परवाना देण्यात आला.

जमशेदपूर एफसी, केरळा ब्लास्टर्स, ओडिशा एफसी, नॉर्थईस्ट युनायटेड, मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लब, चर्चिल ब्रदर्स एफसी गोवा व इंटर काशी या सात क्लबना परवाना नाकारण्यात आला आहे. परवाना अ आणि ब निकष पात्रतेत या क्लबना भरपूर प्रमाणात अपयश आल्याने परवाना मंजूर झालेला नाही. ज्या क्लबच्या अर्जांना नकार देण्यात आला आहे, त्या क्लबने निर्णयाविरोधात अपील करण्याचा किंवा लागू असलेल्या परवाना नियमानुसार राष्ट्रीय क्लब स्पर्धा सहभागासाठी अपवाद मागण्याचा अधिकार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT