I League Trophy: चर्चिल ब्रदर्सकडून आय-लीग ट्रॉफी परत मागितली, AIFF चा आदेश; करंडक दिल्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित

I League 2025 Winner: एआयएफएफचे उप महासचिव एम. सत्यनारायण यांनी चर्चिल ब्रदर्सच्या खेळाडूंना ट्रॉफी दिली आणि नंतर सांगितले की, सीएएसच्या आदेशाची माहिती सोहळ्यानंतर मिळाली.
I League Trophy 2025
I League 2025 WinnerDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: अखिल इंडिया फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) सोमवारी चर्चिल ब्रदर्स क्लबला दिलेली आय-लीग ट्रॉफी परत करण्यास सांगितले, तर गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (सीएएस) च्या स्थगिती आदेशानंतरही करंडक दिल्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

रविवारी, स्वित्झर्लंडस्थित सीएएस ने चर्चिल ब्रदर्सना आय-लीग विजेता जाहीर करण्याच्या एआयएफएफ च्या निर्णयावर स्थगिती दिली आणि कोणतीही औपचारिक पदक वितरण सोहळा घेण्यास बंदी घातली होती. तरीही राष्ट्रीय महासंघाने चर्चिल ब्रदर्सला विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान केली.

एआयएफएफचे उप महासचिव एम. सत्यनारायण यांनी चर्चिल ब्रदर्सच्या खेळाडूंना ट्रॉफी दिली आणि नंतर सांगितले की, सीएएसच्या आदेशाची माहिती सोहळ्यानंतर मिळाली, कारण रविवार असल्याने सचिवालय बंद होते. मात्र सोमवारी एआयएफएफला चर्चिल ब्रदर्सकडे ट्रॉफी परत मागावी लागली.

एआयएफएफच्या एका अधिकाऱ्याने नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले, "सोमवारी आम्ही चर्चिल ब्रदर्सना आय-लीग ट्रॉफी परत करण्यासाठी पत्र लिहिले आहे. आम्हाला सीएएसच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे.सीएएसचा निर्णय घेईल त्यानंतर ट्रॉफी पुन्हा दिली जाईल."

दरम्यान, जीएफए चे अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी सोमवारी एआयएफएफ कार्यकारी समितीच्या सदस्यांना पत्र लिहून सीएएस च्या आदेशाच्या संभाव्य दुर्लक्षावर "तत्काळ चौकशी" करण्याची मागणी केली.

I League Trophy 2025
I League Trophy: चर्चिल ब्रदर्सने 12 वर्षांनंतर आय-लीग फुटबॉल स्पर्धेत पटकावले जेतेपद

त्यांनी पत्रात लिहिले, "सीएएस च्या आदेशाचे दुर्लक्ष करून ट्रॉफी वितरण केल्याने एआयएफएफ ची मोठी नाचक्की झाली आहे. सीएएस च्या आदेशाचे उल्लंघन केल्यास एआयएफएफ व भारतीय फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, मी कार्यकारी समितीच्या सदस्यांना ही बाब अत्यंत गांभीर्याने घेण्याचे आवाहन करतो. या घटनेची सर्वसमावेशक आणि निष्पक्ष चौकशी तात्काळ सुरू केली पाहिजे."

फर्नांडिस यांनी असा दावाही केला की, त्यांना ट्रॉफी वितरणासंबंधीची कोणतीही पुढील माहिती मिळाली नाही, जरी सुरुवातीला त्यांना २७ एप्रिल रोजी होणाऱ्या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

I League Trophy 2025
I League: चर्चिल ब्रदर्सला करंडक प्रदान, पण विजेतेपदास पुन्हा स्थगिती; आय-लीग विजेतेपदाचा घोळ मिटेना

त्यांनी सांगितले, "२६ एप्रिलच्या संध्याकाळी मला श्री. सत्यनारायण यांच्याकडून ईमेल मिळाला होता, ज्यात मला गोव्यातील ट्रॉफी वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण होते. मात्र, नंतर कोणतीही माहिती मिळाली नाही आणि नंतर कळले की सोहळा जीएफएच्या सहभागाशिवाय पार पडला आहे." फर्नांडिस यांनी जीएफएसोबत झालेल्या "अस्वीकार्य वागणुकी"वरही नाराजी व्यक्त केली आणि चौकशीची मागणी केली.

फर्नांडिस यांच्या आरोपांवर सत्यनारायण यांनी उत्तर देताना सांगितले, "ही घडामोड अनवधानाने घडली. मूळ योजना २६ एप्रिलला ट्रॉफी देण्याची होती, परंतु चर्चिलने ती २७ एप्रिलला करण्यास सांगितले. त्यांनी सुरुवातीला कोणतेही स्थळ सांगितले नव्हते. मी गोव्यात पोहोचल्यावर थेट स्थळी जाऊन ट्रॉफी दिली. त्यामुळे फर्नांडिस यांना गैरसोय होईल असा कोणताही हेतू नव्हता." चर्चिल ब्रदर्सने ६ एप्रिलला संपलेल्या अंतिम फेरीनंतर ४० गुणांसह तात्पुरते पहिले स्थान पटकावले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com