Goa Vs Baroda Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

C K Nayudu Trophy: गोव्याची पुन्हा एकदा हाराकिरी! बडोद्याविरुद्ध 236 धावांनी गमावला सामना; 4 सामन्यांतील दुसरा पराभव

Goa Vs Baroda Cricket : कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील एलिट अ सामन्यात गोव्याला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी ः कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील एलिट अ सामन्यात गोव्याला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. आता पुढील लढतीत बलाढ्य पंजाबचे आव्हान असेल.

गोवा व बडोदा यांच्यातील चार दिवसीय सामना कोटार्ली-सांगे येथील जीसीए मैदानावर झाला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी बडोद्याने दुसरा डाव ९ बाद ३३० धावांवर घोषित करून पहिल्या डावातील ४६ धावांच्या आघाडीसह गोव्यासमोर ३७६ लक्ष्य ठेवले.

आव्हान कठीण होते, परंतु सुमारे सव्वादोन सत्रे टिच्चून फलंदाजी करण्यात गोव्याला अपयश आले. त्यांचा दुसरा डाव अवघ्या १४० धावांत संपुष्टात आल्यामुळे सामना २३६ धावांनी गमवावा लागला. गोव्याचा हा स्पर्धेतील चार सामन्यांतील दुसरा पराभव ठरला. बडोद्याचा हा स्पर्धेतील तिसरा विजय आहे. या गटात गोव्याने आतापर्यंत २० गुण मिळवलेले आहेत.

एलिट ‘अ’ गटात गोवा २० गुणांवर

गोव्याचा स्पर्धेतील पुढील सामना सांगे येथेच एलिट अ गटात अव्वल स्थानी असलेल्या पंजाबविरुद्ध ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत खेळला जाईल.  एलिट अ गटात प्रत्येकी ४ सामन्यानंतर पंजाबचे सर्वाधिक ४४ गुण झाले आहेत, त्यानंतर बडोद्याचे ४३, झारखंडचे ४०, जम्मू-काश्मीरचे २४, गुजरातचे २२, केरळचे २१, गोव्याचे २०, तर मेघालयाचे १३ गुण झाले आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT