Aryan Narvekar Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

C K Naidu Trophy: गोव्याची पोरं दिल्लीवर भारी! आर्यनच्या शानदार फलंदाजीने उडवले होश; दुसरा दिवस 'यजमानांचा'

Goa Vs Delhi: पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोव्याने आर्यनच्या 93 धावांच्या बळावर पहिल्या डावात 337 धावा केल्या.

किशोर पेटकर

पणजी: शतक सात धावांनी हुकलेल्या आर्यन नार्वेकरची शानदार फलंदाजी, तसेच शिवम प्रताप सिंग व लखमेश पावणे यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर कर्नल सी. के. नायडू करंडक 23 वर्षांखालील क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी गोव्याने दिल्लीवर वर्चस्व राखले, पण अखेरच्या सत्रात मयंक गुसैन व क्रिश यादव यांची अभेद्य भागीदारी यजमानांना सलणारी ठरली.

दरम्यान, पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोव्याने आर्यनच्या 93 धावांच्या बळावर पहिल्या डावात 337 धावा केल्या. सर्वांत शेवटी बाद झालेल्या आर्यनने 220 चेंडूंतील खेळीत 11 चौकार व दोन षटकार मारले.

त्यानंतर दिवसअखेर दिल्लीने 5 बाद 201 धावा केल्या. ते अजून 136 धावांनी मागे आहेत, पण त्यांना मयंक (66) व क्रिश (53) यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या 95 धावांच्या नाबाद भागीदारीमुळे दिलासा मिळाला.

बिनबाद 49 वरून शिवम व लखमेश या वेगवान जोडगोळीने दिल्लीची स्थिती 3 बाद 50 व नंतर 4 बाद 60 अशी नाजूक केली. नंतर मयंक याने अर्पित राणा (47) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केल्यामुळे दिल्लीला (Delhi) शतक ओलांडता आले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव (5 बाद 248 वरुन): 126.5 षटकांत सर्वबाद 337 (आर्यन नार्वेकर 93, लखमेश पावणे 15, शदाब खान 0, शिवम प्रताप सिंग 4, रुद्रेश शर्मा नाबाद 1, आयुष सिंग 2-55, यतीश सिंग 4-112, अर्पित राणा 2-28).

दिल्ली, पहिला डाव: 48 षटकांत 5 बाद 201 (अर्पित राणा 47, प्रियांश आर्या 25, मयंक गुसैन नाबाद 66, क्रिश यादव नाबाद 53, शदाब खान 8-0-43-0, लखमेश पावणे 14-1-60-2, शिवम प्रताप सिंग 11-2-35-3, कौशल हट्टंगडी 4-0-15-0, रुद्रेश शर्मा 9-0-43-0, अझान थोटा 2-0-5-0).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT