Borja Herrera  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Indian Super League: हेर्रेराचा गोल ठरला निर्णायक! एफसी गोवा नॉर्थईस्ट युनायटेडला बरोबरीत रोखलं

FC Goa Vs Northeast United: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल लढतीत बोर्हा हेर्रेरा याच्या भरपाई वेळेतील डाव्या पायाच्या सणसणतील फटक्यावरील गोलमुळे एफसी गोवाने पिछाडीवरून बरोबरी साधली.

गोमन्तक डिजिटल टीम

इंडियन सुपर लीग: अतिशय रंगतदार आणि वेगवान ठरलेल्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल लढतीत बोर्हा हेर्रेरा याच्या भरपाई वेळेतील डाव्या पायाच्या सणसणतील फटक्यावरील गोलमुळे एफसी गोवाने पिछाडीवरून बरोबरी साधली. त्यांनी धोकादायक नॉर्थईस्ट युनायटेडला ३-३ गोलबरोबरीत रोखले.

एकूण सहा गोल झालेला अटीतटीचा सामना शुक्रवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. ईस्ट बंगालविरुद्ध हॅटट्रिक साधलेला स्पॅनिश खेळाडू हेर्रेरा याने ताकदवान फटक्यावर नॉर्थईस्टचा गोलरक्षक गुरमीत सिंग याला सावरण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे एफसी गोवाला घरच्या मैदानावर पराभव टाळता आला. सर्बियन देयान द्राझिच याच्या असिस्टवर बरोबरीचा हा गोल ९०+४ व्या मिनिटास झाला. त्यानंतर ९०+८ व्या मिनिटास सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे नॉर्थईस्टच्या रॉबिन यादव याला रेड कार्ड मिळाले.

सामन्यातील सुरवातच आक्रमक ठरली. सहाव्या मिनिटास स्पॅनिश नेस्टर अल्बियाच याने डाव्या पायाच्या वेगवान फटक्यावर नॉर्थईस्टला आघाडी मिळवून दिली. ४५+२व्या मिनिटास दुखापतीनंतर संघात आलेल्या अल्बानियाच्या आर्मांदो सादिकू याने पेनल्टी फटक्यावर एफसी गोवास बरोबरी साधून दिली. पेनल्टी क्षेत्रात एफसी गोव्याच्या देयान द्राझिच याला पाडणे गुवाहाटीतील संघासाठी नुकसानकारक ठरले.

उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर ४७व्या मिनिटास सादिकू याने शानदार मैदानी गोलवर यजमान संघाला सामन्यात आघाडी मिळवून दिली. मात्र नंतर नॉर्थईस्ट युनायटेडने जोरदार मुसंडी मारताना पाच मिनिटांत दोन गोल नोंदवून सामन्यात वर्चस्व प्रस्थापित केले. ५१व्या मिनिटास नेस्टर याने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल केला, तर मोरोक्कन खेळाडू अलाएद्दीन अजारेई याने डाव्या पायाच्या भन्नाट फटक्यावर नॉर्थईस्टला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.

एफसी गोवा व नॉर्थईस्ट युनायटेड यांची ही यंदा स्पर्धेतील दुसरी बरोबरी ठरली. त्यामुळे प्रत्येकी चार सामने खेळल्यानंतर त्यांचे समान पाच गुण झाले आहेत. एफसी गोवाचा स्पर्धेतील पुढील सामना १९ ऑक्टोबर रोजी फातोर्डा येथे मुंबई सिटीविरुद्ध होईल.

निकाल

एफसी गोवा ३ (आर्मांदो सादिकू ४५+२ पेनल्टी, ४७वे मिनिट, बोर्हा हेर्रेरा ९०+४ मिनिटा) बरोबरी विरुद्ध नॉर्थईस्ट युनायटेड ३ (नेस्टर अल्बियाच ६ व ५१वे मिनिट, अलाएद्दीन अजारेई ५६वे मिनिट).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT