Indian Super League: हेर्रेराची हॅटट्रिक एफसी गोवासाठी ठरली 'निर्णायक'; ईस्ट बंगालला चारली पराभवाची धूळ!

FC Goa beat East Bengal: स्पॅनिश खेळाडू बोर्हा हेर्रेरा याच्या प्रेक्षणीय हॅटट्रिकच्या बळावर एफसी गोवाने अखेर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या अकराव्या मोसमातील पहिला विजय नोंदविला.
Indian Super League: हेर्रेराची हॅटट्रिक एफसी गोवासाठी ठरली 'निर्णायक'; ईस्ट बंगालला चारली पराभवाची धूळ!
Borja HerreraDainik Gomantak
Published on
Updated on

स्पॅनिश खेळाडू बोर्हा हेर्रेरा याच्या प्रेक्षणीय हॅटट्रिकच्या बळावर एफसी गोवाने अखेर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या अकराव्या मोसमातील पहिला विजय नोंदविला. अखेरची नऊ मिनिटे दहा खेळाडूंसह खेळत मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने ईस्ट बंगालला ३-२ असे नमविले.

सामना शुक्रवारी रात्री कोलकता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर झाला. जखमी आर्मांदो सादिकू याच्या अनुपस्थितीत आक्रमणाची धुरा वाहिलेल्या ३१ वर्षीय हेर्रेरा याने अनुक्रमे १३, २० व ७१व्या मिनिटास गोल करून एफसी गोवातर्फे मोसमातील पहिली हॅटट्रिक नोंदविली. ८१व्या मिनिटास बचावपटू कार्ल मॅकह्यू याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले आणि एफसी गोवास दहा खेळाडूंसह बाकी कालावधीत खेळावे लागले.

Indian Super League: हेर्रेराची हॅटट्रिक एफसी गोवासाठी ठरली 'निर्णायक'; ईस्ट बंगालला चारली पराभवाची धूळ!
Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

प्रतिस्पर्ध्यांचा एक खेळाडू कमी झाल्याचा लाभ उठवत बदली खेळाडू डेव्हिड लाल्हलानसांगा याने ८५व्या मिनिटास ईस्ट बंगालची पिछाडी २-३ अशी कमी केली. त्यानंतर त्यांनी बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले, पण यजमान संघाला आणखी गोल करता आला नाही. त्यापूर्वी, २९व्या मिनिटास तलाल मादिह याने पेनल्टी फटक्यावर ईस्ट बंगालसाठी गोल केला होता. पूर्वार्धात एफसी गोवा संघ २-१ असा आघाडीवर होता. एफसी गोवाचे तीन लढतीनंतर चार गुण झाले आहेत. त्यांचा पुढील सामना चार ऑक्टोबर रोजी फातोर्डा येथे नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध होईल. कार्ल्स कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगालला ओळीने तिसरा पराभव पत्करावा लागला.

सलग पाचव्यांदा बाजी

आयएसएल फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाने ईस्ट बंगालविरुद्ध सलग पाचवा विजय नोंदविला. एकंदरीत आयएसएलमधील नऊ लढतीत एफसी गोवाने ईस्ट बंगालविरुद्ध नोंदविलेला हा सहावा विजय असून त्यांनी फक्त एक पराभव पत्करला आहे. दोन लढती बरोबरीत राहिल्या आहेत.

Indian Super League: हेर्रेराची हॅटट्रिक एफसी गोवासाठी ठरली 'निर्णायक'; ईस्ट बंगालला चारली पराभवाची धूळ!
Indian Super League: आयएसएल फुटबॉल स्पर्धेचा अकरावा सीझन १३ सप्टेंबरपासून; एफसी गोवाचा पहिला सामना जमशेदपूरविरुद्ध

सर्वप्रथम ३५० गोल

आयएसएल फुटबॉल स्पर्धेत सर्वप्रथम साडेतीनशे गोल नोंदविण्याचा पराक्रम शुक्रवारी रात्री एफसी गोवा संघाने साधला. बोर्हा हेर्रेराच्या सामन्यातील तीन गोलसह एफसी गोवाची स्पर्धेतील एकूण गोलसंख्या ३५१ झाली आहे. ही किमया साधणारा स्पर्धेतील पहिला संघ हा मान त्यांना मिळाला. स्पर्धेत अवे मैदानावर त्यांनी १२८ गोल केले आहेत. हेर्रेरा याची हॅटट्रिक एफसी गोवातर्फे आयएसएलमधील एकंदरीत नववी ठरली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com