FC Goa|Bandodkar Trophy 2024 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Bandodkar Fooball Trophy: रोमहर्षक लढतीत एफसी गोवा विजयी! बांदोडकर ट्रॉफीत सलग दुसरे जेतेपद

Bhausaheb Bandodkar Memorial Trophy: एफसी गोवाने ओडिशा एफसीला पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ फरकाने हरवून ट्रॉफी सलग दुसऱ्यांदा जिंकली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अतिशय रोमहर्षक अंतिम लढतीत एफसी गोवाने ओडिशा एफसीला निर्धारित वेळेतील ३-३ गोलबरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ फरकाने हरवून भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकली. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शुक्रवारी जोरदार चुरस आणि नाट्य अनुभवायला मिळाले.

एफसी गोवाने आर्मांदो सादिकूच्या दोन गोलमुळे दोनवेळा पिछाडीवरून मुसंडी मारली, नंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अनुभवी गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणी याने अफलातून एकाग्रता साधत अडविलेल्या दोन फटक्यांमुळे घरच्या मैदानावर मोठ्या संख्येने आलेल्या चाहत्यांच्या साक्षीने विजतेपेदाचा जल्लोष केला. २०२३-२४ मोसमात एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघाने हा करंडक पटकावला होता.

लक्ष्मीकांत कट्टीमणी यंदा पाच वर्षांनंतर एफसी गोवा संघात परतला आहे. या ३५ वर्षीय अनुभवी गोलरक्षकाने विश्वास सार्थ ठरविताना पेनल्टी शूटआऊटमध्ये ओडिशा एफसीच्या अहमद जाहो व कार्लोस डेलगाडो यांचे फटके चपळाईने झेपावत अडविले. ह्युगो बोमोस याच्या फटक्याचा नेम चुकला. ओडिशाच्या फक्त दिएगो मॉरिसियो यानेच पहिला फटका अचूक मारला. पेनल्टी शूटआऊटमध्ये एफसी गोवातर्फे आर्मांदो सादिकू, बोर्हा हेर्रेरा व देयान द्राझिच यांनी अचूक नेम साधत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

पिछाडीवरून गोलबरोबरी

ओडिशा एफसीला सामन्याच्या १८व्या मिनिटास ह्युगो बोमोस याने आघाडी मिळवून दिली. नंतर सादिकू याने ३४व्या आणि देयान द्राझिच याने ४१व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे विश्रांतीला एफसी गोवाने पिछाडीवरून २-१ अशी आघाडी प्राप्त केली. ४९व्या मिनिटास अहमद जाहो याने पेनल्टी फटक्यावर, तर ५५ व्या मिनिटास रहिम अली याने केलेल्या गोलमुळे सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशा एफसीने ३-२ असे निसटते वर्चस्व मिळवत विजेतेपदाच्या दिशेने कूच केली. सामन्यातील अखेरची काही मिनिटे बाकी असताना एफसी गोवास पेनल्टी फटका मिळाला. यावेळी सादिकू याने अचूक नेम साधत प्रतिस्पर्धी गोलरक्षक अनुज कुमार याला चकवून सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेला. त्याचा हा स्पर्धेतील सहावा गोल ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT