Goa Police Cricket Team Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Bandodkar Tournament: गोवा पोलिस 'बांदोडकर करंडक'चे मानकरी! अंतिम लढतीत स्टॅमिना क्लबवर दणदणीत विजय

Bandodkar Cricket Tournament 2024: अंगोवा पोलिस संघाने पणजी जिमखान्याच्या बांदोडकर करंडक बाद फेरी क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत त्यांनी स्टॅमिना क्रिकेट क्लबवर सात विकेट राखून मात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Bandodkar Cricket Tournament 2024 Winner Goa Police

पणजी: गोवा पोलिस संघाने पणजी जिमखान्याच्या बांदोडकर करंडक बाद फेरी क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत त्यांनी स्टॅमिना क्रिकेट क्लबवर सात विकेट राखून मात केली.

अंतिम सामना मंगळवारी कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला. स्टॅमिना क्लबने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर सर्वगडी गमावून ११० धावा केल्या. गोवा पोलिस संघाने १४.३ षटकांतच ३ बाद ११३ धावा करून आरामात विजेतेपद पटकावले.

बक्षीस वितरण सोहळ्यास समीर काकोडकर, पणजी जिमखान्याचे सचिव राजेश खंवटे, कार्यकारी समिती सदस्य तन्मय खोलकर, प्रशांत काकोडे यांची उपस्थिती होती. विजेत्या गोवा पोलिस संघाला ५०,००० रुपये व करंडक, उपविजेत्या स्टॅमिना क्लबला २५,००० रुपये व

करंडक देण्यात आला. गोवा पोलिस संघाचा सहदेव कांदोळकर उत्कृष्ट गोलंदाज, स्टॅमिना क्लबचा प्रथमेश गावस उत्कृष्ट फलंदाज ठरला. स्पर्धेचा मानकरी व अंतिम सामन्याचा मानकरी हे दोन्ही पुरस्कार गोवा पोलिसांच्या सोमेश प्रभुदेसाई याला मिळाले. वैयक्तिक बक्षिसासाठी प्रत्येकी ५,००० रुपये देण्यात आले.

संक्षिप्त धावफलक : स्टॅमिना क्रिकेट क्लब १९.५ षटकांत सर्वबाद ११० (पीटर फर्नांडिस २९, प्रथमेश गावस १९, गौरेश गावस १७, वेदांत नाईक ११, संजय नाईक २-२२, हर्षद मातोणकर २-२१, अशोक राठोड २-५, विनोद विल्सन १-१८, सोमेश प्रभुदेसाई १-२६, सहदेव कांदोळकर १-१६) पराभूत वि. गोवा पोलिस १४.३ षटकांत ३ बाद ११३ (स्वप्नील मळीक नाबाद ३३, सनी काणेकर ३२, सोमेश प्रभुदेसाई २३, अविनाश गावस १७, साहिल धुरी २-२२, गौरेश गावस १-२८).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: श्रेयंका पाटील आणि सूर्या दादाचा हटके अंदाज! 'ऑरा फार्मिंग' वर केला भन्नाट डान्स; व्हिडिओ तुफान व्हायरल

Goa Assembly Session Live: गोव्यात वाढतेय स्थलांतरित मजुरांची संख्या; गुन्हेगारीत गोमंतकीयांचे प्रमाण नगण्य - मुख्यमंत्री सावंत

थायलंड-कंबोडिया सीमेवर युद्धजन्य परिस्थिती! भारतीय नागरिकांना 'या' 7 प्रांतांमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला; ॲडव्हायझरी जारी

Goa Shravan Recipes: तेरां दुधीची भाजी, रोस, उड्डमेठी, मनगणे, मुठल्या; ताटात वेगळेपण आणणारा श्रावण

Government Bans OTT Platforms: केंद्र सरकारचा 'डिजिटल स्ट्राइक'! अश्लील कंटेंट दाखवणार्‍या Ullu, ALTT सह 25 OTT अ‍ॅप्सवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT