Goa Chess Tournament Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Chess Tournament: 'मनोहर पर्रीकर' आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत 'आयुष शर्मा'नं पटकावलं विजेतेपद, गोव्याचा पहिला ग्रँडमास्टर 41व्या स्थानावर

Manohar Parrikar Chess Tournament: आयुष शर्मानं मनोहर पर्रीकर गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आयुष शर्मानं १० फेऱ्यांमध्ये ८.५ गुणांची कमाई करत ही कामगिरी केली.

Sameer Amunekar

पणजी: आयुष शर्मानं मनोहर पर्रीकर गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आयुष शर्मानं १० फेऱ्यांमध्ये ८.५ गुणांची कमाई करत ही कामगिरी केली. ही स्पर्धा डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, पणजी येथं आयोजित करण्यात आली होती.

११ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान गोव्यातील ताळगाव येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे झालेल्या या स्पर्धेत जगभरातील अव्वल दर्जाच्या बुद्धिबळपटूंमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. स्पर्धेत विविध देशांतून बड्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

आयएम स्लिझेव्स्की अलेक्झांडर या रशियाच्या खेळाडूनं ८ गुणांसह दुसरं स्थान पटकावलं. तर आयएम टोलोगोन तेगिन सेमेटेई या किर्गिस्तानच्या खेळाडूनं ७.५ गुणांसह तिसरं स्थान पटकावलं.

जीएम सेथुरामन एस.पी. (तामिळनाडू) चौथ्या स्थानी, आयएम आरोन्याक घोष (आरएसपीबी) पाचव्या स्थानी, जीएम सावचेन्को बोरिस (रशिया) सहाव्या स्थानी तर गोव्याच्या एथन वाझला सातव्या स्थानी समाधान मानावं लागलं.

जीएम फेडोरोव अलेक्सी (बेलारूस) आठव्या स्थानी , आयएम कुशाग्र मोहन (तेलंगणा) नवव्या स्थानी, आणि एफएम मोहम्मद अनीस एमला दहाव्या स्थानी समाधान मानावं लागलं. दिप्तयन घोष ११ व्या स्थानावर राहिला.

गोव्यातील खेळाडूंची कामगिरी

गोव्यातील इतर खेळाडूंमध्ये, आयएम ऋत्विज परब ६.५ गुणांसह २७ व्या स्थानावर राहिला. अमेय अवदीनं आयएम नितीन एस विरुद्ध झालेल्या कठीण पराभवानंतरही ६ गुणांसह ३४ वे स्थान पटकावलं. गोव्याचा पहिला ग्रँडमास्टर अनुराग म्हामल ४१ व्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

पारितोषिक वितरण समारंभात केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, क्रीडामंत्री गोविंद गावडे, एआयसीएफ कोषाध्यक्ष धर्मेंद्र कुमार आणि गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, सचिव आशेष केणी, कोषाध्यक्ष विश्वास पिळणकर आणि उपाध्यक्ष अरविंद म्हमाल उपस्थित होते.

या स्पर्धेत भारतासह विविध देशांतील बुद्धिबळपटू भाग घेतात. खेळाडूंना त्यांच्या FIDE रेटिंग सुधारण्यासाठी आणि ग्रँडमास्टर नॉर्म्स पूर्ण करण्यासाठी ही संधी मिळते. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेनं घेतली जाते. मनोहर पर्रीकर यांच्या नावानं ही स्पर्धा घेतली जाते, जे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT