Sameer Panditrao
गेल्या आठवड्यात राज्यात थंडी होती, मात्र मागील चार-पाच दिवसांपासून थंडीचा प्रभाव कमी झाल्याचे जाणवत आहे.
राज्यातील किमान तापमान २२ अंशांवर पोहोचले आहे. सामान्य तापमानाच्या तुलनेत २ अंशांनी वाढ झाल्याचे निरीक्षण.
गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना दिवसा उष्मा आणि रात्री थंडी, अशा दुहेरी हवामानाचा अनुभव येत आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांपेक्षा आग्नेय वाऱ्यांचा प्रभाव जास्त असल्याने राज्यात उष्मा अधिक जाणवत आहे.
गोवा वेधशाळेचे संचालकांनी सांगितले की, पुढील आठवड्यात थंडीचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे.
हवामानातील या बदलामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दिवसाढवळ्या उष्णता वाढत असून रात्री गारवा आहे.
दुहेरी हवामानामुळे सर्दी, खोकला आणि इतर आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.