Goa Filmcity: फिल्म सिटीबाबत पुन्हा गोंधळ! लोलये-पोळे ग्रामसभेत विरोध; कोमुनिदादच्या 'ना हरकत' दाखल्यावरून गदारोळ

Loliem Polem Filmcity: २६ ऑक्टोबर २०१६ मध्ये ग्रामसभेने लोलये पंचायत क्षेत्रातील कोणतीच जमीन अपारंपरिक वापरासाठी देऊ नये, असा ठराव संमत केला होता.
Loliem Polem Filmcity Bhagawati Plateau, Film City Goa
Goa FilmcityDainik Gomantak
Published on
Updated on

Film City project Goa opposition

काणकोण: कोमुनिदाद संस्थेने फिल्मसिटीसाठी दिलेल्या भगवती पठारावरील १० लाख चौरस मीटर जमिनीला नगर नियोजन खात्याने ना हरकत दाखला देण्यास लोलये-पोळेच्या ग्रामसभेत विरोध दर्शविण्यात आला. नगर नियोजन खात्याने १४ ऑक्टोबरला जमीन भाडेपट्टीवर देण्यासाठी करार नोंद करण्यासाठी ना हरकत दाखला दिला.

त्याला काही ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. ही जमीन सर्व्हे क्रमांक ६३/१ मध्ये असून ती जैवसंवेदनशील विभागात मोडते, असे जैवविविधता समितीचे अध्यक्ष मनोज प्रभुगावकर यांनी निदर्शनास आणून दिले.

२६ ऑक्टोबर २०१६ मध्ये ग्रामसभेने लोलये पंचायत क्षेत्रातील कोणतीच जमीन अपारंपरिक वापरासाठी देऊ नये, असा ठराव संमत केला होता. तो ठराव पुन्हा २६ नोव्हेंबर २०२३ मध्ये पुन्हा जशाच्या तसा संमत केला आणि आजच्या ग्रामसभेत फिल्मसिटीसाठी गोवा एन्टरटेनमेंट सोसायटीला कोमुनिदाद संस्थेची भगवती पठारावरील जमीन देण्याच्या प्रस्तावाला हरकत घेण्यात आली.

Loliem Polem Filmcity Bhagawati Plateau, Film City Goa
Goa Filmcity: अखेर गोवा 'फिल्मसिटी'ला भगवती पठारावर मिळाली जमीन

यासंदर्भात लोलये कोमुनिदाद संस्थेचे सध्याचे मुखत्यार भूषण प्रभुगावकर यांना विचारले असता, एन्टरटेनमेंट सोसायटीने लोलये कोमुनिदाद संस्थेकडे जमिनीची मागणी केली होती. त्यानुसार कोमुनिदादने भागधारकांच्या संमतीने सोसायटीला भाडेपट्टीवर जमीन देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर सोसायटीने या जमिनीच्या करारासंबंधी सरकार दरबारी नोंद करण्यासाठी कोमुनिदाद संस्थेकडे ना हरकत दाखला मागितला, तो तत्कालीन मुखत्याराने दिला, असे त्यांनी सांगितले.

लोलये-पोळे पंचायत क्षेत्रात रोजगाराभिमुख उद्योग यावेत; मात्र ते प्रदूषणमुक्त असावेत, अशी आपली पहिल्यापासून भूमिका आहे.पंचायत मंडळ योग्य वेळ आल्यावर आपली भूमिका मांडणार आहे, असे पंच अजय लोलयेकर म्हणाले.

Loliem Polem Filmcity Bhagawati Plateau, Film City Goa
Loliem Theft: लोलये देवालय चोरीतील अज्ञात सीसीटीव्हीत कैद! पोलिसांचा तपास सुरु

...अन्यथा कोर्टात जाणार : ग्रामस्थ

कोमुनिदाद संस्थेच्या मुखत्याराने दिलेला ना हरकत दाखला मागील ग्रामसभेच्या ठरावानुसार अवैध ठरवावा, अशी मागणी आज करण्यात आली. यावेळी उपस्थित ४४ ग्रामस्थांनी भगवती पठारावरील जमिनीसंदर्भातील सर्व व्यवहारांना आक्षेप घेऊन निर्णय मागे घेण्याची मागणी केली. या ग्रामसभेला सुमारे ७५ ग्रामस्थ उपस्थित होते. १५ दिवसांत नगर नियोजन खाते, कोमुनिदाद संस्था यांनी दिलेला ना हरकत दाखला मागे न घेतल्यास पंचायतीने न्यायालयात जावे, अशी मागणी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com