Womens Cricket, Girl Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Cricket: 8 चौकार, 3 षटकार! गोव्याच्या 'तनिषा'ची वादळी खेळी व्यर्थ; आंध्र प्रदेशचा 18 धावांनी विजय

Goa vs Andhra Pradesh T20 match: तनिशा गायकवाड हिने ७३ धावांची आक्रमक खेळी केली; परंतु ती २३ वर्षांखालील महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा पराभव टाळू शकली नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : तनिशा गायकवाड हिने ७३ धावांची आक्रमक खेळी केली; परंतु ती २३ वर्षांखालील महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा पराभव टाळू शकली नाही. आंध्रने त्यांच्यावर १८ धावांनी मात केली.

सामना गुरुवारी सिव्हिल लाईन्स-नागपूर येथील व्हीसीए स्टेडियमवर झाला. गोव्याने नाणेफेक जिंकली व आंध्रला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. त्यांनी निर्धारित २० षटकांत ७ बाद १४६ धावा केल्या. गोव्यातर्फे अँजेल डिकॉस्ता हिने शानदार मारा करताना चार षटकांत फक्त १० धावांत तिघींना बाद केले.

आंध्रची एकवेळ तीन बाद एक धाव, तर नंतर ४ बाद १४ धावा अशी बिकट स्थिती होती. मात्र, वाय. हेमा रोशिनी (५५) व अंजुम (५३) यांनी पाचव्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी करून आंध्रला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. उत्तरादाखल गोव्याला निर्धारित २० षटकांत ६ बाद १२८ धावाच करता आल्या.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या तनिशा हिने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक ठोकताना ५० चेंडूंतच ७३ धावा केल्या. तिने आठ चौकार व तीन षटकार मारले. मात्र, तनिशाला दुसऱ्या टोकाला समर्थ साथ लाभली नाही. गोव्याचा हा ३ सामन्यांतील दुसरा पराभव ठरला. त्यामुळे त्यांचे ३ गुण कायम राहिले. गोव्याचा पुढील सामना जम्मू-काश्मीरविरुद्ध २९ रोजी खेळला जाईल.

संक्षिप्त धावफलक : आंध्र : २० षटकांत ७ बाद १४६ (वाय. हेमा रोशिनी ५५, अंजुम ५३, अँजेल डिकॉस्ता ४-०-१०-३, उस्मा खान) वि. वि. गोवा : २० षटकांत ६ बाद १२८ (तनिशा गायकवाड ७३, तारिणी जोशी ४-०-१९-२, सृष्टी शेखर ४-१-१६-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT