ST Reservation: 'आदिवासी मुख्यमंत्री झाल्यास काय वाईट?'; एसटी आरक्षणावरून प्रकाश वेळीप यांचा भाजप-काँग्रेसला सवाल

Prakash Velip Latest Statement: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाला एसटीचा दर्जा मिळवून देण्यात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे मोलाचे योगदान आहे.
Prakash Velip Latest Statement
ST ReservationDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाला एसटीचा दर्जा मिळवून देण्यात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी जोर लावल्यामुळे आम्हाला आरक्षण मिळाले हे नाकारू शकत नाही, परंतु सद्यःस्थितीत ज्याप्रकारे एसटी आरक्षण विधेयक संसदेत पारित होण्यासाठी एक वर्ष, अधिसूचना जारी करण्यासाठी अडीच महिने लागले आणि आता न्यायालयात लढा द्यावा लागत आहे यावरून सरकारमधील काही घटकांना एसटी समाजाला आरक्षण मिळू नये असे वाटत असल्याचा संशय येत असून भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी आदिवासींना फसविले, असा आरोप उटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी केला.

गोमन्तक टीव्ही’वर संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘ब्लॅक ॲण्ड व्हाईट’ कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, की जर सरकारने मनात आणले तर राजकीय आरक्षण एका दिवसात मिळू शकते. बुधवारी सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयात एसटी आरक्षणासंदर्भात निकाल होणार आहे, तो निकाल सकारात्मक असावा हीच माझी अपेक्षा आहे. आदिवासी समाजाच्या अधिकारांसाठी हुतात्मा झालेल्या मंगेश गावकर आणि दिलीप वेळीप यांच्या बलिदानाला न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे.

Prakash Velip Latest Statement
Goa Politics: राणे-सावंत एकत्र; दोनापावल्यातील बैठकीत शिवप्रकाशही सहभागी, भोजनावर चर्चा

आदिवासींची ताकद वाढण्याची भीती?

जर आरक्षणाच्या आधारे चार आमदार जिंकून आले आणि स्वबळावर इतर काही आमदार निवडून आले, तर मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ठरतील अशी भीती आहे का? गोवा मुक्तीनंतर आजपर्यंत एकदाही आदिवासींचा मुख्यमंत्री झालेला नाही. आदिवासींचा मुख्यमंत्री झाल्यास काय वाईट आहे? असा सवाल वेळीप यांनी उपस्थित केला. आजपर्यंत सरकारकडे आरक्षण द्या म्हणून मागणी केली, मागणी करत बसण्याची देखील काही मर्यादा असते, परंतु जर आरक्षण मिळाले नाही, तर येत्या निवडणुकीत खासकरून ८० टक्के हिंदू आदिवासी जे भाजपसोबत आजपर्यंत राहिले, ते पुन्हा राहतील याची शाश्‍वती नाही. आदिवासींचे हृदय दुखावले आहे. एसटी आरक्षण आता नेत्यांपुरते मर्यादित नाही. राजकारणात कालचक्र बदलायला वेळ लागत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रकाश वेळीप म्हणाले...

अनेकजण माझा एसटी दर्जा मिळावा याला विरोध होता असे सांगतात, परंतु तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना एसटी दर्जा द्यावा अशी मागणी करणारे माझे निवेदन माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते देण्यात आले.

ज्यावेळी मी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावेळी मनोहर पर्रीकर यांच्यासमोर मी एक अट घातली, ती म्हणजे एसटी राजकीय आरक्षणाची. यासंदर्भात ते पंतप्रधानांची भेट घेणार होते, परंतु दुदैवाने ते नंतर आजारी पडले.

Prakash Velip Latest Statement
Goa Accident: वडापाव खाऊन घरी परतताना काळाचा घाला; साकोर्ड्यात दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू

आदिवासी समाजाचे चार आमदार आज सरकारात सभापती, मंत्री आणि आमदार म्हणून आहेत, परंतु त्यांच्या आवाजाला काहीही महत्त्व दिले जात नाही. ज्याने आवाज केला त्या गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून हटविण्यात आले.

१० डिसेंबरपर्यंत एसटी राजकीय आरक्षणाची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले होते. त्यानुसार आरक्षण देण्यासंबंधी पुढाकार घ्यावा ही आग्रहाची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.