Goa New Cricket Captain: गोवा T20 संघात मोठा बदल! हुकमी 'सुयश'कडे नेतृत्वाची धुरा; नवीन संघात कुणाला स्थान? पहा..

Goa T20 Cricket Team Captain: ‘व्हाईट बॉल’ क्रिकेटसाठी वेगळा कर्णधार नियुक्त करण्याचा निर्णय गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) सीनियर निवड समितीने घेतला.
Suyash Prabhudessai Goa Cricket
Suyash Prabhudessai Goa CricketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी गोव्याचा १७ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला असून हुकमी फलंदाज सुयश प्रभुदेसाई याच्याकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. स्पर्धा २६ नोव्हेंबरपासून कोलकाता येथे खेळली जाईल.

रणजी करंडक संघाचा कर्णधार स्नेहल कवठणकर टी-२० स्पर्धेत खेळाडू या नात्याने खेळेल. ‘व्हाईट बॉल’ क्रिकेटसाठी वेगळा कर्णधार नियुक्त करण्याचा निर्णय गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) सीनियर निवड समितीने घेतला.

रणजी स्पर्धेत खेळलेला सलामीचा मंथन खुटकर व मध्यमगती गोलंदाज विजेश प्रभुदेसाई यांना टी-२० संघात जागा मिळालेली नसून डावखुरा फलंदाज ईशान गडेकर, तसेच शुभम तारी व फेलिक्स आलेमाव या वेगवान गोलंदाजांची कोलकात्यास जाणाऱ्या संघात निवड झाली आहे.

Suyash Prabhudessai Goa Cricket
Goa Cricket: नाबाद 243 धावा, 7 विकेट्स; गोव्याच्या कर्णधाराची अष्टपैलू खेळी; छत्तीसगडवर दणदणीत विजय

गोव्याचा एलिट ब गटात समावेश असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, चंडीगड, जम्मू-काश्मीर, हैदराबाद, महाराष्ट्र, बिहार या संघांविरुद्ध सामने होतील. गोव्याचा संघ सध्या सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी सामन्यानंतर राजकोट येथे असून तेथेच सराव करत आहे. राजकोट येथून संघ परस्पर कोलकात्यास रवाना होईल.

Suyash Prabhudessai Goa Cricket
Ranaji Trophy: गोव्याला सचिनचा 'अर्जुन' बळ देणार का? शतक करण्याची नामी संधी

गोव्याचा टी-२० संघ असा

सुयश प्रभुदेसाई (कर्णधार), अभिनव तेजराणा, ईशान गडेकर, दीपराज गावकर, दर्शन मिसाळ, मोहित रेडकर, शुभम तारी, कश्यप बखले, राजशेखर हरिकांत, स्नेहल कवठणकर, अमूल्य पांड्रेकर, वासुकी कौशिक, अर्जुन तेंडुलकर, ललित यादव, फेलिक्स आलेमाव, विकास सिंग, हेरंब परब.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com