Traffic Licence Suspension: गोव्यात अपघात, मृत्यू आणि जखमींची संख्या वाढली; चालकांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई 91 टक्क्यांनी घटली!

Traffic Department Report: गोव्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असतानाच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचे परवाने निलंबित करण्याच्या कारवाईत मोठी घट झाली आहे.
Traffic Department Report
Traffic Licence SuspensionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असतानाच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचे परवाने निलंबित करण्याच्या कारवाईत मोठी घट झाली आहे. विशेष म्हणजे, याच कालावधीत रस्ते अपघात, मृत्यू व जखमींच्या संख्येत वाढ झाल्याचे वाहतूक खात्याच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

२०२६ च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) २,१२७ वाहनचालकांचे परवाने निलंबित केले होते. मात्र, जुलै ते सप्टेंबर या तिसऱ्या तिमाहीत ही संख्या थेट १८९ वर आली. म्हणजेच परवाने निलंबित करण्याच्या कारवाईत तब्बल ९१ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. वाहतूक खात्याच्या जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या आकडेवारीनुसार, राज्यात १,३८० रस्ते अपघातांची नोंद झाली. या अपघातांमध्ये १९३ जणांचा मृत्यू झाला, तर ९७३ जण जखमी झाले.

Traffic Department Report
Goa Accident: वडापाव खाऊन घरी परतताना काळाचा घाला; साकोर्ड्यात दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू

गेल्या वर्षी याच नऊ महिन्यांच्या कालावधीत १,२४० अपघात झाले होते. त्यात १८९ जणांचा मृत्यू झाला होता आणि ७२१ जण जखमी झाले होते. त्यामुळे अपघातांच्या संख्येत १४० ने, मृत्यूंच्या संख्येत चारने, तर जखमींच्या संख्येत तब्बल २५२ ने वाढ झाली आहे. तिमाहीनिहाय आकडेवारी पाहिल्यास, जानेवारी ते मार्च २०२६ या पहिल्या तिमाहीत ६३८ अपघात झाले. त्यात ६३ जणांचा मृत्यू झाला, तर ३०० जण जखमी झाले. मागील वर्षी याच तिमाहीत ५९६ अपघात, ५९ मृत्यू आणि २६२ जखमींची नोंद झाली होती.

एप्रिल ते जून या दुसऱ्या तिमाहीत ६८९ अपघात झाले. त्यात ७४ जणांचा मृत्यू झाला, तर ३४४ जण जखमी झाले. मागील वर्षी या तिमाहीत ६०१ अपघात, ८४ मृत्यू आणि २६५ जखमींची नोंद होती. जुलै ते सप्टेंबर या तिसऱ्या तिमाहीत ५३ अपघातांची नोंद झाली. मागील वर्षी याच कालावधीत ४३ अपघात झाले होते. या तिमाहीत अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४६ वरून ५६ झाली, तर जखमींची संख्या १९४ वरून ३२९ वर पोहोचली. विशेषतः जखमींच्या संख्येत झालेली वाढ चिंताजनक आहे.

हेल्मेटशिवाय वाहन चालविणारे सर्वाधिक

परवाने निलंबित होण्यामागील सर्वाधिक कारण हेल्मेटचा वापर न करणे हे आहे. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणे किंवा विनाहेल्मेट दुचाकीवर मागे बसणे, अशा एकूण २,९८७ प्रकरणांत परवाने निलंबित केले. मात्र, तिसऱ्या तिमाहीत हेल्मेटविषयक कारवाईतही मोठी घट झाली. एप्रिल ते जून या कालावधीत हेल्मेट न वापरल्याप्रकरणी १,४५२ परवाने निलंबित केले होते. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ही संख्या केवळ १२९ राहिली.

Traffic Department Report
Goa Land Issue: कोमुनिदाद जमिनीवर दोड्डामणींचे नाव; सांत आंद्रेत संताप, वीरेश बोरकर लक्ष्यावर!

वाहतूक नियम अंमलबजावणीवर प्रश्न

१ वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्याप्रकरणी परवाने निलंबित करण्याची संख्या १७८ वरून सातवर आली.

२ सीट बेल्ट न लावल्याप्रकरणी या कारवाईची संख्या १४९ वरून पाच झाली.

३ वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८७ वरून १३ परवाने निलंबित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.