वाळपई: आंध्र प्रदेशच्या ओकिनावा स्पोर्ट्स कराटे-डो असोसिएशनतर्फे आयोजित २८वी राष्ट्रीय कराटे स्पर्धा २७ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राजीव इनडोअर स्टेडियम, विशाखापट्टणम येथे पार पडली. या स्पर्धेत गोवा कराटे संघाने उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सत्तरी तालुक्यातील एकूण १६ स्पर्धकांनी गोवा राज्याचे प्रतिनिधित्व केले. सर्व स्पर्धकांनी काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये उत्कृष्ट कौशल्य, शिस्तबद्धता दाखवत उल्लेखनीय प्रदर्शन केले. संघाला एकूण ६ सुवर्णपदके, ८ रौप्यपदके आणि १४ कांस्यपदके प्राप्त झाली.
संघाचे नेतृत्व मुख्य प्रशिक्षक मंदार गणपुले यांनी केले असून प्रशिक्षक राहुल वझे आणि शर्वा भावे यांनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान अमूल्य मार्गदर्शन आणि सहकार्य प्रदान केले. गोवा संघाला राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी स्थानिक आमदार आणि मंत्री विश्वजीत राणे यांच्या पाठिंब्याबद्दल संपूर्ण संघाने कृतज्ञता व्यक्त केली.
सत्तरीमधील खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांबद्दल पालक आणि प्रशिक्षकांनीही मनःपूर्वक आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.