Ameya Audi Goa X
गोंयचें खेळामळ

FIDE Chess: अमेय अवदीची विजेतेपदाची हॅटट्रिक! शानभाग स्मृती अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल कामगिरी

Ameya Audi: मुरगाव तालुका बुद्धिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी अव्वल ठरल्याने तो फिरत्या करंडकाचा कायमस्वरूपी मानकरी ठरला.

Sameer Panditrao

पणजी: गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) अमेय अवदी याने शानदार खेळ करताना चौथ्या व्यंकटेश व सुमती शानभाग स्मृती अखिल भारतीय फिडे रॅपिड मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाची हॅटट्रिक साधली. मुरगाव तालुका बुद्धिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी अव्वल ठरल्याने तो फिरत्या करंडकाचा कायमस्वरूपी मानकरी ठरला.

स्पर्धेत गोव्याचा मंदार लाड उपविजेता ठरला, तर केरळच्या अर्पित बिजॉय याला तिसरा क्रमांक मिळाला. रुबेन कुलासो, जोशुआ तेलिस, नितीश बेलुरकर, ऋषिकेश काबनुरकर, देवेश नाईक, आर्यन रायकर, अर्विन आल्बुकर्क, राजवीर पाटील, पार्थ साळवी, सौरीष काशेलकर, शुभ बोरकर, आरुष भट, ऐडेन ग्राओ, कविश घारसे, रुद्रेश फडते, वसंत नाईक, अथर्व सावळ यांना अनुक्रमे चौथा ते विसावा क्रमांक मिळाला.

बिगरमानांकित खेळाडूंत राजदत्त तिंबले व शौर्य साळगावकर यांना, १४००-१५९९ एलो मानांकन खेळाडूंत आयुषमान राजपुरोहित, वैष्णवी परब यांना, १६००-१७९९ एलो मानांकन खेळाडूंत सुभाष संकर, श्रिया पाटील यांना, ४५ वर्षांवरील व्हेटरन्स खेळाडूंत गोपाळ शाह, भिमाप्पा हरिजन यांना, १८ वर्षांवरील महिला खेळाडूंत रिदिमा परब व डी. जोश्ना यांना, दिव्यांग खेळाडूंत संतोष, गंगनाईक, मोहसीन सय्यद यांना बक्षीस मिळाले.

वयोगटात अर्थ शेणवी कारापूरकर, वैभव संगणाबाशेट्टर, राचेल परेरा, अन्वी देसाई, शौर्य जयस्वाल, श्लोक मेस्ता, लिया सिल्व्हेरा, अस्मी तरसे, शौर्य अग्रासनी, अथर्व घाटवळ, स्कायला रॉड्रिग्ज, आर्या कामत हेळेकर, सार्थक नाईक, साईअंश देसुरकर, श्रीशा घाडी, द्रिशा घोंगे, इव्हान तेलिस, व्हिवान कदम, आराध्या देसाई, फासेली बार्रेटो यांना बक्षीस प्राप्त झाले.

बक्षीस वितरण स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते सुकांत शानभाग, गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव आशेष केणी, मुरगाव तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष किशोर बांदेकर, सचिव मुकुंद कांबळी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: एफडीएच्या अचानक तपासणी मोहिमेत अनेक दुकाने बंद

SCROLL FOR NEXT