Asia Chess Championship: गोव्याचा 'एथन वाझ'चा ताजिकिस्तानमध्ये भीमपराक्रम! आशिया युवा बुद्धिबळ स्पर्धेत जिंकली 5 पदके

Ethan Vaz: ताजिकिस्तानमधील दुशांबे येथे मंगळवारी स्पर्धा संपली. ताजिकिस्तान बुद्धिबळ महासंघाने आशियाई बुद्धिबळ महासंघ व फिडे यांच्या अधिपत्याखाली स्पर्धा घेतली होती.
Ethan Vaz Goa
Ethan VazDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचा प्रतिभाशाली युवा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू एथन वाझ याने पश्चिम आशिया युवा बुद्धिबळ स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी बजावली. या तेरा वर्षीय खेळाडूने भारताचे प्रतिनिधित्व करताना एकूण पाच पदकांची कमाई केली.

ताजिकिस्तानमधील दुशांबे येथे मंगळवारी स्पर्धा संपली. ताजिकिस्तान बुद्धिबळ महासंघाने आशियाई बुद्धिबळ महासंघ व फिडे यांच्या अधिपत्याखाली स्पर्धा घेतली होती.

एथन या स्पर्धेत १६ वर्षाखालील (सब-ज्युनियर) खुल्या गटात सहभागी झाला. त्याने स्टँडर्ड, ब्लिट्झ आणि रॅपिड या तिन्ही प्रकारात वैयक्तिक पदके पटकावली. एथनला स्टँडर्डमध्ये रौप्य, रॅपिडमध्ये रौप्य आणि ब्लिट्झमध्ये ब्राँझपदक मिळाले, तसेच सांघिक पातळीवर स्टँडर्ड व रॅपिड प्रकारांमध्ये भारतासाठी ब्राँझपदक प्राप्त केले.

Ethan Vaz
Goa Chess Tournament NewsDainik Gomantak

या गटात भारताचे केवळ दोघे खेळाडू होती, तर उझबेकिस्तान, कझाकस्तान आणि ताजिकिस्तानसारख्या मातब्बर देशांचे पूर्ण तीन सदस्यीय संघ होते, त्यामुळे ही संघ पदके अधिक गौरवशाली ठरतात. या स्पर्धेत १३ देशांतील ३९१ खेळाडूंनी भाग घेतला होता.

एथन १३ वर्षांचा आहे, मात्र तो १४ वर्षांखालील गटात पात्र असूनही १६ वर्षांखालील प्रबळ गटात खेळला. २०२४ मधील राष्ट्रीय सब-ज्युनियर (१५ वर्षाखालील) बुद्धिबळ स्पर्धेत पदक जिंकल्यामुळे एथन दुशांबे येथील स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. त्याने २०२४ च्या राष्ट्रकुल बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत १६ वर्षाखालील गटात सुवर्णपदक जिंकले होते.

Ethan Vaz Goa
Ethan Vaz: 'एथन' पुन्हा अपराजित! साडेसात गुणांची केली कमाई; टायब्रेकरमध्ये पटकावला सातवा क्रमांक

गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, सचिव आशेष केणी, खजिनदार विश्वास पिळर्णकर, तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी एथनचे शानदार कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन केले असून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Ethan Vaz Goa
Chess Competition: डिचोली येथे महिलांसाठी बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन, स्नेहल नाईक ठरली ‘बुद्धिबळ क्वीन’

“आम्ही एथनचे प्रशिक्षक, पुरस्कर्ते, द किंग्ज स्कूल आणि सर्व शुभचिंतकांचे त्यांच्या अमूल्य पाठिंब्यासाठी, तसेच गोवा बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ, भारतीय क्रीडा प्राधिकरण, गोवा क्रीडा प्राधिकरण यांचे प्रोत्साहनाबद्दल अत्यंत आभारी आहोत,” असे एथनची आई लिंडा यांनी सांगितले. एथन आणि त्याचे वडील एडविन मायदेशाच्या वाटेवार आहेत, परंतु पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राच्या बंदीमुळे हवाई प्रवास बदलल्यामुळे आगमन लांबले आहे.

मला सुवर्णपदकाची अपेक्षा होती, पण सर्व प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत प्रत्येक वेळी पदक मिळवणं ही अभिमानाची गोष्ट आहे.

एथन वाझ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com