Akanksha Salunkhe Win Gold Medal
पणजी: गोव्याच्या आकांक्षा साळुंखेनं उत्तराखंडमध्ये झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिला स्क्वॅशमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. याआधी २०२३ मध्ये गोव्यात झालेल्या ३७ व्या क्रीडा स्पर्धेतही तिनं सुवर्णपदक जिंकलं होतं.
अंतिम सामन्यात आकांक्षा साळुंखेनं महाराष्ट्राच्या अंजली सेमवालचा ११-६, ११-५, ११-४ असा पराभव करत सुर्वणपदकाला गवसणी घातली. संपूर्ण स्पर्धेत आकांक्षा एकही गेम गमावली नाही.
सक्रिय महिला स्क्वॉशमध्ये भारताची प्रमुख खेळाडू आकांक्षा साळुंखे हिनं अंतिम फेरी गाठल्यामुळे उत्तराखंडमधील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याचं सुवर्ण अथवा रौप्यपदक आधील निश्चित झालं होतं. अखेर चांगली कामगिरी करत आकांक्षानं सुर्वणपदक जिंकलं.
गोव्यात झालेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आकांक्षानं महिला स्क्वॉशमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. यावेळेसही तिनं लौकिकास साजसा खेळ केला. देहरादून येथे सुरू असलेल्या स्पर्धेत तिनं एकही गेम गमावलेला नाही.
२६ वर्षीय आकांक्षा जागतिक स्क्वॉश क्रमवारीत फेब्रुवारीच्या मानांकनानुसार ६५व्या क्रमांकावर आहे. उपांत्य लढतीत तिनं रविवारी (२ फेब्रुवारी) संध्याकाळी तमिळनाडूच्या पूजा आरती हिला ३-० (११-३, ११-८, ११-२) असं नमविलं होतं.
स्पर्धेत पहिल्या फेरीत आकांक्षानं झारखंडच्या आध्या बुधिया हिच्यावर ३-० (११-१, ११-३, ११-२) असा, दुसऱ्या फेरीत कर्नाटकच्या रियांसिका वर्मा हिच्यावर ३-० (११-१, ११-४, ११-८) असा, तर उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या अनिका दुबे हिच्यावर ३-० (११-२, ११-९, १५-१३) असा विजय मिळविला होता.
मागील डिसेंबरमध्ये आकांक्षानं हाँगकाँगमध्ये झालेल्या जागतिक सांघिक स्क्वॉश स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. गेल्या ऑक्टोबरमध्ये तिनं फ्रान्समधील लिमोज येथे झालेल्या व्यावसायिक पीएसए टूर पातळीवरील स्क्वॉश स्पर्धेत विजेतेपद पटकावलं होतं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.