Pakistan Spot Fixing Scandal Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Spot Fixing Scandal: क्रिकेट विश्वाला हादरवणारी 'अंडरकव्हर' स्टोरी! स्टॉपवॉच अन् रेकॉर्डिंगनं कसं उद्ध्वस्त केलं खेळाडूंचं करिअर? आकाश चोप्राचा व्हायरल VIDEO चर्चेत

Pakistan Spot Fixing Scandal: क्रिकेटला 'जेंटलमॅन गेम' मानले जाते, पण मॅच फिक्सिंगच्या काळ्या सावलीने या खेळाला अनेकदा डागाळले.

Manish Jadhav

Pakistan Spot Fixing Scandal: क्रिकेटकडे 'जेंटलमॅन गेम' म्हणून पाहिले जाते, पण मॅच फिक्सिंगच्या काळ्या सावलीने या खेळाला अनेकदा डागाळले. याचदरम्यान भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने सोशल मीडियावर एक अत्यंत अंगावर काटा आणणारा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ 2010 मधील पाकिस्तान क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातील 'स्पॉट फिक्सिंग' प्रकरणावर आधारित असून एका 'अंडरकव्हर' पत्रकाराने कशाप्रकारे या फिक्सिंगचा पर्दाफाश केला, याची धक्कादायक कहाणी यात मांडली आहे.

खोट्याच्या दुनियेत सत्याचा शोध

व्हिडिओची सुरुवात एका गंभीर विधानाने होते. "अंडरकव्हर जर्नलिस्ट होणे म्हणजे केवळ थरार किंवा ग्लॅमर नाही, तर खोट्याच्या गर्दीत सत्याचा शोध घेणे आहे. कधीकधी हे सत्य कोणाचे आयुष्यही उद्ध्वस्त करु शकते." 2010 मध्ये जेव्हा पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर होता, तेव्हा या पत्रकाराने असे काही शोधून काढले ज्याने संपूर्ण क्रिकेट जगतात त्सुनामी आली.

एजंट मजहर माजिद आणि सापळा

तपासाची सुरुवात झाली जेव्हा न्यूज एडिटरने पत्रकाराला एक 'लीड' दिली की, मजहर माजिद नावाचा एजंट पाकिस्तानी खेळाडूंना फिक्सिंगसाठी नियंत्रित करत आहे. लंडनच्या एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये या पत्रकाराची मजहरशी भेट झाली. "फॉलो द मनी, कॅच द लायन" या तत्त्वावर पत्रकार काम करत होता. मजहरने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले की, त्याच्या तालावर पाकिस्तानचे तीन प्रमुख खेळाडू नाचतात, फक्त रोकड दाखवण्याची गरज आहे.

तीन खेळाडूंची नावे आणि भयानक करार

पुढची बैठक मजहरच्या घरी झाली. तिथे मजहरने सलमान भट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमिर या तीन खेळाडूंची नावे घेतली. त्याने फक्त नावेच सांगितली नाहीत, तर हे खेळाडू कोणत्या ओव्हरमध्ये 'नो बॉल' टाकतील, हेही निश्चित केले. मजहरच्या शेजारी पडलेले नोटांचे बंडल आणि त्याचा निर्ढावलेला चेहरा पाहून पत्रकार चक्रावून गेला, पण कपड्यांमध्ये लपवलेल्या कॅमेऱ्यात सर्व पुरावे रेकॉर्ड होत होते.

लॉर्ड्सचे मैदान आणि तो 'मॉन्स्टर' नो बॉल

ठरल्याप्रमाणे लॉर्ड्स कसोटीच्या दिवशी मजहरने पत्रकाराला फोन करुन सांगितले की, "उद्या पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद आमिर नो बॉल टाकेल." मजहरचा आवाज शांत होता. दुसऱ्या दिवशी लॉर्ड्सच्या प्रेस बॉक्समध्ये बसलेल्या पत्रकाराने (Journalist) पाहिले की, आमिरने ठरलेल्या वेळी एक 'मॉन्स्टर नो बॉल' टाकला. त्यानंतर आसिफनेही तसेच केले. स्टॉपवॉच आणि रेकॉर्डिंगच्या माध्यमातून पत्रकाराकडे आता फिक्सिंगचे ठोस पुरावे जमा झाले होते.

तीन खेळाडूंच्या करिअरचा शेवट

मैदानावर प्रेक्षक जल्लोष करत होते, कॉमेंटेटर्स आश्चर्य व्यक्त करत होते, पण या पत्रकाराच्या मनात वादळ उठले होते. त्याला ठाऊक होते की, उद्या जेव्हा ही बातमी प्रसिद्ध होईल, तेव्हा या तीन खेळाडूंचे करिअर कायमचे संपेल. दुसऱ्या दिवशी बातमी प्रसिद्ध झाली आणि क्रिकेट विश्व हादरले. स्कॉटलंड यार्डच्या चौकशीनंतर मोहम्मद आमिरने आपला गुन्हा कबूल केला. कोर्टात जेव्हा हे खेळाडू हजर झाले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज हरवले होते आणि बाहेर चाहते त्यांना 'गद्दार' म्हणून हिणवत होते.

"ही बातमी चटका देऊन गेली"

अंडरकव्हर पत्रकार शेवटी भावूक होऊन सांगतो, "लोकांना वाटते की आम्ही पत्रकार कहाणी विसरुन जातो, पण हे खरे नाही. त्या दिवशी मी केवळ भ्रष्टाचार (Corruption) उघड केला नाही, तर खेळाचा आत्मा मरताना पाहिला." हा लेख आपल्याला याची जाणीव करुन देतो की, खेळाडू कितीही मोठा असला तरी खेळापेक्षा मोठा कधीच नसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nagnath Mahadev Temple Theft: पर्रा येथील नागनाथ महादेव मंदिरात तिसऱ्यांदा चोरी; 30 हजारांची रोकड लंपास, मूर्तीचीही विटंबना

Goa Land Scam: गोव्यातील बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीचा खेळ खल्लास! SIT च्या धाकाने भूमाफिया पळाले; मुख्यमंत्री सावंतांचा दावा

Fatima Sana Shaikh In Goa: 20 मिनिटांचा संघर्ष अन् 'ती' धाडसी उडी! 'दंगल' गर्लचा गोव्यात थरार, फातिमा सना शेखचा Video Viral

Surya Gochar 2026: शनिच्या नक्षत्रात सूर्याचे आगमन; 18 मार्चपासून 'या' 3 राशींचे नशिब सोन्यासारखे चमकणार

Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

SCROLL FOR NEXT