Teachers Day Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Teachers Day: शिक्षक कसा असावा? 'फक्त शिकवणारा' नव्हे, तर आयुष्याची दिशा दाखवणारा दीपस्तंभ!

Qualities of a Good Teacher: शिक्षकाने अष्टपैलू असायला हवे, फक्त शिकवण्यापुरते स्वतःला मर्यादित ठेवता कामा नये हा मला लाभलेल्या शिक्षकांचा संदेश आजही एखाद्या दीपस्तंभासारखी वाट दाखवत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मिलिंद म्हाडगुत

शिक्षकाने अष्टपैलू असायला हवे, फक्त शिकवण्यापुरते स्वतःला मर्यादित ठेवता कामा नये हा मला लाभलेल्या शिक्षकांचा संदेश आजही एखाद्या दीपस्तंभासारखी वाट दाखवत आहे. माजी राष्ट्रपती कै. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस. त्यांनी तो शिक्षकांना अर्पित केल्यामुळे हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा समाजातला एक महत्त्वाचा घटक. नवी पिढी घडवण्यात शिक्षकांचा महत्त्वाचा वाटा असतो किंबहुना असायला हवा.

शिक्षक हा विद्यालय वा महाविद्यालय पुरता मर्यादित असला तरी त्याचा प्रभाव हा काळाची बंधने ओलंडणारा असायला हवा. म्हणूनच तर आजही आमच्यावर प्रभाव सोडणारे अनेक शिक्षक आठवतात. आज शिक्षकांना वेतन चांगले मिळत असले तरी पूर्वी पोटाला चिमटा देऊन पोटतिडकीने शिकवणारे कितीतरी शिक्षक असायचे. म्हापशाच्या सारस्वत विद्यालयात आम्हाला भूगोल शिकवणारे ठाकूर गुरुजी आजही आठवतात. ठिगळे लावलेला कोट, जीर्ण झालेले धोतर अशा वेषात येणारे ठाकूर गुरुजी हातात खडू आणि डस्टर घेऊन आल्यावर असे काही शिकवायचे की आम्ही मुले अगदी स्तब्ध होऊन जायचो.

नंतर फोंड्याच्या आल्मेदा हायस्कूलमध्येही आम्हाला चांगले शिक्षक लाभले. विज्ञान सुद्धा कसे ‘स्टायलिश’पणे शिकवता येऊ शकते हे आम्हाला विश्वनाथ लवंदे सरांनी दाखवले. ते असे काही रुबाबात शिकवायचे की, आम्हाला विज्ञान म्हणजे एखाद्या परिकथेसारखे वाटायचे. त्याचप्रमाणे स्टीफन सरांनी अकरावीला शिकवलेली ‘डॉक्टर जेकेल अँड मिस्टर हाईड’ ही कादंबरी आजही जशीची तशी आठवते ती त्यांच्या प्रभावी शिकवण्यामुळेच. थॉमस सर, जोजेफ पिंटो सर, धारवाडकर मॅडम यांच्यासारखे या हायस्कूलमधील अनेक शिक्षक, शिक्षिका आजही आमच्या मनाच्या पटलावर राज्य करत आहेत.

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऑर्गेनिक केमिस्ट्री शिकवणारे पाठक सरही डोळ्यांसमोर तरळतात. नंतर एमईएस महाविद्यालयात आल्यावर प्राचार्य माधवराव कामतांमुळे जीवनाची दिशाच बदलली. शिक्षकाने अष्टपैलू असायला हवे, फक्त शिकवण्यापुरते स्वतःला मर्यादित ठेवता कामा नये हा मला लाभलेल्या शिक्षकांचा संदेश आजही एखाद्या दीपस्तंभासारखी आम्हाला वाट दाखवत आहे. त्यामुळेच माझ्यासारखे त्यांचे सहाध्यायी अनेक क्षेत्रांना मुक्तपणे योगदान देऊ शकले.

मी आज जो काही कला,पत्रकारिता, साहित्य यासारख्या विविध क्षेत्रात सक्रिय आहे त्याचे संपूर्ण श्रेय शिक्षकातून एक नवे रसायन तयार करणाऱ्या कामत सरांना जाते. त्याचबरोबर अर्थशास्त्रासारख्या गुंतागुंतीच्या विषयाला पैलू पाडणारे स्व. डॉ. हरिश्चंद्र नागवेंकर, विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिकविणारे पुजारी सर, कवितेसारखे पदार्थ विज्ञान शिकवणारे डॉ. नरहरी जंबगी, वल्लभ कामत, नायरी सर आदींमुळेच शिकवण्याचे विविध कंगोरे अनुभवायला मिळाले. शिक्षक हा इतर घटकापासून फार वेगळा असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT