Tipu Sultan cruelty Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Tipu Sultan History: टिपू सुलतानच्या अत्याचारांमुळे मंगळूरच्या कोकणी भाषिक कॅथलिकांपैकी केवळ 15-20 हजारच जिवंत उरले.

Mangalorean Catholics persecution: श्रीरंगपट्टण हे नाव रंगनाथ मंदिरावरून पडले आहे जे नवव्या शतकात गंग राजवंशाच्या शासकांनी बांधले होते.

Sameer Panditrao

सर्वेश बोरकर

इतिहासकार लुईस बी. बौरी यांच्या मते, टिपू सुलतानने भारताच्या दक्षिणेकडील भागांत केलेला विनाश हा कुख्यात गझनीचा महमूद, अलाउद्दीन खिलजी आणि नादिर शाह यांनी भारतातील रहिवाशांवर केलेल्या अत्याचारांपेक्षा अधिक क्रूर होता. त्याचे सत्य जगाला सांगण्यासाठी बरेच काही उलगडणे बाकी आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या मंगळूर १४व्या शतकापर्यंत अलुपा राजवंशाची राजधानी होती. असेही म्हटले जाते की १४२९मध्ये विजयनगर राजा वीर देवराय दुसरा यांच्या कारकिर्दीत मंगळूर राज्यावर राज्य केले. पोर्तुगीज प्रवासी वास्को द गामा यांनी १४९८मध्ये पोर्तुगालहून भारताच्या प्रवासात उडुपी माल्पेजवळील सेंट मेरी बेटांवर उतरल्यावर हे बंदर शोधून काढले व पुढे १५२०साली मंगळूर पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले.

श्रीरंगपट्टण हे शहर कावेरी नदीच्या काठावर वसलेले आहे. श्रीरंगपट्टण हे नाव रंगनाथ मंदिरावरून पडले आहे जे नवव्या शतकात गंग राजवंशाच्या शासकांनी बांधले होते. हे म्हैसूरपासून १९ किमी अंतरावर आहे आणि मंगळूरपासून अनुक्रमे अंदाजे ३२० किमी अंतरावर. १७६३साली म्हैसूर शासक हैदर अलीने मंगळूरवर कब्जा केला. फेब्रुवारी १७६८साली ब्रिटिशांनी हैदरकडून मंगळूर ताब्यात घेतले. १७६८च्या अखेरीस, हैदर आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांनी ब्रिटिशांचा पराभव केला आणि मंगळूर पुन्हा ताब्यात घेतले.

तथापि, विजयानंतर हैदर अली आणि ख्रिश्चनांमध्ये अविश्वास निर्माण झाला. पोर्तुगीजांनी मंगळूरमधील त्यांच्याच कॅथलिकांना सोडले नाही आणि हैदर अलीविरुद्ध इंग्रजांना मदत केल्याच्या अफवा पसरवून त्यांचा विश्वासघात केला व कॅथलिकांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची सूचना केली.मंगळूर कॅथलिकांनी जनरल मॅथ्यूजला ३,३०,०००/- रुपयांची मदत केली असे हैदर अली यांना चुकीची माहिती देण्यात आली व असे मानलेही जाते.

६ डिसेंबर १७८२ रोजी हैदर अली याचे त्याच्या छावणीत निधन झाले. मलबार किनाऱ्यावरून टिपूला परत बोलावले जाईपर्यंत हैदरच्या सल्लागारांनी त्याचा मृत्यू गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच टिपू ताबडतोब सत्तेची सूत्रे हाती घेण्यासाठी परतला. त्याचे राज्यारोहण अडचणींशिवाय नव्हते. टिपू सुलतानचा भाऊ अब्दुल करीम याला गादीवर बसवण्यासाठी त्याच्या काकांनी केलेला प्रयत्न त्याला हाणून पाडावा लागला.

टिपू सुलतान आपल्या वडिलांच्या राजवटीत ख्रिश्चनांवर खूश नव्हता. टिपू सुलतानने ब्रिटिशांचा पराभव करून कन्नड आणि विशेषतः मंगळूरवर ताबा मिळवला तेव्हा त्याला एक उत्तम संधी निर्माण झाली. मंगळूरच्या कॅथलिकांविरुद्धच्या द्वेषाचे पहिले शस्त्र म्हणून त्याने त्यांना त्यांच्या भूमीतून हाकलून लावले आणि त्यांच्या राज्याची राजधानी श्रीरंगपट्टण येथे तुरुंगात टाकले.

२४ फेब्रुवारी १७८४ रोजी सुरू झालेला आणि ४ मे १७९९ रोजी संपलेला श्रीरंगपट्टण येथे मंगळुरी कॅथलिकांचा बंदिवास हा मंगळुरी कोकणीच्या इतिहासातील सर्वांत भयानक आणि विनाशकारी काळ होता. १७८४मध्ये मंगळूरच्या तहानंतर लगेचच, टिपूने कन्नड राज्यावर ताबा मिळवला. त्याने कन्नडातून ख्रिश्चनांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. असा अंदाज आहे की ६०,००० ते ८०,००० कॅथलिकांना पकडण्यात आले होते, त्यांपैकी बहुतेकांना मंगळुरू आणि उर्वरित कन्नड येथे प्रार्थना सुरू असताना चर्चमधून पकडण्यात आले होते आणि त्यांना पळून जाण्याची संधी नव्हती.

बंदिवानांमध्ये वृद्ध, तरुण आणि अगदी लहान मुले होती ज्यात बाळांचा समावेश होता आणि कोणीही वाचले नाही. त्यांना गुरांसारखे दोरीने बांधण्यात आले होते आणि त्यांना पश्चिम घाट पर्वतरांगांच्या दाट जंगलातून आणि दऱ्यांमधून सुमारे ४,००० फूट (१,२०० मीटर) चढण्यास भाग पाडले. बंटवाल-बेलथंगडी-कुलशेखर-विराजपेट-कूर्ग-म्हैसूर मार्गाने प्रवास एका गटाने केला आणि दुसरा गट गेरसोप्पा धबधबा (शिमोगा) मार्गाने प्रवास केला. मंगळुरू ते श्रीरंगपट्टण हे ३२० किमी अंतर होते आणि प्रवासाला सहा आठवडे लागले. श्रीरंगपट्टण पोहोचण्यापूर्वीच अनेकांचा मृत्यू झाला.

श्रीरंगपट्टणहून परतल्यानंतर बारकुर येथील एका मंगळुरी कॅथलिकने कन्नड भाषेत लिहिलेल्या बारकुर हस्तलिखितानुसार, भूक, आजार आणि सैनिकांनी केलेल्या गैरवर्तनामुळे त्यापैकी २०,००० श्रीरंगपट्टणकडे जाताना मृत्युमुखी पडले. जमालाबाद किल्ल्यावरील छावणीत, मंगळुरी कॅथलिक नेत्यांना किल्ल्यावरून खाली फेकण्यात आले.

टिपू सुलतानने २७ कॅथलिक चर्च नष्ट करण्याचा आदेश दिला. त्यामध्ये मंगळूर येथील नोसा सेनहोरा दे रोसारियो मिलाग्रीस चर्च, मोंटे मारियानो येथील फादर मिरांडाची सेमिनरी, ओमझूर येथील जेसू मेरी जोस चर्च, बोलार येथील कपेल, उल्लाल येथील मर्सेस चर्च, मुल्की येथील चर्च ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन, फेरार येथील सॅन जोसेफ, किरेम येथील नोसा सेनहोरा डोस रेमेडिओस, अत्तुर-कारकाला येथील सेंट लॉरेन्स, बारकुर येथील रोसारियो आणि बैंदूर येथील चर्च ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन यांचा समावेश होता.

श्रीरंगपट्टण येथे आल्यानंतर, ख्रिश्चन बंदिवानांना जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जात असे. त्यांना छळण्यात येत असे किंवा मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात येत असे. इस्लाम स्वीकारण्यास नकार देणाऱ्या अनेक मंगळुरी कॅथलिकांना तुरुंगात किंवा कोठडीत टाकण्यात येत असे.

इस्लाम स्वीकारण्यास नकार देणाऱ्या तरुणांचे नाक, वरचे ओठ आणि कान कापून त्यांचे शरीर विद्रूप करण्यात येत असे. त्यांना गाढवांवर बसवून शहरातून फिरवण्यात येत असे आणि नंतर त्यांना श्रीरंगपट्टणच्या कोठडीत टाकण्यात येत असे. कॅथलिकांवर केलेली क्रूरता प्राण्यांपेक्षाही वाईट होती आणि त्याला कोणतीही मर्यादा नव्हती.

४ मे १७९९ रोजी श्रीरंगपट्टणच्या लढाईत, जॉर्ज हॅरिस, डेव्हिड बेयर्ड आणि आर्थर वेलेस्ली यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्याने किल्ल्यावर हल्ला केला आणि टिपू सुलतानला ठार मारले. चौथ्या अँग्लो-म्हैसूर युद्धात त्याच्या मृत्यूनंतर, मंगळुरी कॅथलिकांना त्याच्या कैदेतून मुक्त करण्यात आले. टिपू सुलतानने बंदिवान केलेल्या ८०,००० मंगळुरी कॅथलिकांपैकी फक्त १५,०००-२०,००० लोक जिवंत वाचू शकले आणि परत मंगळूरला येऊ शकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT