Suryakumar Yadav: 'मिस्टर 360, माझी मदत कर...' सूर्यकुमार यादवने डिव्हिलियर्सकडे मागितली मदत, फलंदाजीत होणार मोठे बदल?

Suryakumar Yadav ODI struggle: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याची तुलना नेहमी दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डिव्हिलियर्स याच्याशी केली जाते.
Suryakumar Yadav AB de Villiers Help
Suryakumar Yadav AB de Villiers HelpDainik Gomantak
Published on
Updated on

Suryakumar Yadav AB de Villiers Help: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याची तुलना नेहमी दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डिव्हिलियर्स याच्याशी केली जाते. डिव्हिलियर्सप्रमाणेच सूर्यकुमारही मैदानात चारही बाजूंना तूफानी फटकेबाजी करतो. टी-20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार आज जगातला नंबर-वन फलंदाज असून तो भारतीय संघाचा कर्णधारही आहे. पण, एका फॉरमॅटमध्ये तो अपयशी ठरला तो म्हणजे वनडे (ODI) क्रिकेट.

सूर्यकुमारला डिव्हिलियर्सची मदत का हवी?

सूर्यकुमारला वाटते की, त्याची वनडे कारकीर्द धोक्यात आली आहे. एबी डिव्हिलियर्सने टी-20 आणि वनडे या दोन्ही फॉरमॅटमध्ये खूप यश मिळवले. पण, सूर्यकुमार टी-20 मध्ये यशस्वी झाला तर वनडेमध्ये अपयशी ठरला. म्हणून त्याला डिव्हिलियर्सला भेटून हेच विचारायचे आहे की, त्याने दोन्ही फॉरमॅटमध्ये समतोल कसा साधला?

Suryakumar Yadav AB de Villiers Help
Suryakumar Yadav: आशिया कप जिंकल्यानंतर 'सूर्या'ची गोव्यात एंट्री! मंत्री माविन गुदिन्हो यांनी केलं स्वागत Watch Video

वनडेमध्ये काय अडचण आहे?

सूर्याने 2021 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी टीमला वाटले होते की, तो टी-20 चा धडाका 50 षटकांच्या सामन्यातही दाखवेल. त्याने आतापर्यंत 37 वनडे सामने खेळले, पण त्याची सरासरी फक्त 25.76 आहे. यात त्याला फक्त चार अर्धशतकेच करता आली. 2023 च्या विश्वचषकातही तो मोठी खेळी करु शकला नाही. विश्वचषकानंतर त्याला वनडे संघातून वगळण्यात आले. त्यामुळे त्याने केवळ टी-20 क्रिकेटवरच फोकस केला.

Suryakumar Yadav AB de Villiers Help
Suryakumar Yadav: सॅल्युट 'सूर्यकुमार यादव', कॅप्टनने आशिया चषकातून मिळालेली संपूर्ण मॅच फी भारतीय सैन्याला केली दान

सूर्यकुमारची विनंती

पत्रकार विमल कुमार यांच्या एका कार्यक्रमात बोलताना सूर्याने थेट कॅमेऱ्याकडे पाहून डिव्हिलियर्सला कळकळीची विनंती केली. तो म्हणाला, "एबी (AB), जर तू हे ऐकत असशील, तर कृपया माझ्याशी लवकर संपर्क साध! कारण माझ्या कारकिर्दीतील पुढची 3-4 वर्षे खूप महत्त्वाची आहेत. मला वनडे क्रिकेट खेळण्याची खूप आवड आहे. मी टी-20 आणि वनडेमध्ये समतोल साधू शकलो नाही. कृपया, मला मदत कर!"

सूर्यकुमारला आशा आहे की, डिव्हिलियर्सच्या मार्गदर्शनाने तो आपला खेळ सुधारु शकेल आणि पुन्हा विश्वचषक संघात स्थान मिळवू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com