Socorro Village Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Socorro: सफर गोव्याची! डोंगराच्या पायथ्याला वसलेले, शेतीसंपन्न 'सुकूर'

Socorro Village Goa: सुकूर या गावाला हे नाव का पडले, हे काही वर्षे मला माहीत नव्हते. कुणाला कधी विचारले तर तेही त्यांना सांगता येईना.

गोमन्तक डिजिटल टीम

सुकूर या माझ्या गावातील शेते, रस्ते, उघडे माळ, डोंगर, मानस अन् एकोशी पर्वरीचे लाल-काळे रस्ते, छोटे-मोठे चर्च अजून मला ओळखतात, कारण आठ-दहा वर्षांपासून मी इकडे तिकडे सायकल चालवून पूर्ण गाव फिरुन येत होतो. अभ्यास करून झाल्यावर संध्याकाळचा आमचा हाच उद्योग.

पूर्वीचं वय आमचं राहिलं नाही, पूर्वीचा गाव राहिला नाही. पण आठवणी मात्र हिरव्याच राहिल्या. सुकूर गावात अनेक वाडे आहेत. त्यातील अंबीर्ण वाड्यावर एका आध्यामिक केंद्रात आमचे वास्तव्य. लहान असल्याने येणारे जाणारे साधकांकडून मत्ता अनेक शिस्तीचे, वागणुकीची धडे मिळाले. चांगल्या व्यक्तींची संगत मिळाली की त्यामुळे चांगलं ते स्वीकारण्याची आवडही लागली. हे सर्व या सुकूर गावची देणगी आहे, असे मी समजतो.

सुकूर या गावाला हे नाव का पडले, हे काही वर्षे मला माहीत नव्हते. कुणाला कधी विचारले तर तेही त्यांना सांगता येईना.

पण हल्लीच मी ऐकलं की, सुकूर हे एका मुलीचे नाव आहे, आणि त्याचा दुसरा अर्थ आहे, मदत. हे मूळ नावच आहे पोर्तुगीज की, स्पॅनिश भाषेतील, त्यामुळे त्याबद्दल अर्थ शोधण्यासाठी डोके खाजवायचेच नाही.

सुकूर गावात गेलेले बालपण ते तरुणपणाचा काळ हा माझ्या जीवनाचा पाया रचणारा काळ. याच काळात माझ्या गावच्या मातीत फिरलो, खेळलो अन् पावसात वाहत्या नाल्यात यथेच्छ पोहलोही.

घराच्या बाजूला एक नाला होता त्या नाल्यांत पावसाळ्यात डोंगरावरून पाणी उसळी खात धावत येत होते. पहिल्या पावसात खूप कचरा वाहून गेला की, नंतरच्या काळात पावसाचे निव्वळ पाणी वहात येई, हे पाणी सुकूरमधल्या शेतीला मिळे.

या मानशीला काही लोक जाळी लावून मासे काढीत. आजूबाजूच्या लोकांना याच मानशीवरची मासळी संध्याकाळी मिळे. मासळीसाठी म्हापसा अथवा पणजीला जाण्याची गरज नसे. आता तो तो काळ नाही.आता मासळीची पाटी स्कूटरच्या मागे बांधून गावागावात मासे विक्री होते.

सूकूर या हे गाव पर्वरी डोंगराच्या पायथ्याला असलेले. गाव गाठण्यासाठी चढ-उतार करावा लागतो. पूर्वी शेतीचा आधार होता.

शेतीचा हंगाम असेल त्यावेळी शेती, नाहीतर उरल्या काळात मुळा , लालभाजी, कांदे, मिरच्या यांचे पाणी शिंपण करून पीक काढीत. पावसाळ्याचे काही महिने सोडले तर कष्टकरी लोक पूर्वी शेतात राबताना दिसत. गावात घरेसुद्धा कौलारू, एक-दोन स्लॅबची घरी मोठी घरे होती, तीही पोर्तुगीज काळातील. घरेही ऐसपैस पण टोलेजंग नव्हे. काही घरे तर कायमची बंद असत, कारण घराचे मालक पोटा-साठी, पैसे कमविण्यासाठी गाव सोडून परदेशीच गेलेले.

पर्वरी विकसित होत गेली अन् लोकांची वर्दळ सुकूर गावात वाढली होती. शेती बुजवून तेथे नवनवीन हौसिंग कॉम्प्लेक्स उभी राहिली. नव्या पिढीतील लोकांनी होती ती शेतजमीन विकून सरकारी नोकरीत शिरली.

त्यामुळे पूर्वी जी शेती हिरवीगार वाटायची, ते सारे चित्र आता इतिहास जमा झाले आहे. नव्या इमारती, नव्या गाड्या, नवे लोक, नवे मोबाईलसह ऐश्‍वर्यात लोळणारी संस्कृती आता सुकूर परिसरात दिसते. सारी बदलत्या काळाची लक्षणे दिसू लागली आहेत. पण माझे गाव गावची माती-गावचे ते लोक ज्यांनी काही सुखसोयी नसताना सारे उभे केले, त्या गावचा भारतीय संस्कृतीचा मला अभिमान आहे.

सिद्धेश श्रीकांत देसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Accident: चिंबल महामार्गावर रुग्णवाहिका उलटली; चालक, परिचारिका सुखरूप; अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा

Goa Sports: 'गोव्यातून ऑलिंपियन घडवायचाय'; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे मोठे लक्ष्य, क्रीडा शिक्षकांना संघटनांशी समन्वय साधण्याचे आवाहन

Cutbona Jetty Dengue: कुटबण जेटीवर डेंग्यूचा शिरकाव! 2 मजूर बाधित; आरोग्य खात्याकडून 2.5 हजार मजुरांची तातडीने तपासणी

Omkar Elephant: 'ओंकार' हत्तीचा 'राजेशाही' प्रवास! बांदा-डेगवे मार्ग अडीच तास ठप्प; हत्ती पुढे अन् वाहनांच्या लांबच लांब रांगा मागे

मित्रासोबत बारमध्ये दारू पिली, नंतर खून केला अन् मोबाईल घेऊन यूपीमध्ये फरार; मित्राच्या हत्येप्रकरणी संशयिताचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

SCROLL FOR NEXT