Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Opinion: जानेवारीत गोयचो दौरो करप जालेंच, तर मेळूया गोयांनच! अट्टल गोंयकाराचे मराठी मन..

Goa Opinion: गेल्या वर्षी त्यांनी ‘शोध मराठी मनाचा’ हे जागतिक संमेलन साताऱ्यात घेतलं होतं. अखिल भारतीय मराठी महामंडळानं लगेच आपलं अखिल भारतीय संमेलन यंदा साताऱ्यात घेतलं.

गोमन्तक डिजिटल टीम

कु. सरोज चंदनवाले

न अस्कार! मराठी मोनाचो सोध घेवपाक मनशाक किदे किदे करपाक पडतत, सांगू नवजो. ओसो निरंतर सोद घेवपी आमचो मनीस जर जगनमित्र स्वामी रामदासबाप फुटाणे हो असत तर सांगपाकच नाका. ताणे वाट मळप आनी हेरानी चलप अशेंच मराठी सासयेन चालू आसा.

मराठी मनाचा शोध घेण्याची ही मोहीम स्वामी रामदासनानांनी गेली अनेक वर्षं चालवली आहे, त्यात खंड म्हणून कधी पडला नाही. दरवर्षी ते एक नामचीन मराठी मन शोधून काढतात, म्हणजे काढतातच. नुसतंच शोधून काढत नाहीत, तर त्याचा गौरवही करतात.

गेल्या वर्षी त्यांनी ‘शोध मराठी मनाचा’ हे जागतिक संमेलन साताऱ्यात घेतलं होतं. अखिल भारतीय मराठी महामंडळानं लगेच आपलं अखिल भारतीय संमेलन यंदा साताऱ्यात घेतलं. पण यावेळे रामदासस्वामींनी डायरेक्ट पणज्येनच उडी मारल्यां. म्हणजे शंभरावं मराठी साहित्य संमेलनही पणज्येक जातले की काय?

होय, जागतिक मराठी अकादमीचं ‘शोध मराठी मनाचा’ संमेलन या वरसां गोमंतकाच्या सळसळत्या माडांत, रेंदेराच्या गाण्यांत, फेणीच्या धुंद वाऱ्यांत, नुस्त्यां नि हुमणाच्या स्वादभूमीत जावपाचें ठरलां. ख्यातनाम मराठी मन आशील्ले थोर अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिलबाब काकोडकार हे संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत.

यावेळां तांका दोन जबरदस्त मराठी मनं सापडल्यांत. एक अट्टल गोंयकार मन आहे. त्यांचं नाव गोंयचे प्रसिध्द उद्योजक अनिलबाब खंवटो!! त्यांच्या गोंयकार मनात मराठी मनही दडलेलं आहे, हे स्वामी रामदासांपासून लपून राहिलं नाही.

दुसरं नाव तर खल्लास काम आहे!! नामनीचॅ बावर्ची माने शेफ, फुलटाइम फूड हिस्टोरियन आणि पार्टटाइम फिल्ममेकर, थोडॉसो ॲक्टर, बरोचसॉ प्रोड्यूसर, खूपसो मुलाखतकार, इल्लोसो लेखक, खूपसो यारदोस्त असे श्री. रा. महेशबाब वामनराव मांजरेकार यांचं खूप खूप यंवकार! त्यांच्या नावाशी यंदाचा मराठी मनाचा शोध संपला! संपला! संपला!!

ऐन गोव्याच्या भूमीत त्यांना मराठी संस्कृती आणि भाषेच्या उन्नयनात योगदान दिल्याखातर जागतिक मराठी अकादमीचा मानाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ९ जानेवारीला पणजीत हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात येईल.

महेशबाब मांजरेकार यांचा परिचय मी काय करुन देणार? एक नंबरचॅ जेवण करपी महेशबाब यांच्या हातचें सुंगटांचें हुमण ज्याने खाल्लें त्याका मोक्षप्राप्तीचो आनंद मेळटां!मांजरेकरांना खाण्यापिण्यातून, मुलाखतीबिलाखती घेण्यातून, वेळबिळ मिळाला तर ते एखादा सिनेमा काढतात. तो कधी लिहितात, हे एक कोडंच आहे.

प्रत्येक सिनेमाच्या वेळी मुलाखती देताना ‘मी ही फिल्म तीन वर्षापूर्वीच लिहिली होती’ असं सांगतात. एक तर ते मुलाखती देतात, किंवा घेतात तरी! दिली, घेतली तरी ती स्फोटक असतेच. एकतर काही जणांना त्यामुळे सीने में जलन होतं किंवा थेट मनोमीलनच होतं…असो.

मांजरेकरबाब नुस्ते खावप्यांसाठी दिलदार यजमान आहेत. त्यांच्या घरी कायम इतके पाहुणे जेवायला असत की शेवटी घरच्या मंडळींनी त्यांना ‘त्यापेक्षा हाटेल काढा’ असा टोमणा मारला, त्यांनी तो सीरिअसली घेतला,

अशी एक आख्यायिका सिनेवर्तुळात सांगितली जाते. त्यांचे होनहार चिरंजीव सत्या मुंबयेक ‘सुकासुखी’ नावाचं माश्यांचं हाटेल चालवतात. तिथं भारी मत्स्याहार मिळतो, असंही कळतं.

दुसरं ‘आमची’ हाटेल त्यांनी डायरेक्ट कळंगुट बीचला लागूनच काढलंय. त्यांची लाडकी चल्ली अश्वमि ते चालवते. तिथं मराठी मनाला आवडणारे पदार्थ मिळतात, अशी एक लोककथा गोमंतकात प्रचलित आहे.

सारांश इतकोच की, आता जानेवारीत गोयचो दौरो करप जालेंच, तर मेळूया गोयांनच!! किदें? देव बोरे कोरो!!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Scrapyards: भंगारअड्ड्यांवर पडला छापा, गोव्यात सापडला बांगलादेशी घुसखोर; सत्तरीतील बेकायदेशीर अड्डयांमुळे 3 वर्षांपूर्वीची घटना चर्चेत

Goa Spiritual Festival 2026: गोव्यात रंगणार 'स्पिरिच्युअल फेस्टिव्हल', लंडन येथे घोषणा; देवस्थानांची दर्शनयात्रा, तारखा जाणून घ्या..

Goa Beach: "भज मन राधे गोविंदा!" हरमल बीचवर चक्क विदेशी पर्यटकांनी गायले 'भजन'; गोव्याच्या किनाऱ्यावरील व्हिडिओ तुफान व्हायरल

IFFI: 'इफ्फीसाठी गोव्यात येणे म्हणजे नवीन शिकण्याजोगे'! प्रसिद्ध दिग्दर्शक अलींचे गौरवोद्गार; सिनेमात जग बदलण्याची क्षमता असल्याचे मांडले मत

Goa Opinion: गोव्यातल्या वाढत्या दरोड्यांमुळे लोकांच्यात वाढलेली भीती, पोलिसांच्या बदल्या; वरवरचे बदल करून काय साध्य होणार?

SCROLL FOR NEXT