International Youth Day | Shivaji Maharaj History  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Shivaji Maharaj: तोरणा किल्ल्यावर धन सापडले, शिवाजी महाराजांनी उभा केला अद्भुत गड; तरुणांसाठी प्रेरणादायी गोष्ट

International Youth Day: वयाच्या पंधराव्या- सोळाव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पाऊल उचलणाऱ्या महाराजांचे विचार तरुणांनी समजून घेणे खूप आवश्यक आहे.

Sameer Panditrao

या लेखातील महत्वाचे मुद्दे

1.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुणांनी समजून घेणे महत्वाचे आहे.

2.तोरणा किल्ला जिंकल्यावर त्याचे काम सुरु असताना धन सापडले होते.

3.महाराजांनी दूरगामी विचार करत हे धन वापरून राजगडाची निर्मिती केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वांसाठी आदर्शवत आहे. पण त्यांच्या चरित्रातील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यांचा दूरदर्शीपणा आणि नेतृत्वकौशल्य. वयाच्या पंधराव्या- सोळाव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पाऊल उचलणाऱ्या महाराजांचे विचार तरुणांनी समजून घेणे खूप आवश्यक आहे.

तोरणा मोहिमेनंतर एक घटना घडली. जी घटना नक्कीच तरुण वर्गाने प्रेरणा घ्यावी अशी आहे. महाराजांनी हा गड हेरून ठेवला होता. त्यांच्या सोबत्यांनी गडाची संपूर्ण माहिती गोळा करून ठेवली होती. कानदखोऱ्यातील हा गड दणकट होता.

हा गड तसा दुर्लक्षित होता. महाराजांनी मावळ्यांना सोबत घेतले, गडावर छापा घातला आणि गड ताब्यात घेतला. हर हर महादेवची गर्जना आसमंतात दुमदुमली. तोरण्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली. या गडाच्या तटाचे काम सुरु असताना चमत्कार झाला. तिथे प्रचंड भूमिगत धन सापडले.

महाराज आणि त्यांचे सोबती आनंदले. स्वराज्याच्या स्वप्नाला पहिल्याच पायरीवरती बळ मिळाले. यावेळी महाराज आणि त्यांच्या सोबत्यांचे वय पंधरा सोळाच्या दरम्यान होते.

पण स्वराज्याच्या स्वप्नाने या सर्वांना इतके झपाटून टाकले होते की या सापडलेल्या धनाचा वापर फक्त आणि फक्त आपल्या राज्यासाठी करायचे ठरले. यातील एकही पैशाचा वापर वैयक्तिक कामासाठी केला गेला नाही.

महाराजांच्या डोक्यात मुरुंबदेवाचा डोंगर होता. त्यांनी हा अर्धवट गड ताब्यात घेतला. आणि सापडलेल्या ध्यानातून आपले महत्वाचे स्वप्न साकार करायला सुरुवात केली. महाराजांनी या मुरुंबदेवाच्या डोंगराला नाव ठेवले राजगड.

स्वराज्यातील अत्यंत महत्वाचा गड. माच्या, बालेकिल्ला, सदर कारखाने, पाण्यासाठी तलाव अशा एकेक गोष्टी आकाराला येत होत्या. स्वराज्याची राजधानी सजत होती. होय, रायगडापूर्वी हा गड स्वराज्याची पहिली राजधानी बनला.

महाराजांनी आपला कारभार इथून सुरु केला. आयुष्यातील बराच काळ महाराजांनी इथे वास्तव्य केले. तरुण वयात महाराजांनी मिळालेल्या धनाचा वापर करून, बादशहाची टांगती तलवार सतत मानेवर असताना हे दूरगामी निर्णय घेतले आणि यशस्वी करून दाखवले. आजही आपण राजगडावर गेलो तर त्याचे रूप बघून थक्क होतो.

FAQs

Q1.छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र का आदर्श आहे?

A1.त्यांचा दूरदर्शीपणा, नेतृत्वकौशल्य आणि स्वराज्य स्थापनेचा प्रचंड उत्साह हा त्यांचा आदर्श बनवतो.

Q2.स्वराज्य स्थापनेसाठी महाराजांनी धनाचा वापर कसा केला?

A2. सापडलेले धन फक्त राज्यबांधणीसाठी वापरले, वैयक्तिक वापराला स्थान दिले नाही.

Q3. राजगडाचे महत्त्व काय आहे?

A3. राजगड स्वराज्याची पहिली राजधानी होती, ज्यावर महाराजांनी आपल्या कारभाराची सुरुवात केली.

Q4.अंतरराष्ट्रीय युवक दिन कधी साजरा केला जातो?

A4. १२ ऑगस्ट रोजी प्रत्येक वर्षी अंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो.

Q5. अंतरराष्ट्रीय युवक दिनाची सुरुवात कधी झाली?

A5. १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी पहिला अंतरराष्ट्रीय युवक दिन घोषित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault: 'त्या मंत्र्याचे नाव जाहीर करा, कोड्यात काय बोलता...' रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात सुदिन यांचं प्रतिआव्हान

USA Cricket Board Suspended: पाकिस्तानची दाणादाण उडवणाऱ्या अमेरिका संघाला ICC चा दणका, सदस्यत्व केलं निलंबित; 'हे' ठरलं कारण

IND vs AUS: 14 वर्षांचा पोरगा बनला षटकारांचा नवा बादशाह! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; तूफानी खेळीनं उडवली कांगांरुची झोप VIDEO

Goa Rain: काळजी घ्या! पाऊस पुन्हा गोव्यात, हवामान विभागाचा 'यलो अलर्ट', 6 दिवस जोरदार कोसळणार

SL Bhyrappa Passed Away: प्रसिद्ध कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचे निधन; वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT