Saint Augustine Convent Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

शिराझमध्ये कैदेत इस्लाम स्वीकारण्याची बादशाहची मागणी नाकारली, धर्मगुरू अँजोस गोव्यात पळून गेला; जॉर्जियन राणी सेंट केटेवन

Saint Augustine Convent history: पोर्तुगीज स्रोतांमध्ये उल्लेख केलेल्या खिडकीजवळ त्याचा केपिंग दगड आणि एका काळ्या पेटीत अनेक हाडांचे तुकडे सापडले.

गोमन्तक डिजिटल टीम

सर्वेश बोरकर

सेंट ऑगस्टीन पंथ १५७२ मध्ये पोर्तुगालहून गोव्यात धर्मगुरूमार्फत पोहोचला आणि १८३४ च्या सुमारास ऑगस्टीन पंथाचा र्‍हास होईपर्यंत मॉन्टे सँन्टो हे या सदस्यांचे केंद्र बनले. ऑगस्टीनियन्सनी लवकरच गोव्यातील या मॉन्टे सँन्टो टेकडीवर कॉन्व्हेंट आणि सेंट ऑगस्टीनच्या चर्चचे बांधकाम केले असे इतिहासकार लिहितात.

त्यांच्या मते चर्चची इमारत गॉथिक शैलीची होती. हे सुंदर चर्च सांता मोनिका कॉन्व्हेंटच्या जवळजवळ त्याच वेळी बांधले गेले होते; आणि त्याबद्दल एक कहाणी ऐकवली जाते. ज्याला त्याचे बांधकाम सोपवण्यात आले होते त्या इटालियन वास्तुविशारदाने ते चर्च दोनदा बांधले, परंतु दोन्ही वेळा त्याचे श्रम पडझडीमुळे निष्फळ ठरले.

निराशेच्या गर्तेत अडकून, त्याने ते तिसऱ्यांदा पुन्हा बांधले आणि त्याची स्थिरता सिद्ध करण्यासाठी स्वतःला आणि त्याच्या एकुलत्या एका मुलाला थेट त्याखाली ठेवले आणि इमारतीजवळ एक तोफ आणून डागण्याचा आदेश दिला व बांधकाम कोसळल्यास पुन्हा निराश होण्यापेक्षा आपला जीव गमावणे पसंत केले.

सुदैवाने त्या धक्क्यात बांधकाम टिकून राहिले व इटालियन वास्तुविशारद कामाच्या टिकाऊपणाबद्दल समाधानी झाला. त्याच्या कष्टांसाठी त्याला योग्य मोबदला मिळाला. सोळाव्या शतकाच्या अखेरीस इराणमध्ये एक महत्त्वाची घटना घडली.

पर्शियन सिंहासनाचा वारस शाहहमजा मिर्झा खूप आजारी पडला आणि जॉर्जियातील त्याच्या ख्रिश्‍चन पत्नीने देवाला प्रार्थना केली व तो बरा झाला. आपण रोगमुक्त झाल्यास स्वत: व संपूर्ण राष्ट्र ख्रिश्‍चन होईल, असे वचन त्याने पत्नीला दिले होते. त्याचा हा संदेश इराणात राहणाऱ्या एका आर्मेनियनद्वारे गोव्यात पोहोचला.

किझिलबाश नेता मुर्शिद कली खानने १५८८मध्ये एका बंडात शाहला पदच्युत केले आणि १६ वर्षांच्या शाह अब्बासला गादीवर बसवले. परंतु त्या धूर्त मुलाने लवकरच सत्ता हाती घेतली. दरम्यान इराणच्या शेजारच्या देशात जॉर्जियामध्ये, राणी केटेवन काखेतीच्या राजकुमार डेव्हिडशी लग्न जुळते. डेव्हिडचे वडील, राजा अलेक्झांडर दुसरा यांचे आणखी दोन मुलगे होते, जॉर्ज आणि कॉन्स्टँटाईन.

कॉन्स्टँटाईनने इस्लाम स्वीकारला आणि शाह अब्बास पहिलाच्या दरबारात त्याचे संगोपन झाले. तथापि, सिंहासनावर बसलेला तरुण राजा डेव्हिड अचानक मरण पावला, त्याच्या पश्चात केटेवन आणि तिची दोन मुले, तेमुराझ आणि एलेन राहिली.

पुढे तेमुराझ मोठा होतो, तो आणि शाह अब्बास मित्र बनतात, तेमुराझची पत्नी आना घशाच्या कर्करोगाने मरण पावते आणि अखेर तो तेमुराझ सिंहासनावर कब्जा करतो. १६१४मध्ये शाह अब्बास जॉर्जियन राजा तेमुराझला कळवतो की त्याचा मुलगा ओलीस ठेवला जाईल आणि तेमुराझला त्याचे मुलगे आणि आई केटेवन इराणला पाठवण्यास भाग पाडले जाते.

इराणच्या ३० प्रांतांपैकी एक असलेल्या फार्सची राजधानी शिराझच्या एका कथेनुसार, जॉर्जियाची राणी केटेवनला अखेर हेरगिरी व रशियन लोकांना पाठिंबा दिल्याचे कारण सांगून शाहने तुरुंगात टाकले आणि तिच्या नातवंडांचे नपुंसकीकरण आणि धर्मांतर करण्यात आले.

काही काळानंतर शाह अब्बासने केटेवनला इस्लाम स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचा आपला इरादाही जाहीर केला. जर तिने सहमती दर्शवली तर तिला राणी म्हणून सन्मानित केले जाईल आणि जर तिने नकार दिला तर तिला सार्वजनिक छळ केला जाईल.

जे घडले ते प्रत्यक्षदर्शी ऑगस्टिनियन धर्मगुरू ॲम्ब्रोसियो डोस अँजोस यांनी कथन केले आहे, ज्यांना १६२३ मध्ये शिराझमध्ये एक लहान धर्मशाळा आणि चर्च सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती .पुढे आताच्या जॉर्जिया देशाच्या राज्यांपैकी एक काखेतीच्या राणी केटेवनचे अवशेष भारतात जुन्या गोव्यातील मॉन्टे सँन्टो येथील ऑगस्टिनियन संकुलात विसावले.

शिराझमध्ये कैदेत असताना, तिने इस्लाम स्वीकारण्याची सफाविद बादशाहची मागणी नाकारली आणि तिचा छळ करण्यात आला. ही परीक्षा पोर्तुगीज ऑगस्टिनियन मिशनऱ्यांनी पाहिली, १६२६ मध्ये, ऑगस्टिनियन लोकांना अस्थिर शाहच्या क्रोधाचा सामना करावा लागला आणि त्यांना पळून जावे लागले.

धर्मगुरू ॲम्ब्रोसियो अँजोस गोव्यात पळून गेला ज्यांनी राणीचे अवशेष इस्फहान आणि अखेरीस भारतात आणले. मृत राणीच्या उजव्या हाताचे हाड रोममधील पिएत्रो डेला व्हॅले यांना सोपवण्याच्या उद्देशाने गोव्यात नेण्यात आले. गोव्यातील धर्मगुरूंनी गोव्यात अवशेष ठेवण्याचा निर्णय घेतला आणि राणीचा फक्त खालचा जबडा डेला व्हॅलेकडे पाठवला. गोव्यातील धर्मगुरूंनी नोसा सेनहोरा दा ग्राका या सेंट ऑगस्टीन चर्चमधील खिडकीजवळ प्रदर्शित केलेल्या काळ्या दगडाच्या पेटीत हाडे जतन केली होती असा उल्लेख पोर्तुगीज स्रोतांमध्ये सापडतो.

जॉर्जियन लोकांसाठी राणी सेंट केटेवनचे महत्त्व गेल्या दशकात, गोव्यात अवशेषाचा शोध घेण्यास कारणीभूत ठरले. १९८९पासून, जॉर्जियाहून येणाऱ्या विविध शिष्टमंडळांनी ऑगस्टिनियन कॉन्व्हेंटच्या अवशेषांमध्ये केटेवनची कबर शोधण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे डॉ एम. ताहिर यांच्यासोबत काम केले.

२०००-२००१ या दरम्यान जॉर्जियाचे डॉ. केंचोशव्हिल यांनी भारत सरकारची परवानगी घेतली आणि दुसऱ्या खिडकीजवळ उत्खनन केले, परंतु ते अवशेष शोधू शकले नाहीत. अखेर मे २००४मध्ये, स्रोतांमध्ये उल्लेख केलेले चॅप्टर चॅपल आणि खिडकी सापडली. जरी दगडी कलश गायब होता, तरी पोर्तुगीज स्रोतांमध्ये उल्लेख केलेल्या खिडकीजवळ त्याचा केपिंग दगड आणि एका काळ्या पेटीत अनेक हाडांचे तुकडे सापडले.

भारतात हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीचे डॉ. निरज राय यांनी सेंट ऑगस्टीन कॉन्व्हेंटमधून उत्खनन केलेल्या मानवी हाडांच्या अवशेषांवर माइटोकॉन्ड्रियल डीएनएचे अनुक्रम आणि जीनोटाइपिंग करून डीएनए विश्लेषण केले. अवशेषांच्या तपासणीत एक असामान्य माइटोकॉन्ड्रियल डीएनएचे हॅप्लोग्रुप आढळून आला, जो भारतात सापडत नाही, परंतु जॉर्जिया आणि आसपासच्या प्रदेशांत आढळतो.

अनुवांशिक विश्लेषण पुरातत्त्वीय आणि साहित्यिक पुराव्यांना पुष्टी देत असल्याने, उत्खनन केलेले हाड जॉर्जियाच्या राणी सेंट केटेवनचे असण्याची शक्यता मानली गेली. आज जॉर्जिया आणि भारत यांच्यात उत्कृष्ट राजनैतिक संबंध आणि व्यावसायिक संबंधांचा विस्तार झालेला आहे. पुढे हाच जॉर्जियन देश भारत, इराण आणखी रशिया यांच्यातले संबंध मजबूत करण्यात व मुख्य भूमिका बजावण्यात भारताला मदत करू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar: 'रामाच्या 'बोलवत्या धन्या'ला शोधा', खासदार तानावडेंचा रोखठोक पवित्रा; म्हणतायत, "हे आरोप निराधार"

Shubman Gill Catch: फलंदाजीत शतक, फिल्डिंगमध्ये 'सुपरमॅन'; हवेत उडी घेत गिलने टिपला अविश्वसनीय झेल, VIDEO पाहून व्हाल थक्क

गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेला सलाम! काही तासांतच शोधून दिलं बेळगावच्या महिलेचं 4.5 लाखाचं 'मंगळसूत्र', बागा येथील घटना

World Cup Prediction: 'मी 2026 च्या विश्वचषकात खेळेन...' अनकॅप्ड खेळाडूचा दावा कशाच्या आधारावर? प्रीती झिंटाचा आवडता खेळाडू चर्चेत

Filmfare Award: बॉलीवूडमध्ये गोव्याचा डंका! 'Article 370' साठी आदित्य जांभळे यांना फिल्मफेअर पुरस्कार

SCROLL FOR NEXT