Alupa Dynasty: हजारो वर्षे जुनी, अल्वाखेडा किनारी प्रदेशातील सत्ता; प्राचीन आलुप घराणे, कर्नाटक तुळु-नाडूची संस्कृती

Tulu Nadu Karnataka: सोमेश्वरातील सोमेश्वर मंदिर कुलशेखर अलुपेंद्रच्या कारकिर्दीत सोमशर्माच्या सन्मानार्थ बांधले गेले होते आणि ते नवदुर्गांच्या शिल्पांनी सजवले गेले होते.
Alupa Dynasty | Tulu Nadu Karnataka
Alupa Dynasty | Tulu Nadu KarnatakaDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

तुलुनाडूच्या इतिहासात प्राचीन काळापासून राज्य करणाऱ्या घराण्यांपैकी आलुप हे सर्वांत महत्त्वाचे घराणे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा एक हजार वर्षांहून अधिक काळापासूनचा इतिहास आपल्याला सापडतो. अलुपांची भूमी आलवखेडा ग्रीक लोकांना ओलोखोइरा म्हणून ओळखली जात असे.

कन्नड शिलालेखांपैकी सर्वांत जुने हल्मिडी शिलालेख बहुधा अलुप घराण्याशी संबंधित आहेत अशी एक मान्यता आहे. अलीकडेच सापडलेल्या गुडनापूर शिलालेखात, जो इसवी सनाच्या सहाव्या शतकात लिहिला गेला आहे, तो कदंब शासक रविवर्माच्या अधीनस्थांनापैकी एक म्हणून आळूप शासकाचा उल्लेख सापडतो.

आळूपांनी सुरुवातीच्या काळापासून स्वतःला सत्तेत स्थापित केले होते आणि बहुतेकदा, कर्नाटक अधिपतींना स्वेच्छेने अधीनता दाखवून, विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेपर्यंत ते होते. असे म्हटले जाते की दक्षिण कर्नाटक जिल्हा आणि उत्तर कर्नाटक जिल्ह्याचा गोकर्णापर्यंतचा किनारी प्रदेश त्यांच्या राज्यात समाविष्ट करण्यात आला होता.

ज्या राजकीय उलथापालथींना अलुपा शासक बळी पडले त्यानुसार, त्यांची राजधानी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आली. मंगळपुरा (मंगळूर) ही त्यांची पहिली राजधानी असावी.

८व्या शतकात त्यांनी उदयपूर (उद्यावर) हे त्यांचे राजकीय केंद्र म्हणून निश्चित केल्याचा उल्लेख सापडतो. त्यानंतर, बाराकुरू हे अधिकाराचे केंद्र होते आणि पुन्हा एकदा, कदाचित, ११व्या ते १३व्या शतकापर्यंत, मंगळपूर (मंगळूर) त्यांच्या कायदेशीर अधिकाराचे केंद्र बनले आणि ते त्यांच्या राजकीय सत्तेच्या शेवटपर्यंत त्यांचे स्थान राहिले. कर्नाटक आधिपत्याचे (बनवासीचे कदंब, बादामीचे चालुक्य, मान्यखेताचे राष्ट्रकूट, कल्याणचे चालुक्य, द्वारसमुद्राचे होयसळ आणि विजयनगरचे राय) या विविध राजघराण्याचे ते सामंत होते. तुळु-नाडूची संस्कृती कर्नाटक सांस्कृतिक संकुलाचा भाग होती.

आळू या शब्दाचा अर्थ ‘राज्य’ असा होतो, कदाचित या घराण्याच्या जनकाचे नाव आळूप किंवा अलुव असावे आणि संपूर्ण घराण्याला अळूप राजवंश म्हटले जाऊ लागले असल्याचे मानले जाते. डॉ. बी. ए. सालेतोर आणि एम. गोविंद पै यांसारख्या काही विद्वानांच्या मते आळूक हा शब्द शेषाशी (सर्पांचा राजा) संबंधित असावा .

सुमारे इसवी सन ४५०चा काकुष्ठवर्मनचा हल्मिडी शिलालेख आतापर्यंत सापडलेल्या कन्नड शिलालेखांपैकी सर्वांत जुना मानला जातो. असे म्हटले जाते की या शिलालेखात उल्लेख केलेला आलाप दक्षिण कानडा जिल्ह्यातील आळूपासशी संबंधित असूही शकतो. उडुपी तालुक्यात सापडलेल्या राजवंशाच्या दोन सर्वांत जुन्या शिलालेखांवरून या वस्तुस्थितीची पुष्टी होते. ८००च्या सुमारास राष्टकूट राजा गोविंदारासुच्या सोराबा शिलालेखात आपल्याला प्रथमच आलवखेडा हे नाव ६,००० गावातील भौगोलिक विस्तारासह आढळते.

धारवाड जिल्ह्यातील बंकापुरा तालुक्यातील निदुगुंडीला असलेल्या ९व्या शतकातील आणखी एक शिलालेख, इंदापय्य बनवासीवर राज्य करत असताना जमिनीच्या काही भेटवस्तूंची नोंद करतो. त्यात आलवखेड ६,०००चा देखील उल्लेख आहे व आलवखेड हा एक वेगळा राजकीय विभाग म्हणून इ.स. ९व्या शतकापर्यंत ओळखला जात असावा.

कोकणाच्या दक्षिणेस आणि केरळच्या उत्तरेस आळुप हे राज्य होते. अल्वाखेडा हा प्रादेशिक विभाग, होयसळ काळापर्यंत त्याच नावाने ओळखला जात असावा. होयसळ राजा विष्णुवर्धनाच्या काळातील एका शिलालेखात आल्वखेडा-६,००० येथील लोकांचा उल्लेख आहे. या काळात देशाला वारंवार आल्वखेड आणि त्यांच्या आधिपत्याची पश्चिम सीमा म्हणून संबोधले जात असे.

अळवखेडाचा विस्तार उत्तर कन्नड जिल्ह्याच्या काही भागांवर, ज्यामध्ये हैवे गावाचा समावेश आहे, पांड्य-चक्रवर्ती शंकर पांड्य यांच्या कारकिर्दीतील शिलालेख, १३४८साली होन्नावर तालुक्यातील इडागुंडी येथील महाप्रभु नारायण सर्वतीथ्य यांनी बनवलेल्या जमिनींमधील धार्मिक स्थापनेचे वर्णन करतो. १३०४च्या उत्तर कन्नड येथील भटकळ सिराली शिलालेखात चक्रवर्ती अरिराय-बसव-शंकर वीर-अजयदेवरस यांनी दिलेल्या भेटवस्तूचा उल्लेख आहे.

१३३४च्या याच शिलालेखाच्या दुसऱ्या भागात आळूप शासक सोयिदेवाच्या कारकिर्दीत आणखी एक भेटवस्तू नोंदवली आहे. बाराकुरुचा राजा वीर-कुलशेखर देवरस याने त्याच्या मंत्र्यांसोबत मिळून आदेश जारी केले होते, ज्यामध्ये शिराळेच्या लोकांकडून त्याच्या बिदाराचा वापर सुरू ठेवण्याची घोषणा केली होती.

Alupa Dynasty | Tulu Nadu Karnataka
Goa History: पेरमाडीदेव राजा गोमंतकीयांचा देव कसा?

विजयनगर राजवटीच्या आगमनापूर्वी, दक्षिण कन्नड जिल्हा आणि उत्तर कन्नड(विशेषतः भटकळ आणि होन्नावर तालुके)च्या किनारी प्रदेशांचा समावेश असलेला पश्चिम किनारपट्टीचा भाग आलुपांच्या ताब्यात होता आणि शिलालेखांमध्ये उल्लेख केलेला अल्वाखेडा हा किनारी प्रदेश होता जिथे आलुपांनी मुख्य आणि समवर्ती शाखांद्वारे आपली सत्ता कायम केली.

पुरातत्त्वशास्त्रज्ञांना अलुपा राजवंशाशी संबंधित एक दुर्मीळ शिलालेख सापडला, जो अलुपा राजाच्या मृत्यूच्या संदर्भात आहे. तुळुवा इतिहास आणि संस्कृतीच्या (आधुनिक कर्नाटकातील) अभ्यासात या सोमेश्वर शिलालेखाला खूप महत्त्व आहे. हा शिलालेख ११व्या शतकात गुजरातच्या सोम शर्मा यांनी स्थापन केलेल्या सोम पंथाच्या स्थापनेशी संबंधित आहे , जो नंतर संपूर्ण भारतात पसरला.

Alupa Dynasty | Tulu Nadu Karnataka
Margao History: गोव्यात निर्माण झालेले पहिले शहर, दामोदर देव घोड्यावर स्वार होऊन करतात राखण; संस्कृतीच्या खुणा जपणारे 'मठग्राम'

सोमेश्वरातील सोमेश्वर मंदिर कुलशेखर अलुपेंद्रच्या कारकिर्दीत सोम शर्माच्या सन्मानार्थ बांधले गेले होते आणि ते नवदुर्गांच्या शिल्पांनी सजवले गेले होते. दक्षिण कन्नडमधील अलुपाचा एक प्रसिद्ध शासक कुलशेखर अलुपेंद्र पहिला याचे चित्रण आहे, ज्यामध्ये तो तलवार घेऊन एका विशिष्ट स्थितीत उभा आहे. कुलशेखर अलुपेंद्र या शासकांना अजूनही नवीन शहर स्थापन करण्यासाठी, या प्रदेशात पाळले जाणारे मंदिर प्रशासनाचे

नियम स्थापित करण्यासाठी आणि तुळु भाषा आणि संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी ओळखले जाते. त्याने ११५६ ते १२१५पर्यंत तुलुनाडूवर राज्य केले आणि हा शिलालेख, जरी तारीख स्पष्ट नसली तरी, पुरालेखशास्त्राच्या आधारे १२व्या शतकातील असल्याचे सिद्ध होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com