Retirement Life Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Retirement Life: निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे, नवी सुरुवात! अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी

Life After Retirement: ज्या खुर्चीत आपण तीस पस्तीस वर्षे बसलो होतो बसलो होतो, अधिकार गाजवला होता तिथे आता आपला ज्युनिअर किंवा दुसरा कुणी तरी बसलेला असतो.

दैनिक गोमन्तक डिजिटल

जयराम रेडकर

ज्या खुर्चीत आपण तीस पस्तीस वर्षे बसलो होतो बसलो होतो, अधिकार गाजवला होता तिथे आता आपला ज्युनिअर किंवा दुसरा कुणी तरी बसलेला असतो. काळ पुढे सरकतो आणि आपण इतिहासजमा होऊ लागतो. पण निवृत्तीनंतरचे दिवस आनंदात घालवायचे असतील तर नवीन छंद जोपासावे लागतील. सतत कार्यालयीन कामात गुंतून राहिल्याने पूर्वीच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर त्या पूर्ण करण्याची संधी आता प्राप्त झालेली असते.

नोकरीत असलेल्या लोकांचे जीवन साचेबंद असते. तराविक वेळी उठणे, नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी तयार होणे, मधल्या वेळी खाण्यासाठी लागणारा डबा घेणे, कार्यालयातून घरी येताना संसारासाठी लागणाऱ्या किरकोळ वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्यासाठी सोबत एखादी पिशवी घेणे, ठराविक बस, किंवा ट्रेन पकडण्याची धडपड आणि चिंता करणे या गोष्टी यंत्रवत होतात.

(स्वतःचे वाहन असेल तर दगदग थोडी कमी होते) असे हे साचेबंद जीवन जगणारी व्यक्ती जेव्हा निवृत्तीच्या जवळ पोहोचते, तेव्हा त्याच्या मनात काहूर उठते. थोड्याच दिवसांत आपण निवृत्त होणार आणि आता ज्या खुर्चीत विराजमान आहोत तिथे दुसराच कुणीतरी येऊन बसणार याची नाराजी चेहर्यावर उमटत असते. कारण त्या खुर्चीशी त्याचे जिव्हाळ्याचे नाते जडलेले असते. हा खुर्चीचा मोह असतो.

वास्तविक ही खुर्ची आपल्यापासून कधीतरी दूर होणार हे आधीच ठरलेले असते. परंतु निवृत्तीचे वर्ष जवळ येईपर्यंत याची जाणीव आपल्याला झालेली नसते. सर्वसामान्य पदावरून निवृत्त होणारी व्यक्ती आणि उच्च पदावरून निवृत्त होणारी व्यक्ती यांच्या भावना वेगळ्या असतात. सर्वसामान्य नोकरदार निवृत्त होतो, तेव्हा त्याला स्टाफच्या वतीने निरोप दिला जातो. चहापान होते.

वरिष्ठ अधिकारी निवृत्त होतो तेव्हा त्याच्यासाठी खास कार्यक्रम आयोजित केला जातो. त्याच्यासाठी पुष्पहार, पुष्पगुच्छ, वस्तु रुपाने सुबक भेटी, शाल श्रीफळ देऊन त्याचा गौरव केला जातो. त्याच्या कामाबद्दल, त्याच्या अमूल्य मार्गदर्शनाविषयी, त्याच्या शिस्तीविषयी भरभरून बोलले जाते. तुमची आम्हाला वेळोवेळी आठवण येईल, असे सांगताना अनेकांचे कंठ दाटून येतात.

हे सगळे ऐकल्यावर निवृत्त होणाऱ्या साहेबांचे मन भरून येते. त्याचे कोडकौतुक करणारी भाषणे ऐकून त्याच्या मनाला प्रश्न पडतो, की खरेच का या लोकांशी आपण इतके चांगले वागलो? कारण अनेकदा कामातील चुकांबद्दल आणि केलेल्या दिरंगाईबद्दल आपण यांना फैलावर घेतले होते, याची आठवण त्याला होते. त्यावेळी हेच कर्मचारी हिरमुसले होऊन आणि मनातल्या मनात शिव्याशाप देत केबिनबाहेर गेलेले असतात, याची कल्पना साहेबाला असते.

अधिकाराच्या आणि मानाच्या खुर्चीवर बसण्याचा आजचा हा आपला शेवटचा दिवस आहे, हे मनात येते तेव्हा हृदयात नाही म्हटले तरी कालवाकालव होते. कार्यालयात येताना झडणारे सलाम यापुढे झडणार नाहीत, बेल मारताच शिपाई धावत येणार नाही, आपल्या भेटीसाठी आलेले लोक बाहेरच्या सोफ्यावर बसलेले लोक आता दिसणार नाहीत. हे विचार त्या वरिष्ठांच्या मनात डोकावू लागतात. विचाराने त्याचे मन हळवे होते.

निवृत्तीनंतर फक्त काही दिवसच आपले सहकारी, ओळखीचे लोक आपली आठवण काढत असतात.त्यानंतर ‘नवी विटी नवे राज्य’ सुरू होते. हळूहळू आपली तिथली ओळख पुसली जाते. कुटुंबातही आपले महत्त्व पूर्वीसारखे रहात नाही. कुटुंबातील करता मुलगा आपल्या जागी येतो. त्याचेच मग कोडकौतुक सुरू होते. आपण कुटुंबासाठी आणि समाजासाठी खूप काही केले हा दुराभिमान हळूहळू गळायला लागतो.

आपण कर्तव्यदक्ष आहोत हे दाखवताना अनेकांना दुखावलेले असते ते तर आपल्या निवृत्तीने सुखावलेले असणार. निरोपाच्या दिवशी त्यांनी कितीही आपले गोडवे गायिलेले असले तरी त्यांच्या मनातील अढी कायम आपला दुस्वास करीत असणार हे नक्की. कधीकधी वाटू लागते की, उगाच आपण कठोर वागलो. कडक शिस्तीच्या नावाखाली कनिष्ठांना वेठीस धरले. मात्र अधिकारी म्हणून तो एक कर्तव्याचा भाग होता, हेही तितकेच खरे.

ज्या खुर्चीत आपण तीस पस्तीस वर्षे बसलो होतो बसलो होतो, अधिकार गाजवला होता तिथे आता आपला ज्युनिअर किंवा दुसरा कुणी तरी बसलेला असतो. काळ पुढे सरकतो आणि आपण इतिहासजमा होऊ लागतो. जिथे अधिकार गाजवला तिथे गेल्यावर आपल्याला कुणी ओळखत नाही, अशी स्थिती निर्माण झालेली असते. कारण आपल्या वेळचे बहुतांशी लोक एक तर निवृत्त झालेले असतात वा इतरत्र बदलून गेलेले असतात.

यामुळे आपल्या परिचयाचे तिथे कुणी दिसत नाही. साहेबांच्या भेटीसाठी परवानगी घेऊन आत प्रवेश घ्यावा लागतो. काही वेळा तिष्ठत बसावे लागते. जिथे सलाम स्वीकारले, तिथे आपल्याला सलाम मारावे लागतात. हा क्षण अत्यंत वेदनादायी असतो. म्हणूनच निवृत्तीनंतर आपण जिथे अधिकारी म्हणून काम केलेले असेल तिथे निमंत्रणाशिवाय जायचे नसते. कारणपरत्वे गेल्यावर आपण इथे असताना किती चांगले काम होत होते, असे सांगून तुलना करायची नसते. इतिहास उगाळून काही फायदा होत नाही किंवा त्याचा काही परिणामही होत नाही.

उलट ‘आला मोठा शहाणा’ असं समोरचा माणूस मनातल्या मनात म्हणत असतो. म्हणून निवृत्ती नंतरचे दिवस आनंदात घालवायचे असतील तर नवीन छंद जोपासावे लागतील. सतत कार्यालयीन कामात गुंतून राहिल्याने पूर्वीच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर त्या पूर्ण करण्याची संधी आता प्राप्त झालेली असते. घरात नातवंडे असतील तर त्यांच्यात मन रमवता येईल. ज्येष्ठांचा ग्रुप तयार करता येईल. त्यांच्या संगतीत छान वेळ घालवता येईल.

अंगी कलागुण असतील तर त्या द्वारे इतरांचे मनोरंजन करता येईल. लेखन, वाचन, पर्यटन असे छंद खूप छान आनंंद देणारे असतात याचाही विचार करता येईल. ज्या विषयात आपण पारंगत आहोत, त्या विषयाची मुलांसाठी मार्गदर्शन शिबिरे घेता येतील. निवृत्तीचा असा सकारात्मक विचार केला आणि सतत आपण स्वतःला गुंतवून ठेवले तर आपण एकटे पडणार नाही आणि आपले म्हातारपण आनंददायी होऊ शकेल. पहा विचार करून!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PF Withdrawal New Rules: नोकरदारांना मोठा झटका! पीएफ आणि पेन्शनच्या नियमांत मोठे बदल; पैसे काढण्याच्या कॅटेगरी घटल्या

Konkan Railway Fraud: कोकण रेल्वेतील गैरव्यवहार न्यायालयात; दोन अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांविरुद्ध CBIचे आरोपपत्र

VIDEO: रिमझिम सरींची साथ अन् फ्लेमिंगोची बहार; बॅकवॉटरमध्ये रंगला निसर्गाचा अनोखा सोहळा

म्हापसात भीक मागणाऱ्या 'त्या' अल्पवयीन मुलांची सुटका, हायकोर्टाचे धाराशिवला पाठवण्याचे निर्देश; पुर्नवसन होणार

Shocking! 'रंग सावळा' म्हणून वारंवार अपमान; 10 वेळा लग्नाला नकार मिळाला, 11व्या स्थळाआधीच तरुणीनं गळफास घेवून संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT