Sameer Panditrao
अनेकदा स्ट्रेस कामामुळे नाही तर आयुष्यात प्रगती होत नसल्याच्या भावनेमुळे निर्माण होतो.
वय वाढतं, पण आयुष्यात काहीच बदल होत नाही असं वाटू लागलं की मनावर ताण वाढतो.
गेल्या वर्षी जिथे होतो तिथेच आजही असल्याची जाणीव झाली की निराशा निर्माण होते.
“मी खरंच पुढे जातोय का?” हा प्रश्न सतत मनात येत राहिल्यावर स्ट्रेस वाढतो.
मोठा बदल एकदम होतो असं वाटतं, पण प्रत्यक्षात बदल हळूहळू घडत असतो.
दररोज थोडं शिका, स्वतःमध्ये सुधारणा करा आणि एक छोटं पाऊल पुढे टाका.
सातत्य आणि छोट्या कृतींची सवयच पुढे जाऊन मोठा बदल आणि यश निर्माण करते.