Querim Ponda Village Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Querim Ponda: सफर गोव्याची! 4 डोंगरांनी वेढलेले, निसर्गाचा वरदहस्त लाभलेले 'केरी-फोंडा'

Querim Ponda Village Goa: केरीवासी पोटापाण्यासाठी गाव सोडून फोंडा, मडगाव, पणजी अथवा म्हापसा सारख्या शहरांत गेलेत. तरीही गावच्या मातीशी त्यांचे नाते अजून कायम आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

‘आम्ही केरकर’ हे आम्ही तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो, कारण फोंडा-केरी गावच्या केरकराने आपली सामाजिक, साहित्यिक, सांगतिक, नाट्यक्षेत्र आणि आरोग्य क्षेत्रात नाममुद्रा उमटवली आहे.

केरी हे गाव फोंड्यातील चारी दिशांनी डोंगरांनी वेढलेले गाव. आमचे बालपण याच गावच्या मातीत आनंदाने बहरून आले. गाव छोटेसेच, पण निर्सगाचा वरदहस्त लाभलेले. जसजसे तुम्ही आमच्या गावच्या सीमेकडे येता तसतसे तुम्हाला निसर्गाच्या कृपाछत्राचा अनुभव येत जातो. थंड अन्‌ शहारा देणारा वारा तुमचे स्वागत करतो.

आता आमच्यासारखे अनेक केरीवासी पोटापाण्यासाठी गाव सोडून फोंडा, मडगाव, पणजी अथवा म्हापसा सारख्या शहरांत गेलेत. तरीही गावच्या मातीशी त्यांचे नाते अजून कायम आहे.

या गावातील लोकांनी गरिबीत जसे दिवस काढले, तसे श्रीमंतीत सुखा समाधानाने दिवस काढतात. पैसे खूप आले तरी या गावातील लोकांनी मोठ-मोठ्या इमारती उभ्या केल्या नाहीत. तर गावातील देवळांना नव्या रूपात नव्या ढंगात उभे केले.

ज्या सुखसोयी काही वर्षांपूर्वी यांच्यापासून दूर होत्या, त्या त्यांनी नव्या पिढीसाठी उपलब्ध करून ठेवल्या. आज सगळ्या सुखसोयी शिक्षणाची अनेक मंदिरे या गावात उभी झाली आहेत.

विहीर, तलाव, पाण्याने भरलेले नाले या गावाला पाण्याची कधी कमतरता भासू देत नाहीत, याची आठवण ठेवून माझ्या गावच्या लोकांनी याची सुंदर निगा राखली आहे.

श्री देवी सातेरी, श्री वेताळ आणि देवी विजयादुर्गा याचे संरक्षण या गावाला फार पूर्वीपासून आहे, याची साक्ष सांगणारे वयस्क अजून या गावात आहेत. त्यामुळे या देवांच्या कृपेने केरी गावात अनेक कलाकार संगीतकार अन्‌ साहित्यिक येथे जन्मले, वाढले अन्‌ त्यांनी या गावाची शान वाढवणारे कार्य केले.

केरी या गावाचे नाव घेताच गोव्याबाहेरील लोक अजूनही सुरश्री केसरबाई केरकर, दादा वैद्य अनेक स्वातंत्र्य सैनिक यासारख्या दिग्गजांची नावे जेव्हा घेऊन, गावाबद्दल आपले कृतज्ञताभाव व्यक्त करतात. त्यावेळी ऐकणाऱ्या प्रत्येक केरीवासीयांचा ऊर भरून येतो.

केरी हा माझा गाव असाच शांत, समाधानी, अन्‌ तृप्त मनाचा आहे. गावातील अनेक तलाव, पाण्याचे डोह हे नेहमी भरलेली अन् वाहते असतात. पावसाळ्यात तर केरी गावाचे रखवालदार असलेले डोंगर जेव्हा स्नान करतात. त्यावेळी बागायतीतील पोकळी, माड, आब्या-फणसांची झाडेही त्यासोबत नाचत न्हात असतात.

हे दृश्‍य पहाण्यासाठी आम्ही अनेकवेळा श्री देवी विजयदुर्गेच्या तलावाकाठी जावून बसत असू. सातेरी देवळामागे आमचे जुने घर, घडद झाडांच्या छायेखाली दडलेले. लाल मातीचा रस्ता, मुख्य रस्त्यापासून त्याठिकाणी आम्हाला घेऊन जातो. घराच्या मागे पुढे, आंबा, नारळ, पोफळी याची गर्द झाडे अन्‌ त्यात आमचे घर. आमचे सारे बालपण तेथे गेले. त्यामुळे या गराची अन्‌ जागेची ओढ आमच्या रक्तात भिनलेली. गणेश चतुर्थीला कुटुंबातील सारेजण जमतात. उत्सव करतात अन्‌ आनंदाचा अनुभव घेऊन निघून जातात.

केरी गावापासून आज जरी आम्ही आमच्या भविष्यासाठी या मातीपासून निसर्गापासून लांब असलो तरी आमचे भूत-वर्तमान अन्‌ भविष्य याच गावच्या मातीत सतत राहील, एवढे नक्की.

गुरूदास केरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT