Parashuram Era Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Village Governance: संगम राजवंशाची गोव्यातील उत्पत्ती, परशुरामाच्याही पूर्वीपासून असणारी गावकारी पद्धत

Mahajan and Village Governance: गृहीतक स्वीकारले तर एक प्रश्न येऊ शकतो की, अशा गुंतागुंतीच्या संघटना तयार करण्यास सक्षम असलेली ही आदिम वसाहत कुठे होती?

Sameer Panditrao

तेनसिंग रोद्गीगिश

प्रारंभिक मानवी वसाहतीपासूनच ‘महाजन’ व ‘गावकारी’ व्यवस्था सुरू झाली का, याचा ऊहापोह आपण गेल्या लेखात केला. ‘सह्याद्रिखंड’ आणि ‘ग्रामपद्धती’ या ग्रंथांनी ग्रामसंस्थेबाबत सुचवलेल्या ’वेगळ्या कथेच्या’ संदर्भात आपण हे पाहिले पाहिजे. ‘ग्रामपद्धती’ या ग्रंथात ‘सह्याद्रिखंडा’चे संदर्भ येतात त्यामुळे, तो त्याचाच पुढचा एक भाग असल्याचे म्हटले जाते. त्यात गावांच्या प्रशासनाशी संबंधित नियम, त्यांचे वर्गीकरण आणि त्यातील सर्व महत्त्वाच्या कुटुंबांची नावे समाविष्ट आहेत.

ज्यामुळे प्राचीन तुळुवनाडू (कर्नाटकातील आधुनिक दक्षिण कन्नड जिल्हा) मधील ’महान ग्रामसभा’ म्हणून ज्याला सालेतोर संबोधतात त्याची व्यापक कल्पना येते. वरील दोन्ही ग्रंथांचा स्रोत एकच असावा आणि म्हणूनच ते परशुरामाने भूमी वसवल्याची एकच कथा सांगतात. परंतु गावकरीचा उगम कुणबींसारख्या आदिम समुदायांपासून झाला, हे शोधणे अधिक तर्कसंगत आहे.

गावकरी आणि तत्सम ग्रामस्तरीय संघटना कुणबींसारख्या आदिवासींनी निर्माण केल्या, हे गृहीतक स्वीकारले तर एक प्रश्न येऊ शकतो की, अशा गुंतागुंतीच्या संघटना तयार करण्यास सक्षम असलेली ही आदिम वसाहत कुठे होती? आपण त्या प्रश्नाचे उत्तर केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित देऊ शकतो; पुराव्यांचे दोन स्वतंत्र धागे आहेत जे आपल्याला असे म्हणण्यास प्रवृत्त करतात

पहिले म्हणजे पल्लवरांचे कुरुंबा मूळ; स्टुअर्टच्या मते, कुरुंबा ‘प्राचीन पल्लवांचे आधुनिक प्रतिनिधी आहेत, जे एकेकाळी दक्षिण भारतात खूप शक्तिशाली होते. ... परंपरा सांगतात की त्यांच्याकडून परदेशात खूप मोठा समुद्री व्यापार केला जात होता आणि प्राचीन रोम आणि चीनच्या नाण्यांसह पल्लव नाण्यांच्या समुद्रकिनाऱ्यावरील शोधामुळे याची पुष्टी होते’. (संदर्भ : स्टुअर्ट, १८९५: मद्रास डिस्ट्रिक्ट मॅन्युअल्स - नॉर्थ आर्कोट, खंड १, २२०) मल्लपुरमचा विस्तृत, भव्य आणि विलक्षण वारसा, पल्लवरच्या व्यापारी यशाचा जिवंत साक्षीदार आहे.

रॉलिन्सन हे स्पष्टपणे सांगतात की, ‘पल्लवर घुसखोर असल्याचे दिसून येते आणि मूळ तमिळ राज्यांचा भाग नव्हते’. (संदर्भ : रॉलिन्सन, १९३७ : इंडिया - अ शॉर्ट कल्चरल हिस्ट्री, १९४). ’त्यांच्याभोवती कुरुंबा, मारव, कल्ला यांचे सदस्य गोळा करणे’ या बाबतीत रॉलिन्सन यांनी पल्लवरची विजयनगर राज्याच्या संस्थापकांशी केलेली तुलना सूचक आहे; जरी ही दोन्ही राज्ये वेगवेगळ्या कालखंडातील आहेत.

विजयनगर साम्राज्याचे सर्वात प्रसिद्ध इतिहासकार सेवेल यांच्या मते, संगम राजवंशातील विजयनगर राज्याचे काही संस्थापक कुरुबा वंशाचे असल्याचा दावा केला जातो; हे विधान फर्नांओ नुनिज आणि डिओगो डो काउतो यांच्या इतिहासावर आधारित आहे. (संदर्भ : सेवेल, १९०० : अ फॉरगॉटन एम्पायर, २३)

२०१२मध्ये कधीतरी प्रकाशित झालेल्या ‘विजयनगर किंगडम अँड गोवाज संगम डायनेस्टी’ या ब्लॉगमध्ये असा दावा करण्यात आला आहे की संगम राजवंशाची उत्पत्ती गोव्यात झाली; ते मेंढपाळ आणि स्थानिक सरदार होते, जे वेळीप समुदायाचे असावेत. स्वतः संगम येथील ब्लॉगरने संगम बंधूंसारख्याच समुदायाचे असल्याचा दावा केला होता.

मद्रास कॉलेज लायब्ररीमध्ये जमा केलेल्या मॅकेन्झी मॅन्युस्क्रिप्ट्समधील हस्तलिखित पुस्तक क्रमांक १४, काउंटरमार्क ७६८, कलम ७ मधील नोंद ही अधिक उपयुक्तत आहे. ’तोंडमंडलमचा प्राचीन इतिहास आणि त्याच्या पूर्वीच्या रहिवाशांना वेदार आणि कुरुम्बर म्हटले जाते’ या शीर्षकाच्या विभागात पुढील गोष्टी नोंदवल्या आहेत: ’बऱ्याच वर्षांनंतर, कुरुम्बर कर्नाटक देशात उदयास आले:

... त्यांनी एका माणसाला निवडले जो ज्ञानी, ग्रंथांचे भांडार असलेला द्रविड देशाचा प्रमुख होता आणि त्याचे नाव कामंडा कुरुम्बा प्रभु होते. या पलाल राजाने पुरालूरमध्ये एक किल्ला बांधला. ... तो राज्य करत असताना, जहाजांद्वारे व्यापार चालत असे.’ (संदर्भ : टेलर, १८३८: एक्झामिनेशन अँड अ‍ॅनलिसिस ऑफ द मॅकेन्झी मॅन्युस्क्रिप्ट्स डिपॉझिटेड इन द मद्रास कॉलेज लायब्ररी, ८१).

Brahmin History

भिल्लांचा इतिहास जवळजवळ असाच आहे. विल्सन यांचे मत आहे की भिल्ल हे कोळी, कुळंबी किंवा कुणबीपेक्षा ’वांशिकदृष्ट्या वेगळे’ नाहीत. (संदर्भ : विल्सन, १८७६: द अ‍ॅबोरिजिनल ट्राइब्स ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी, ८). एन्थोव्हेन यांच्या म्हणण्यानुसार, ‘एकेकाळी देशाच्या मोठ्या भूभागावर राज्य असलेल्या भिल्ल या शक्तिशाली वंशाला संस्कृत साहित्यात अत्यंत तुच्छतेने संबोधले जात असल्याचे पुरावे आहेत.

राजपुतांनी जोधपूर आणि उदयपूर या दोन्ही ठिकाणी भिल्लांवर विजय मिळवले, त्यांच्याकडून देशाचे भूभाग जिंकले आणि डुंगरपूर आणि बांसवारा येथील राजपूत राजपुत्रांनीही भिल्लांकडून अशाच प्रकारे जमीन जिंकली..’ (संदर्भ : एन्थोव्हेन, १९८७: द ट्राइब्स अँड कास्टेस ऑफ बॉम्बे, खंड १, १५३) एका राजपूत राजपुत्राच्या राज्यारोहणाच्या वेळी, भिल्ल राजपुत्राच्या अंगठ्यापासून किंवा पायाच्या बोटापासून घेतलेले रक्त राजपुत्राच्या कपाळावर लावले जात असे, जे राजपुत्राला भूमीचा स्वामी असल्याचे प्रतीक होते.

कवच किनाऱ्यावरून किंवा कच्छ बेटावरून आले होते; आणि कवचकाम ज्या ठिकाणाहून कवच काढले गेले होते त्याच्या जवळ घडले. यावरून असे सूचित होते की शंखांचा संग्रह आणि वस्तूंची निर्मिती दोन्ही स्थानिक लोकांच्या म्हणजेच कोळी लोकांच्या हातात होते.

परंतु २६०० ईसापूर्व क्षत्रियांच्या आगमनानंतर परिस्थिती बदललेली दिसते. भिल्ल/कोळी समाजाकडून मणी आणि शंख उद्योग आणि त्याचा व्यापार दोन्हीही नंतरच्या काळात क्षत्रियांनी हस्तगत केला. कच्छ बेटावरील खिरसरातील तटबंदीवरून हे बळकावणे सिद्ध होते.

खिरसराचे एक विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याभोवती केवळ बाह्य तटबंदीची भिंतच नव्हती, तर आतील प्रत्येक संकुलाची स्वतःची तटबंदी होती, मग ती किल्ला असो, गोदाम असो, त्याच्या निवासस्थानासह कारखाना असो आणि अगदी कुंभारांची भट्टी असो, जी बाह्य तटबंदीच्या भिंतीच्या बाहेर होती. (संदर्भ : नाथ आणि इतर, २०१३: फोर्टिफाइड फॅक्टरी अ‍ॅट हडप्पन मॅट्रोपोलीस खिरसारा गुजरात, हेरिटेज: जर्नल ऑफ मल्टीडिसिप्लिनरी स्टडीज इन आर्कियोलॉजी, १, ६५८).

ही दोन उदाहरणे, एक आग्नेय भारतातील (पल्लवर) आणि दुसरी वायव्य भारतातील (भिल्ल) क्षत्रिय आणि ब्राह्मणांच्या आगमनापूर्वीच्या भारतीय उपखंडातील परिस्थिती मांडतात. त्यांच्या सध्याच्या स्थितीवरून आदिवासींच्या पराक्रमाचे मूल्यांकन करणे चुकीचे ठरू शकते. जर पल्लवर आणि भिल समुद्र ओलांडून चीनला मेसोपोटेमियाशी जोडणारे व्यापारी साम्राज्य उभारू शकतात, तर कुणबी खाजन, बांध, मानशी बांधू शकतात व गावकारीसारखी ग्रामव्यवस्थाही निर्माण करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

Goa Assembly Live Updates: टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष

Viral Video: नदीत पिकअप आणि मगरीचा थरार...! धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी हैराण

तुम्ही सेक्युलर नाहीच! भाजप आमदाराने 'हिंदूंचाच नव्हे, आमचा पक्ष सेक्युलर', म्हणताच विजय सरदेसाईंनी डिवचलं

Goa ST Representation Bill: लोकसभेत पुन्हा गोंधळ! गोवा एसटी विधेयक मंजूर झालचं नाही; CM सावंतांनी काँग्रेसवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT