International Literacy Day  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

International Literacy Day: 1950मध्ये टुरिंग टेस्ट सुचवली, यंत्राची बुद्धिमत्ता तपासली गेली; AI साक्षर होणं काळाची गरज

Digital Literacy and AI: आज एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात आपण सारे वावरतोय, एआय ने शेती, शिक्षण, उद्द्योग अशा प्रत्येक क्षेत्र कवेत घेतले आहे.

Sameer Panditrao

वैज्ञानिक क्रांतीमुळे आज प्रत्येकाच्या हाती ज्ञानाचा खजिना लागला आहे. मात्र, वेगवेगळ्या मार्गाने मिळणारं ज्ञान आपल्या डोक्यात कसं साठवावं, त्याचा योग्य विनियोग कसा करावा, हे कळण्यासाठी प्रत्येकाला साक्षरच नव्हे तर सुजाण होणं काळाची गरज बनली आहे.

इतकंच नव्हे तर कालसुसंगत ज्ञान अर्जित न केल्यास अडाणीपणाचा शिक्का बसण्याचाही धोका निर्माण झाला आहे. आज एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात आपण सारे वावरतोय, एआय ने शेती, शिक्षण, उद्द्योग अशा प्रत्येक क्षेत्र कवेत घेतले आहे. पण या दुधारी शस्त्राचा वापर कसा करावा, हे संस्कार मात्र, सुनियोजित शिक्षणातून आणि सुजाण साक्षरतेतून येणार आहेत.

जागतिक साक्षरता दिन, ज्याला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसही म्हणतात, दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा केला जातो. हा दिवस अधिक साक्षर, न्याय्य, आणि शाश्वत समाज निर्माण करण्यासाठी साक्षरतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी साजरा केला जातो. २०२५ ची संकल्पना ‘साक्षरता आणि शाश्वत विकास किंवा डिजिटल साक्षरतेसारख्या भविष्यातील उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यासंबंधी असण्याची शक्यता आहे. म्हणूनच या निमित्ताने चला ‘एआय’ युक्त शहाणे बनू, असं आवाहन करणे क्रमप्राप्त वाटते.

‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करून प्रगती साधायची असली तरी त्याचा मुलाधार हा साक्षरताच आहे.

सध्याचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या विकासाचा आहे. त्यामुळे बदलत्या काळाचा कानोसा घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर कसा करावा आणि डिजिटल साक्षर कसं बनावं, याबाबत साक्षरता वाढण्याची गरज निर्माण झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे दुधारी शस्त्र असल्यानं धोका फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केवळ शिक्षित असून यापुढं भागणार नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा आवाका समजून घेण्याची कुवतही प्रत्येकाने स्वतःमध्ये विकसित करण्याची गरज उद्‍भवली आहे.

‘युनेस्को’ने या दिवसाची स्थापना केली, जेणेकरून धोरणकर्ते, अभ्यासक आणि जनतेला साक्षरतेच्या मूलभूत मानवी हक्काची आठवण करून दिली जाईल. १९६७ पासून जगभरात हा दिवस साजरा केला जातो.

व्यक्तीला सक्षम करण्यासाठी आणि सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी साक्षरतेच्या भूमिकेबद्दल जागरूकता वाढवणे, हा साक्षरता दिन साजरा करण्यामागचा हेतू आहे.

साक्षरता हा मूलभूत मानवी हक्क असून, अधिक न्यायपूर्ण आणि शांततापूर्ण समाज निर्माण करण्यासाठी ती आवश्यक आहे. कोणत्याही प्रांतातला विकासाचा सोपान गाठायचा असेल तर माणसाला साक्षर असायलाच हवे. इतकेच नव्हे तर बदलत्या तंत्राचा अवलंब करून त्याचा योग्य विनियोग आपल्या कामाच्या क्षेत्रात करणारा माणूस शहाणा ठरतो. माणूस केवळ हुशार असून उपयोगाचा नसून आपल्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करण्याचे शहाणपणही त्याच्याकडे असायला हवे.

सध्याचा काळ हा तंत्रज्ञानाच्या विकासाचा काळ आहे. १९५० मध्ये ॲलन टुरींग यांनी टुरिंग टेस्ट सुचवली आणि त्यातून यंत्राला बुद्धिमत्ता असते, का हे तपासता येईल, असे सूचवले.१९५६ मध्ये डार्टमाऊथ कॉन्फरेन्समध्ये ‘आर्टिफिशिएल इन्टेलिजन्स’ हा शब्द वापरला गेला. त्यानुसार प्रत्येकानं केवळ साक्षर असून चालणार नाही, तर काळानुरूप विज्ञान साक्षर होणं गरजेचे आहे. त्यानुसार नवं तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता आत्मसात करणे गरजेचे आहे.

- बाबासाहेब मगदूम,

मराठी विज्ञान परिषद कार्यवाह (कर्नाटक)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Case: शिरवईकरला बडतर्फ करून अटक करा, 'आप'ची मागणी; मारहाणीत जखमी एडबर्गची प्रकृती गंभीरच

IFFI 2025: सिनेरसिकांसाठी 'इफ्फी'चा मेजवानी मोसम सुरू, पत्रकारांसाठी 'चित्रपट रसग्रहण' अभ्यासक्रम; 'FTII'चे आयोजन

World Cup 2025 Semifinal: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! सेमीफायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास 'या' संघाला मिळणार फायनलचं तिकीट, नियम वाचा

Goa Crime: बालकांवरील अत्याचारप्रकरणी हेमंत दास दोषी, बालन्यायालयाचा निवाडा; 2 मुलांना बनवले होते वासनेची शिकार

Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतीसाठी 'बॅलेट पेपर'चा वापर, पाच कोटींचा होणार खर्च; मतदारयादीत नवी नावे जोडणे स्थगित

SCROLL FOR NEXT